Homeशहरवाढत्या वीजबिलांवरून आणि स्मार्ट मीटरविरोधात मनसेचे महावितरण कार्यालयावर आंदोलन

वाढत्या वीजबिलांवरून आणि स्मार्ट मीटरविरोधात मनसेचे महावितरण कार्यालयावर आंदोलन

उल्हासनगर दि १५ ( प्रमोद दळवी ) : महाराष्ट्र नवनिर्माण सेना उल्हासनगर शहर शाखेच्या वतीने महावितरणच्या वतीने ४८ तासात स्मार्ट मीटर बसवणार असा जो धमकी वजा इशारा देण्यात आला होता त्या विरोधात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महावितरणच्या उल्हासनगर – ३ मधील कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले.मा. न्यायायालयाचा स्पष्ट आदेश आहे की गाऱ्हाकांच्या संमती शिवाय स्मार्ट मीटर बसवण्यासाठी महावितरण शक्ती करू शकत नाही. आणि जर महावितरण अशी सक्ती करत असेल तर तो न्यायालयाचा अवमान आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने इशारा देण्यात आला की यापुढे ग्राहकाच्या लेखी संमती शिवाय एकही स्मार्ट मीटर बसविण्यात येऊ नये अन्यथा जे अधिकारी कर्मचारी स्मार्ट मीटर बसवण्यासाठी येतील त्यांना मनसे पद्धतीने धडा शिकवला जाईल असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.

उल्हासनगर शहरांमध्ये  दिवसभरा मध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.परंतु महावितरणचे अधिकारी व कर्मचारी यांना याचं कुठलं सोयर सुतक नाही. परंतु एखाद्यावेळी ग्राहकाने विज बिल वेळेवर भरलं नाही तर मात्र महावितरणचे कर्मचारी त्या ग्राहकाचं वीज कनेक्शन कट करून बिल भरण्यासाठी अरेरावीची भाषा करतात व विदयुत पुरवठा खंडित करतात.जर वीज बिल वसुलीसाठी महावितरण एवढी सक्त असेल तर ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देणेही महावितरणची जबाबदारी आहे. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर अनेक ग्राहकांच्या वीजबिलात दोन ते चार पटीने वाढ झाली आहे. वाढीव बिल येत असल्याने वीज ग्राहक अगोदर त्रस्त झाले आहे आणि त्यात महावितरण ने ४८ तासात स्मार्ट मीटर बसविण्याचा जो इशारा दिला त्याचा आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी समाचार घेतला.मावितरण विविध मार्गाने ग्राहकांची लूट करीत असल्याचा आरोप मनसे जिल्हा अध्यक्ष बंडू देशमुख यांनी केला उदा. वीज बिलात वीज वापरा व्यतिरिक्त विविध चार्जेस लावले जातात ते अन्याय कारक आहेत  उदा.१) स्थिर आकार २) वीज आकार ३) वहन आकार ४) इंधन समायोजन ५) १६% वीज शुल्क अशा विविध माध्यमातून ग्राहकांची लूट होतं आहे ती तात्काळ थांबविण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

यावेळी जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख, मनविसेचे जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव, उपशहर अध्यक्ष सचिन बेंडके, मुकेश सेठपलानी, विभाग अध्यक्ष नटवर वसिटा ,अक्षय धोत्रे ,कैलास घोरपडे, प्रशांत सांगाळे, संजय नार्वेकर, विशाल रामनानी, संकेत शिंदे, अनिल गोधडे, सुहास बनसोडे, तसेच मनविसेचे शहर संघटक अशोक गरड, संदीप गरड, निर्मल मायकल, जाफर शेख, अमोल पाटील, आशितोष थोरात, सचिन शिरसाट, लड्डन रेन यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

युगांडाच्या चिंपांझीच्या ‘सिव्हिल वॉर’ने शास्त्रज्ञांना धक्का का दिला आहे

मॉर्टन (डावीकडे) आणि गॅरिसन जेव्हा न्गोगो गृहयुद्ध सुरू झाले तेव्हा अविभाज्य होते. गॅरिसनच्या गटाने नंतर मॉर्टनला ठार मारले पुणे : युगांडाच्या राष्ट्रीय उद्यानात...

उल्हासनगरात सर्व महानगरपालिका शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव उपक्रम : शाळेच्या पहिल्या दिवशी नवागतांचे स्वागत...

उल्हासनगर दि. १५ ( प्रमोद दळवी ): उल्हासनगर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व महानगरपालिका शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम सोमवारी दि.१५ जुन, २०२६ रोजी आयोजित करण्यात आला...

कल्याण-अंबरनाथ रस्ता प्रकल्प व मान्सूनपूर्व तयारीचा आढावा : आमदार कुमार आयलानी यांची महत्त्वपूर्ण...

उल्हासनगर दि. १५ ( प्रमोद दळवी ) :  कल्याण-अंबरनाथ रस्त्यावर सुरू असलेल्या रस्ते बांधकाम प्रकल्पाच्या प्रगतीचा तसेच मान्सूनपूर्व आवश्यक कामांचा आढावा घेण्यासाठी आमदार कुमार...

नीरज चोप्रा 19 जून रोजी दोहा डायमंड लीगच्या हंगामात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे

भारताचा नीरज चोप्रा (पीटीआय फोटो) नवी दिल्ली: भारताचा ऑलिम्पिक आणि जागतिक चॅम्पियन भालाफेकपटू नीरज चोप्रा 19 जून रोजी दोहा डायमंड लीगमध्ये 2026 च्या...

मुंबईत बनावट ट्रेडिंग योजनेत निवृत्त व्यक्तीचे ७ कोटी रुपयांचे नुकसान, ३ जणांना अटक

मुंबई सायबर पोलिसांनी सेवानिवृत्तांना लक्ष्य करून 7 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या घोटाळ्याचा पर्दाफाश केला (प्रतिनिधी प्रतिमा) मुंबई: दक्षिण मुंबईतील एका 59 वर्षीय निवृत्त व्यक्तीला...

error: Content is protected !!