Homeजिल्हापत्रकारितेची पाठशाळा – बातमी मागची गोष्ट कार्यशाळा ठाण्यात उत्साहात संपन्न

पत्रकारितेची पाठशाळा – बातमी मागची गोष्ट कार्यशाळा ठाण्यात उत्साहात संपन्न

ठाणे दि.११ :- ठाणे जिल्ह्यातील प्रसारमाध्यम प्रतिनिधींकरिता माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई, कोकण विभागीय माहिती कार्यालय, ठाणे जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा पत्रकार संघ, ठाणे पत्रकार संघ, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ, नवी मुंबई प्रेस क्लब, ठाणे जिल्हा साप्ताहिक संपादक असोसिएशन, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने “पत्रकारितेची पाठशाळा – बातमी मागची गोष्ट” या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

ही कार्यशाळा ठाणे महानगरपालिकेच्या कै.नरेंद्र बल्लाळ सभागृहात पार पडली. पत्रकारिता क्षेत्रात ज्ञानवृद्धी व संवाद साधण्याच्या हेतूने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेला ठाणे जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागातील पत्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.कार्यशाळेच्या प्रारंभी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर आणि दै.ठाणे वैभवचे संस्थापक व जेष्ठ पत्रकार नरेंद्र बल्लाळ यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

कार्यशाळेस ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त (माहिती व जनसंपर्क) उमेश बिरारी, कोकण विभागीय माहिती उपसंचालक श्रीमती अर्चना शंभरकर, शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी समितीचे सदस्य कैलास म्हापदी, ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे, नवी मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज जालनावाला, ठाणे पत्रकार संघाचे अध्यक्ष दिपक सोनावणे, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे, ठाणे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष प्रफुल वाघोले, ठाणे जिल्हा साप्ताहिक संपादक असोसिएशनचे अध्यक्ष राजेश जाधव यांच्यासह विविध पत्रकार संघटनांचे पदाधिकारी, सदस्य आणि जिल्ह्यातील विविध प्रसारमाध्य प्रतिनिधी उपस्थित होते.

कार्यशाळेमध्ये ऑर्गोनॉमिक्स प्रोग्राम मॅनेजमेंट एक्सपर्ट आणि प्रेरणादायी वक्त्या डॉ. मोना पंकज यांनी दैनंदिन कामकाज आणि ताणतणाव व्यवस्थापन याविषयी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे निवृत्त संचालक आणि “न्यूज स्टोरी टुडे” पोर्टलचे संपादक देवेंद्र भुजबळ यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींसाठी शासनाच्या विविध योजना, प्रसारमाध्यमे व शासकीय अधिकाऱ्यांची परस्परपूरक भूमिका, कर्तव्य व जबाबदारी याविषयीचे मार्गदर्शन केले. तसेच पर्यावरण अभ्यासक विजयकुमार कट्टी यांनी पर्यावरण संवर्धन आणि पत्रकारिता याची सांगड कशाप्रकारे घालता येवू शकेल याविषयीचे मार्गदर्शन केले

.प्रास्ताविक भाषणात, कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष मनोज जालनावाला यांनी अधिस्वीकृती पत्रिकेबाबत थोडक्यात माहिती देत, शासन निर्णयानुसार सर्व पत्रकारांनी अधिस्वीकृती पत्रिकेसाठी जास्तीत जास्त संख्येने अर्ज करावेत. तसेच अर्ज करताना येणाऱ्या अडचणी लेखी स्वरूपात कळवाव्यात, असे आवाहन केले.उपायुक्त उमेश बिरारी यांनी अशा कार्यशाळा पत्रकारांना नव्या दृष्टीकोनात विचार करण्यास प्रेरणा देतात, असे सांगून सर्व पत्रकारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.कैलास म्हापदी यांनी त्यांच्या पत्रकारितेतील अनुभव कथन करीत बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना, शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी या योजनांबाबत माहिती दिली. पात्र पत्रकारांनी आवश्यक कागदपत्रांची तयारी करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही केले.संजय पितळे यांनी शासनाकडून पत्रकारांना देण्यात येणाऱ्या लाभांच्या अटी सुलभ करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले.

ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे (भा.प्र.से.), ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव (भा.प्र.से.), माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह (भा.पो.से.), संचालक (माहिती) (प्रशासन) हेमराज बागूल, संचालक (माहिती) (माध्यम आराखडा) किशोर गांगुर्डे, संचालक (माहिती) (वृत्त व जनसंपर्क) डॉ.गणेश मुळे, कोकण विभागीय माहिती कार्यालयाच्या उपसंचालक (माहिती) अर्चना शंभरकर, ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (१ ) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२ ) प्रशांत रोडे, उपायुक्त (माहिती व जनसंपर्क) उमेश बिरारी आणि जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर तसेच जिल्ह्यातील विविध पत्रकार संघटनांचे विशेष मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.

या कार्यशाळेला ठाणे जिल्ह्यातील विविध भागातील पत्रकार, संपादक, प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चर्चासत्र, प्रश्नोत्तरे आणि अनुभव कथनाच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. ही कार्यशाळा पत्रकारांसाठी केवळ माहितीपर नव्हे तर व्यावसायिक दृष्टिकोनातून व शासन-प्रशासन आणि प्रसारमाध्यमे यांच्यातील सकारात्मक संबंध वृद्धिंगत होण्यास उपयुक्त ठरली. पत्रकारितेतील नव्या वाटा शोधण्यासाठी ही “पाठशाळा” महत्त्वपूर्ण ठरली, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

20 जून रोजी जंतरमंतर 2.0: झुरळ जनता पक्षाचे अभिजीत दिपके म्हणाले की धर्मेंद्र प्रधान...

पुण्यात एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना दिपके म्हणाले की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (एसपीपीयू) कॅम्पसमध्ये शांततापूर्ण आंदोलनासोबतच हा गट आपला शैक्षणिक जाहीरनामा नंतर...

वैभव सूर्यवंशीच्या 200-स्ट्राइक-रेटच्या खेळीमुळे चाहत्यांना आणखी हवे होते कारण भारत अ स्टार 44 विरुद्ध...

वैभव सूर्यवंशी (स्क्रीनग्रॅब) नवी दिल्ली: श्रीलंकेतील त्रि-राष्ट्रीय मालिकेत गुरुवारी भारत अ संघाने अफगाणिस्तान अ विरुद्ध 20 षटकांत 20 षटकांत 161/2 अशी मजल मारल्याने...

मनोरुग्ण निर्यातीसाठी अटक करण्यात आलेल्या सीमाशुल्क दलाल आणि आयातदाराला मुंबई न्यायालयाने दिलासा दिला

मुंबई: कस्टमला झटका देताना, शहर न्यायालयाने एनडीपीएस कायद्याचे उल्लंघन करून व्यावसायिक प्रमाणात सायकोट्रॉपिक पदार्थ निर्यात करण्याचा कथित प्रयत्न केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या कस्टम्स इन...

भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी करणे आवश्यक आहे, असे Mah Gov

जिष्णु देव वर्मा, महाराष्ट्राचे राज्यपाल पुणे: भारताचे आयात तंत्रज्ञानावरील अवलंबित्व कमी करणे आवश्यक आहे यावर भर देत महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी...

तुमच्या मुलांनाही स्क्रीनचे व्यसन आहे का? स्क्रीन वेळ मर्यादित करण्यापूर्वी पालकांनी प्रथम 5 गोष्टी...

"आणखी पाच मिनिटे." प्रत्येक पालकाने हे किमान शंभर वेळा ऐकले असेल. ते लहान सुरू होते. आणखी एक Youtube व्हिडिओ, आणखी एक गेम पातळी, आणखी...

error: Content is protected !!