Homeशहरटिटवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडला शीर नसलेल्या तरुणाचा मृतदेह

टिटवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडला शीर नसलेल्या तरुणाचा मृतदेह

टिटवाळा दि २९ ( प्रमोद दळवी )  : टिटवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नालंबी अंबरनाथ रोड परिसरातील झाडाझुडपात २५ ते ३० वयोगटातील एका तरुणाचा अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करून त्या तरुणाचा शीर नसलेला मृतदेह पोलिसांना मिळून आला आहे. या घटनेमुळे टिटवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकच खळबळ उडाली  असून क्रूरपणे हत्या करण्यात आलेल्या त्या अज्ञात तरुणाची ओळख पटण्यासाठी पोलिसांनी तपास कार्य सुरू केले आहे. या भयानक घटनेमुळे टिटवाळा परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार टिटवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नालंबी अंबरनाथ रोड जवळील झाडाझुडपात एका अज्ञात तरुणाचा मुंडके नसलेला मृतदेह पडलेला असल्याची माहिती टिटवाळा पोलिसांना सकाळी मिळतात पोलीस निरीक्षक कदम यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली.त्या ठिकाणी एका अज्ञात तरुणाचा अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या केलेला मृतदेह पडलेला पोलिसांना मिळून आला. त्या अज्ञात तरुणाचे मुंडके धडापासून वेगळे केलेले होते. मृतदेहाजवळ ते मुंडके नसल्यामुळे कोणीतरी अज्ञात मारेकऱ्याने त्या अज्ञात तरुणाची हत्या केल्यावर त्याची ओळख पटू नये या दृष्टिकोनातून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मुंडके नसलेला मृतदेह त्या ठिकाणी आणून टाकला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिसांनी त्या अज्ञात तरुणाच्या मृतदेहाचा पंचनामा करून तो मृतदेह पोस्टमार्टम साठी उल्हासनगरतील मध्यवर्ती रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलीस त्या अज्ञात तरुणाच्या मृतदेहाच्या मुंडक्याचे सर्वत्र शोध घेत आहेत.

कोणीतरी अज्ञात मारेकरांनी कोणत्यातरी धारदार हत्यारणे त्या अज्ञात तरुणाचे मुंडके छाटून त्याची हत्या करण्यात आले असल्याचे घटनास्थळाच्या पाहणी वरून पोलिसांना दिसून आले आहे. याप्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत. याशिवाय त्या हत्या करण्यात आलेल्या अज्ञात तरुणाच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी तपास कार्य सुरू केले आहे. त्या अज्ञात तरुणाबाबत कोणाला काय माहिती असल्यास टिटवाळा पोलीस ठाण्याची संपर्क साधावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या घटनेमुळे टिटवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकच खळबळ उडाली आहे. मृतदेहाच्या अंगावरील कपड्यावरून पोलिसांनी तपास कार्याला सुरुवात केली आहे. हत्या करण्यात आलेल्या त्या तरुणाला त्या ठिकाणी आणून ठार मारण्यात आले की दुसऱ्या ठिकाणी ठार मारून त्याचा मृतदेह त्या ठिकाणी आणून टाकला आहे का याचाही तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘भारताच्या भविष्यासाठी’: NEET पेपर लीकच्या निषेधार्थ युवराज सिंगने ‘संवाद’ करण्याचे आवाहन केले | मैदानाबाहेर...

युवराज सिंगने NEET निषेधावर मनापासून संदेश शेअर केला नवी दिल्ली: भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याने कथित NEET परीक्षेच्या पेपर लीकवर सुरू असलेल्या...

साडीवरून भांडण झाल्यावर महिलेने पतीची हत्या, हृदयविकाराचा झटका म्हणून खून करण्याचा प्रयत्न

ठाणे : बदलापूर पूर्व येथे साडीवरून झालेल्या घरगुती वादाचे पर्यवसान एका हत्येमध्ये झाले असून, ३० वर्षीय महिलेला प्रेशर कुकरच्या झाकणाने पतीने गळा...

या पावसाळ्यात विषाणूजन्य डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे रुग्णालयांनी नोंदवले...

संपूर्ण शहरातील क्लिनिकमध्ये आठवड्यातून डझनभर नवीन प्रकरणे नोंदवली जात आहेत, ज्यात मुले, वृद्ध आणि रोगप्रतिकारशक्ती विशेषत: असुरक्षित आहे. पुणे: शहरातील रुग्णालये या पावसाळ्यात...

कमी वाटत आहे? या 5 सोप्या सवयी तुम्हाला 15 मिनिटांपेक्षा कमी वेळात बरे वाटू...

या पाच साध्या सवयी 15 मिनिटांत तुमचा मूड उंचावण्यास मदत करू शकतात. आपल्या सर्वांना असे दिवस असतात जेव्हा सर्वकाही थोडे जास्त वाटते. एक...

लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये अडथळा ठरत असल्याच्या संशयातून ७ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या; अंबरनाथमधील तरुण अटकेत

अंबरनाथ, दि. २२ ( प्रमोद दळवी ) : अंबरनाथमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या महिलेच्या सात वर्षीय मुलाची अमानुष मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना...

error: Content is protected !!