Homeशहरअंबरनाथमध्ये गाळ्याच्या वादातून भाजप-मनसे कार्यकर्ते भिडले; पोलीस ठाण्याच्या आवारात वाहनाची तोडफोड,मनसे शहराध्यक्ष...

अंबरनाथमध्ये गाळ्याच्या वादातून भाजप-मनसे कार्यकर्ते भिडले; पोलीस ठाण्याच्या आवारात वाहनाची तोडफोड,मनसे शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांना अटक; १० जणांवर गुन्हा दाखल, अविनाश जाधव आक्रमक

अंबरनाथ दि. १२ ( प्रमोद दळवी )  : अंबरनाथ पूर्वेकडील शिवाजीनगर परिसरात गाळ्याच्या जुन्या वादातून भाजप आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद होऊन हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या आवारात मनसे शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे अंबरनाथच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, पोलिसांनी १० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात मनसे शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार लक्ष्मीनारायण चौहान हे १२ ऑगस्ट रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर परिसरातील एमआयडीसी रोडलगत हनुमान मंदिराजवळील आपल्या दुकानासमोर काही परिचित व्यक्तींसोबत स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाबाबत चर्चा करत होते. त्यावेळी मनसे शहराध्यक्ष शैलेश शिर्के हे काही सहकाऱ्यांसह तेथे आले. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये वाद निर्माण झाला आणि शिवीगाळ व मारहाणीचा प्रकार घडल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, आरोपींनी दुकानाचे शटर बंद करून दुकानातील महिला व पुरुषांना आतमध्ये अडकवून ठेवल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्यांना  बाहेर ओढून त्याच्यावर मारहाण करण्यात आली. तसेच त्याच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून घेतल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता पोलिसांशीही हुज्जत घातल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी शैलेश शिर्के यांच्यासह एकूण १० जणांविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील करीत आहेत.

दरम्यान, या घटनेनंतर शैलेश शिर्के त्यांच्या वाहनाची पोलीस ठाण्याच्या आवारात तोडफोड करण्यात आल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच मनसे नेते अविनाश जाधव यांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी पोलीस उपायुक्त सचिन गोरे आणि सहायक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांची भेट घेऊन या प्रकरणाबाबत चर्चा केली.

अविनाश जाधव यांचा पोलिसांवर सवाल

यावेळी अविनाश जाधव यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, एका मराठी व्यक्तीच्या गाळ्याच्या वादात मध्यस्थी करण्यासाठी शैलेश शिर्के गेले होते. मात्र, शिर्के तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आले असताना मोठ्या संख्येने लोक बाहेरून येऊन त्यांच्या वाहनाची तोडफोड करतात आणि त्यापैकी एकालाही घटनास्थळी अटक होत नाही, ही गंभीर बाब असल्याचे जाधव यांनी म्हटले. गाळ्याच्या मालकीच्या वादातून एका मराठी व्यक्तीचा गाळा हडप करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणात भाजप नगरसेवक आणि त्यांच्या समर्थकांचीही भूमिका तपासून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी जाधव यांनी पोलिसांकडे केली. “पोलीस ठाण्याच्या आवारात ५० जण बाहेरून येतात, शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांच्या वाहनाची तोडफोड करतात आणि एकालाही जागेवर अटक होत नाही, ही खेदजनक बाब आहे,” असा आरोप अविनाश जाधव यांनी केला.

कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

या प्रकरणात दुसऱ्या बाजूच्या व्यक्तींवरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मनसेने केली आहे. पोलिसांनी योग्य ती कारवाई न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही मनसे नेत्यांनी दिला आहे. त्यामुळे गाळ्याच्या वादाला आता राजकीय रंग चढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पोलिसांचे म्हणणे काय?

दरम्यान, हे प्रकरण राजकीय वादातून निर्माण झाले नसून मालमत्तेच्या वादातून घडल्याची प्रतिक्रिया पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे. पोलिसांकडून दोन्ही बाजूंच्या आरोपांची चौकशी करण्यात येत असून, उपलब्ध पुरावे आणि तक्रारींच्या आधारे पुढील कारवाई केली जात आहे.

शैलेश शिर्के यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी

या प्रकरणातील मनसे शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांना बुधवारी अंबरनाथ न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या काळात पोलिसांकडून घटनेचा सविस्तर तपास, संबंधित व्यक्तींची चौकशी आणि उपलब्ध पुराव्यांची पडताळणी केली जाणार आहे.दरम्यान, गाळ्याच्या वादातून सुरू झालेला हा संघर्ष आता भाजप आणि मनसेमधील राजकीय आरोप-प्रत्यारोपांपर्यंत पोहोचला असून, पुढील काळात या प्रकरणावरून अंबरनाथमध्ये राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पावसाळ्यातील साथीच्या आजारांवर उल्हासनगर मनपाची प्रभावी कार्यवाही : शहरात सध्या एकही डेंग्यू पॉझिटिव्ह...

उल्हासनगर दि. १२ ( प्रमोद दळवी )  : पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, टायफॉईड यांसारख्या साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन उल्हासनगर महानगरपालिका आरोग्य...

उल्हासनगर महापालिकेतील निविदांवरून खळबळ : २० कोटींच्या संभाव्य आर्थिक नुकसानीचा आरोप : अंजली...

उल्हासनगर दि. ११ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर महानगरपालिकेच्या ‘मूलभूत सोयी सुविधा विकास योजने’अंतर्गत काढण्यात आलेल्या निविदांवरून नवा वाद निर्माण झाला आहे. मूळ...

हर घर तिरंगा’ उपक्रमात उल्हासनगरकरांनी सहभागी व्हावे – महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे

१३ ते १५ ऑगस्टदरम्यान घर, कार्यालये, कारखाने व शैक्षणिक संस्थांवर तिरंगा फडकविण्याचे आवाहन उल्हासनगर  दि. ११ ( प्रमोद दळवी )  : भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर...

उल्हासनगर शहराचा ७७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा : शहराच्या विकासाचा संकल्प; आधुनिक सुविधा,...

उल्हासनगर दि. ८ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर शहराचा ७७ वा वर्धापन दिन शनिवारी ८ ऑगस्ट २०२६ रोजी उल्हासनगर महानगरपालिकेच्या मागील बाजूस असलेल्या...

उल्हासनगरच्या ७७ व्या स्थापना दिनानिमित्त शिक्षादानाचा अनोखा उपक्रम; नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

उल्हासनगर दि.७ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर शहराच्या ७७ व्या स्थापना दिनानिमित्त शनिवार, ८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता स्विमिंग पूल, विराट...

error: Content is protected !!