Homeशहरपाणीटंचाईच्या समस्येबाबत आमदारांची एमआयडीसी, महापालिका जलविभाग व वीज विभागासोबत बैठक

पाणीटंचाईच्या समस्येबाबत आमदारांची एमआयडीसी, महापालिका जलविभाग व वीज विभागासोबत बैठक

  • पीडब्ल्यूडी विभागाकडून कामांचा आढावा

उल्हासनगरदि. ११ (प्रमोद दळवी ) : शहरातील पाणीटंचाईच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी आमदार कुमार आयलानी यांनी महापालिकेच्या जलपुरवठा विभाग, एमआयडीसी तसेच वीज विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी पाणीपुरवठ्यातील अडचणींचा आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. तसेच मान्सूनपूर्व तयारीबाबत महावितरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली.

महावितरण अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पंधरा दिवसांच्या आत २४ तास पाणीपुरवठा बंद करण्याच्या सूचना मिळाल्या आहेत आणि हे काम ३१ ऑगस्टपर्यंत करायचे आहे. नागरिकांच्या तक्रारींना उत्तर देताना आमदारांनी सांगितले की, गुरुवार दुपारपासून शुक्रवार दुपारपर्यंत पाणीपुरवठा खंडित होतो आणि वीज विभाग शुक्रवारी दुपारी वीजपुरवठा बंद करतो, ज्यामुळे शुक्रवार दुपारनंतरही पाणीटंचाई निर्माण होते. यामुळे तीन दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होतो. ज्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. आमदारांनी जिल्हाधिकारी राजेश वधारिया यांच्याशीही या विषयावर चर्चा केली आणि नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी एमआयडीसीने गुरुवार रात्री १२:०० पासून शुक्रवार रात्रीपर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवावा अशी विनंती केली.

बैठकीदरम्यान महापालिकेकडून एमआयडीसीच्या थकीत बिलाचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. गेल्या दोन वर्षांपासून बिलाचा भरणा झालेला नसल्याची माहिती देण्यात आली. यावर आमदार आयलानी यांनी महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्यासोबत संयुक्त बैठक आयोजित करण्याचे निर्देश दिले.महावितरणच्या मान्सूनपूर्व तयारीबाबत कार्यकारी अभियंता हरीश भराडे यांनी माहिती देताना सांगितले की, बुश रिप्लेसमेंट, फेंसिंग, प्लिंथ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. याशिवाय विविध दुरुस्तीची कामेही करण्यात आली असून कंडक्टर, पोल आणि वीजतारा यांच्या कमतरतेबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात कळविण्यात आले आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता प्रशांत मानकर यांनी सांगितले की, के.बी. रोडचे काम सुरू असून फॉरवर्ड लाईन ते काली माता मंदिर दरम्यानचे क्युरिंगचे काम पुढील दोन दिवसांत पूर्ण होईल. त्यानंतर त्या परिसरातील चारही मार्ग वाहतुकीसाठी खुले करण्यात येणार आहेत. तसेच के.बी. रोड प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांना प्राधान्याने सोडविण्याबाबत महापालिकेच्या विधी विभागाचे अधिकारी राजा बुलानी यांना कडक सूचना देण्यात आल्या.

या बैठकीस जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता एस. व्ही. राऊत, आर. व्ही. साने, सहायक अभियंता नीलेश भोपाले, आर. टी. कालेभाग, वीज विभागाचे हरीश भराडे, महापालिका जलविभागाचे अशोक घुले, सहायक सहायक अभियंता वैभव व तेजस, पीडब्ल्यूडीचे प्रशांत मानकर, अनिल पाटील, संदीप जाधव, विधि विभागचे राजा बुलानी तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

FIFA विश्वचषक 2026 उद्घाटन समारंभ लाइव्ह अपडेट्स: FIFA विश्वचषक 2026 सुरू होताच शकीरा एस्टाडिओ...

FIFA विश्वचषक 2026 उद्घाटन समारंभ लाइव्ह अपडेट्स: FIFA विश्वचषक 2026 उद्घाटन समारंभ आणि मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाच्या आमच्या थेट कव्हरेजमध्ये...

जुहूच्या इमारतीला लागलेल्या आगीत फ्लॅट जळून खाक, आठ जण जखमी

मुंबई : जुहूमधील JVPD रोड क्रमांक 12 वरील इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये सकाळी 7.40 च्या सुमारास आग लागल्याने आठ जण जखमी झाले....

बॉम्बच्या धमकीच्या ईमेलमुळे पीएमसी मुख्यालयातील कामकाजात अडथळा

बुधवारी सकाळी बॉम्बच्या भीतीने पुणे महापालिकेच्या कामकाजावर परिणाम झाला. पीएमसीने जारी केलेल्या निवेदनानुसार, महापौर कार्यालयाला बॉम्ब हल्ल्याची धमकी देणारा ईमेल आल्यानंतर नागरी मुख्यालय...

व्यक्तिमत्व चाचणी: या पर्वतावरील तुम्हाला सर्वात जास्त आकर्षित करणारी जागा तुमच्या जीवनात सध्या कोणत्या...

फोटो: दशा ताकिशो / इंस्टाग्राम तुम्ही कधी डोंगराकडे पाहिले आहे आणि तुमच्या आत काहीतरी शांतपणे बदलल्याचे जाणवले आहे का? एखाद्या विशिष्ट ठिकाणी सहजतेने...

महापालिकेने छत्रपती संभाजी महाराज पुतळा प्रकल्पासाठी आक्षेप घेऊनही सल्लागाराला मान्यता दिली

महापालिकेने छत्रपती संभाजी महाराज पुतळा प्रकल्पासाठी आक्षेप घेऊनही सल्लागाराला मान्यता दिली पुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने बुधवारी मोशी येथील छत्रपती संभाजी...

error: Content is protected !!