Homeताज्या बातम्याप्राथमिक तपासणी करून मतदान यंत्र सज्ज ठेवावीत – राज्य निवडणूक आयुक्त

प्राथमिक तपासणी करून मतदान यंत्र सज्ज ठेवावीत – राज्य निवडणूक आयुक्त

मुंबई दि. ११  : महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी आवश्यक ती सर्व प्रकारची पूर्वतयारी करून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची प्राथमिक तपासणी करण्यात यावी व ती मतदानासाठी सज्ज करावीत, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले.

महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकांच्या प्राथमिक तयारीसंदर्भात विभागीय आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्त यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांच्यासह आयोगाचे विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते.

श्री. वाघमारे म्हणाले की, राज्यातील सर्व २९  महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या तयारीबाबत आतापासूनच दक्ष राहण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे ऐनवेळी होणारी धावपळ टळू शकेल. मतदार संख्या, मतदार केंद्र, उपलब्ध इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि उपलब्ध मनुष्यबळ इत्यादींची आपल्या स्तरावरील उपलब्धता लक्षात घ्यावी. मतदान यंत्रांची प्राथमिक तपासणी झाल्यानंतर आवश्यक संख्येचा अंदाज घेता येईल. मनुष्यबळाबाबत विभागीय आयुक्तांनी समन्वयकाची भूमिका घेऊन सर्व महानगरपालिका आयुक्तांसोबत वेळोवेळी आढावा घ्यावा. सर्व संबंधितांशी समन्वय आणि नियोजनपूर्वक तयारी केल्यास आपल्याला या निवडणुका मुक्त, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पाडणे सहज शक्य होईल.

श्री. काकाणी म्हणाले की, मतदाराची संख्या लक्षात घेऊन मतदान केंद्रांची अचूक संख्या निश्चित करता येईल. त्या आधारे पुढील नियोजन करणे सुलभ होईल. मतदान केंद्राचा अचूक अंदाज आल्यावर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या आवश्यकतेबाबतही नियोजन करता येईल. मनुष्यबळाचाही अंदाज येईल. विभागीय आयुक्तांच्या समन्वयातून आजुबाजूच्या जिल्ह्यातील मनुष्यबळ उपलब्ध करून घेता येईल. एकूणच तयारीबाबतची सर्व तपशीलवार व अद्ययावत माहिती तयार ठेवावी. त्याबाबत वेळोवेळी आढावा घेण्यात येईल. त्यावेळी ही माहिती सादर करावी.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वैभव सूर्यवंशीच्या 200-स्ट्राइक-रेटच्या खेळीमुळे चाहत्यांना आणखी हवे होते कारण भारत अ स्टार 44 विरुद्ध...

वैभव सूर्यवंशी (स्क्रीनग्रॅब) नवी दिल्ली: श्रीलंकेतील त्रि-राष्ट्रीय मालिकेत गुरुवारी भारत अ संघाने अफगाणिस्तान अ विरुद्ध 20 षटकांत 20 षटकांत 161/2 अशी मजल मारल्याने...

मनोरुग्ण निर्यातीसाठी अटक करण्यात आलेल्या सीमाशुल्क दलाल आणि आयातदाराला मुंबई न्यायालयाने दिलासा दिला

मुंबई: कस्टमला झटका देताना, शहर न्यायालयाने एनडीपीएस कायद्याचे उल्लंघन करून व्यावसायिक प्रमाणात सायकोट्रॉपिक पदार्थ निर्यात करण्याचा कथित प्रयत्न केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या कस्टम्स इन...

भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी करणे आवश्यक आहे, असे Mah Gov

जिष्णु देव वर्मा, महाराष्ट्राचे राज्यपाल पुणे: भारताचे आयात तंत्रज्ञानावरील अवलंबित्व कमी करणे आवश्यक आहे यावर भर देत महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी...

तुमच्या मुलांनाही स्क्रीनचे व्यसन आहे का? स्क्रीन वेळ मर्यादित करण्यापूर्वी पालकांनी प्रथम 5 गोष्टी...

"आणखी पाच मिनिटे." प्रत्येक पालकाने हे किमान शंभर वेळा ऐकले असेल. ते लहान सुरू होते. आणखी एक Youtube व्हिडिओ, आणखी एक गेम पातळी, आणखी...

पाणीपुरवठा कपातीपूर्वी रहिवाशांचा विश्वास कोरडा पडल्याने पाइपलाइनमध्ये हवा जमा होण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्याचे...

रहिवाशांच्या मते, समस्या केवळ व्यत्यय नसून पाणीपुरवठा सुरळीत होण्यात होणारा त्रासदायक विलंब आहे. पुणे : पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) पुढील आठवड्यापासून नियोजित पर्यायी दिवसाच्या...

error: Content is protected !!