- पोलिसांनी त्या मुलांना त्वरित अटक करावी आमदार सुलभा गायकवाड यांची मागणी
उल्हासनगर दि ११ ( प्रमोद दळवी ) : आशेळेपाडा इथे काही नशेखोर टोळीने हातात धारदार शस्त्र घेऊन रस्त्यावरील वाहनांची तोडफोड करीत काही निष्पाप नागरिकांवर हल्ला करून त्यांना जखमी केले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या आमदार सुलभाताई गायकवाड यांनी पोलिसांनी त्या मुलांना त्वरित अटक करावी. असे प्रकार पुन्हा इथे घडले आणि पब्लिकने त्यांच्यावर हात उचलला तर माझ्या कुठल्याही कार्यकर्त्यावर आणि जनतेवर गुन्हा दाखल झाला नाही पाहिजे असा इशारा आमदार सुलभाताई गायकवाड यांनी पोलिसांना दिला.

उल्हासनगरातील कॅम्प नंबर ४ परिसरातील आशेळेपाडा इथे मंगळवारी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास काही नशेखोर टोळीने हातात धारदार शस्त्र घेऊन रस्त्यावरील अनेक वाहनांची तोडफोड करत नुकसान केले. तसेच नाहक रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांवर हल्ला करून त्यांना जखमी केल्याच्या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले होते. या घटनेची माहिती आमदार सुलभाताई गायकवाड यांना मिळताच त्यांनी त्या परिसरात धाव घेऊन नागरिकांकडून माहिती घेतली.
ज्या वाहनांची तोडफोड करण्यात आली होती त्याची देखील पाहणी केली. ही घटना पाहून संताप झालेले आमदार सुलभाताई गायकवाड यांनी त्वरित ॲक्शन मोडवर येऊन कायदा सुव्यवस्थेबाबत पोलिसांचा समाचार घेतला. तसेच या घटनेत जखमी झालेल्या नागरिकांची पाहणी करून त्यांच्या कुटुंबियांकडे चौकशी देखील केली. काय मदत लागली तर मी आहे असे आश्वासन देखील नागरिकांना दिले. या घटने बाबत आमदार सुलभाताई गायकवाड यांनी पोलिसांना या घटनेचा सखोल तपास करून त्वरित या घटनेतील आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याची त्यांनी मागणी केली.

जर त्यांना अटक केले नाही तर आपण या घटनेबद्दल आंदोलन करणार असा इशाराही त्यांनी पोलिसांना दिला. पोलिसांनी जनतेच्या सुरक्षेतेची काळजी घ्यायला हवी. अशी दहशत मोजणाऱ्यांना चांगला सबक शिकवायला हवा असेही त्यांनी पोलिसांना सांगितले. जर या मुलांना आता अटक केली नाही जर याच्या पुढे असे जर प्रकार इथे घडले आणि पब्लिकनी त्यांच्यावर हात उचलला तर माझ्या कुठल्याही कार्यकर्त्यावर किंवा माझ्या कुठल्याही जनतेवर गुन्हा दाखल नाही झाला पाहिजे असा इशारा आमदार सुलभाताई गायकवाड यांनी पोलिसांना दिला. जर हे हल्लेखोर अल्पवयीन असतील तर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन बाल सुधारगृहत पाठवावे त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. नुसते त्यांना ताब्यात घेऊन सोडू नये असाही इशारा आमदार सुलभाताई गायकवाड यांनी पोलिसांना दिला.





























