Homeदेश-विदेशडी.लिट.डॉ.व्ही व्ही पोपेरे आदिवासी सेवक (महाराष्ट्र शासन) यांना ग्लोबल आयकॉन अवॉर्ड २०२६...

डी.लिट.डॉ.व्ही व्ही पोपेरे आदिवासी सेवक (महाराष्ट्र शासन) यांना ग्लोबल आयकॉन अवॉर्ड २०२६ पुरस्कार वितरण.

गोवा दि. १६ ( प्रमोद दळवी ) : गोवा राज्यातील पणजी येथे लिप्स ग्रुप इंडिया ग्लोबल आयकॉन अवॉर्ड २०२६  हा भव्य आणि प्रतिष्ठित पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच भारत सरकारचे केंद्रीय राज्यमंत्री मा.श्री. ईशो नाईक युनियन मंत्री भारत सरकार , तसेच अमेरिकन शिक्षण संस्थेच्या संचालिका व भारतीय शिक्षणतज्ज्ञ डॉ. रंजना शर्मा, श्रीलंकेच्या आंतरराष्ट्रीय मिस अर्थ व जागतिक पर्यावरण संशोधक श्रीम.वियाना पीटर्स मॅडम , क्रीडा क्षेत्रातील मान्यवर प्रतिनिधी,जपान व मालदीवशी संबंधित मान्यवर प्रतिनिधी तसेच भारतीय अभिनेत्री व मॉडेल श्रीम.रागिनी द्विवेदी मॅडम यांच्यासह अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवर उपस्थित होते.या सोहळ्यात महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणारे समाजपरिवर्तक, समाजसेवक, शिक्षणतज्ज्ञ, संशोधक आणि जागतिक स्तरावरील नेतृत्व करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले.

या प्रतिष्ठित कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील डी.लिट.डॉ.व्ही.व्ही.पोपेरे, आदिवासी सेवक (महाराष्ट्र शासन) तथा भारत-नेपाळ मैत्री फोरम वैश्विक परिषद, नवी दिल्ली (राष्ट्रीय उपाध्यक्ष) यांचा सामाजिक, शैक्षणिक व आदिवासी विकास क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल विशेष गौरव करण्यात आला. त्यांना महाराष्ट्र शासनाचा आदिवासी विकास विभागाचा सर्वोत्कृष्ट मानला जाणारा आदिवासी सेवक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त असल्याने त्यांनी महाराष्ट्रासह देश-विदेशात केलेल्या समाजसेवेच्या कार्याची दखल घेऊन त्यांना ग्लोबल आयकॉन अवॉर्ड २०२६ प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार त्यांच्या दीर्घकालीन समाजसेवा, आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी केलेले कार्य आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील योगदानाचा गौरव करणारा ठरला. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला आणि उपस्थित मान्यवरांनी समाजहितासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाचे कौतुक केले. हार्दिक अभिनंदन! ग्लोबल रिसर्च सेंटर गोवा यांच्या वतीने डी.लिट.डॉ. व्ही. व्ही. पोपेरे आदिवासी सेवक (महाराष्ट्र शासन) राष्ट्रीय उपाध्यक्ष, भारत-नेपाळ मैत्री फोरम वैश्विक परिषद,नवी दिल्ली. यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्यावर अभिनंदन करण्यात आले. या कार्यक्रमाकरीता देश-विदेश व देशातील सर्व राज्यातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम मोठ्या उत्साहात पंजिम गोवा येथे संपन्न झाला

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हर घर तिरंगा’ उपक्रमात उल्हासनगरकरांनी सहभागी व्हावे – महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे

१३ ते १५ ऑगस्टदरम्यान घर, कार्यालये, कारखाने व शैक्षणिक संस्थांवर तिरंगा फडकविण्याचे आवाहन उल्हासनगर  दि. ११ ( प्रमोद दळवी )  : भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर...

उल्हासनगर शहराचा ७७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा : शहराच्या विकासाचा संकल्प; आधुनिक सुविधा,...

उल्हासनगर दि. ८ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर शहराचा ७७ वा वर्धापन दिन शनिवारी ८ ऑगस्ट २०२६ रोजी उल्हासनगर महानगरपालिकेच्या मागील बाजूस असलेल्या...

उल्हासनगरच्या ७७ व्या स्थापना दिनानिमित्त शिक्षादानाचा अनोखा उपक्रम; नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

उल्हासनगर दि.७ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर शहराच्या ७७ व्या स्थापना दिनानिमित्त शनिवार, ८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता स्विमिंग पूल, विराट...

RRR पुन्हा एकत्र; शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य, संघटनेच्या एकजुटीला नवी बळकटी

उल्हासनगर दि. ७ (प्रमोद दळवी ) : उल्हासनगरच्या शिवसेनेच्या राजकारणात महत्त्वाची मानली जाणारी एक भावनिक आणि प्रेरणादायी घटना नुकतीच घडली. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते राजेंद्रसिंह...

नवीन कोकण एक्सप्रेसला मंजुरी दिल्याबद्दल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा शिवसेनेच्या वतीने सत्कार

- खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने कोकणवासीयांच्या वतीने मानले आभार नवी दिल्ली दि. ४  : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोडदरम्यान नियमित...

error: Content is protected !!