उल्हासनगर दि. २२ ( प्रमोद दळवी ) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद, ठाणे तथा उल्हासनगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय ‘सुब्रतो फुटबॉल कप’ २०२६-२७ स्पर्धा २१ ते २२ जुलै २०२६ या कालावधीत उल्हासनगर-१ येथील रामलीला मैदान, सरला बिर्ला हायस्कूल येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या.

उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त श्रीमती मनिषा आव्हाळे, अतिरिक्त आयुक्त डॉ. धिरज चव्हाण, उपआयुक्त (क्रीडा) श्रीमती विशाखा मोटघरे तसेच सहाय्यक आयुक्त श्रीमती अलका पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. स्पर्धेत १५ वर्षांखालील मुले तसेच १७ वर्षांखालील मुले व मुली या गटांतील जिल्ह्यातील विविध शाळांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेतील अंतिम निकालानुसार “सुब्रतो फुटबॉल कप” स्पर्धेत सरला बिर्ला शाळेतील १५ वर्षेखालील मुले व १७ वर्षाखालील मुलींनी प्रथम क्रमांकाने विजय मिळवला आहे. व श्रीमती. सी. एच. एम. कॉलेज मधिल मुलांचा संघ प्रथम क्रमांकाने विजय झाला.

स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास उल्हासनगरच्या महापौर श्रीमती अश्विनी कमलेश निकम, क्रीडा व सांस्कृतिक समितीच्या सभापती श्रीमती प्रीती विनोद माखीजा, प्रभाग समिती क्र. ४ च्या सभापती श्रीमती सुहाना रवि जेसवानी, नगरसेविका श्रीमती अनंता रूपचंदानी, श्रीमती वंदना भदाणे, नगरसेवक श्री दुर्गा राय, तसेच सरला बिर्ला हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती विद्याराणी गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघांना ट्रॉफी व पारितोषिकांचे वितरण क्रीडा व सांस्कृतिक समितीच्या सभापती श्रीमती प्रीती विनोद माखीजा, क्रीडा विभाग प्रमुख श्री अजित गोवारी, श्री शांताराम चौधरी, समाजसेवक श्री विनोद माखीजा, श्री प्रमोद पारसी, श्री संजय ढमाळे, श्री सतिश राजगुरू, श्री प्रफुल सर, श्री सुभाष कोंढारी, श्री सागर खैरनार, श्री निखिल सियोता, श्री मयूर खंडारे, श्री निलेश आरेकर, श्रीमती छाया महाजन, भेरे मॅडम तसेच श्री उदय पवार यांच्या हस्ते करण्यात आले.स्पर्धेदरम्यान खेळाडूंनी उत्कृष्ट क्रीडाकौशल्य, शिस्त व सांघिक खेळाचे दर्शन घडविले. संपूर्ण स्पर्धा आनंददायी, उत्साही आणि क्रीडामय वातावरणात यशस्वीरित्या पार पडली. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा विभाग, आयोजक, पंच, प्रशिक्षक, स्वयंसेवक तसेच सहभागी शाळांनी मोलाचे योगदान दिले. याबाबतची माहिती उल्हासनगर महानगरपालिकेच्या जनसंपर्क अधिकारी प्राजक्ता कुलकर्णी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.





























