Homeताज्या बातम्याकठोर कारवाई करून आतंकवाद्यांना कायमचा धडा शिकवा : ठाणे येथे विविध...

कठोर कारवाई करून आतंकवाद्यांना कायमचा धडा शिकवा : ठाणे येथे विविध मागण्या करत हिंदु जनजागृती समितीचे आंदोलन

ठाणे  दि.२६ :  काश्मीर खोर्‍यामध्ये व्यापक‘कोंबिंग ऑपरेशन’ राबवून अतिरेक्यांचा बीमोड करावा, ज्या परिसरातून सतत अतिरेकी आक्रमणे होत आहेत, तेथे कायमस्वरूपी लष्करी तळ उभारण्यात यावेत. काश्मीरमधील उरलेले हिंदू पर्यटक, व्यावसायिक आणि हिंदु पंडित यांचे जीवित रक्षण करण्यासाठी विशेष सुरक्षा आराखडा लागू करण्यात यावा तसेच भारत सरकारने जिहादी आतंकवाद्यांना आणि त्यांच्या भारतातील हस्तकांना जन्माची अद्दल घडेल, अशी कठोर सैन्य कारवाई करत कायमचा धडा शिकवावा अशा विविध मागण्या करत हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी ठाणे येथे आंदोलन केले. या आंदोलनात राष्ट्रप्रेमी नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

ठाणे पश्चिम येथील सॅटीस पुलाखाली २६ एप्रिलला सायंकाळी ५.३० वाजता केलेल्या आंदोलनात करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी पाकिस्तानच्या निषेधाचे फलक हातात धरले होते. त्यावेळी आंदोलनकर्त्यांनी काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा, मोदीजी घुसके मारो देश तुम्हारे साथ है., वंदे मातरम, भारत मातेचा विजय असो, अशा घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनात बजरंग दल, अखिल भारत हिंदु महासभा, सहयोग गोविंदा पथक, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती या संघटनांच्या प्रतिनिधींसह राष्ट्रप्रेमी नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. त्यावेळी शासनाला देण्यात येणाऱ्या निवेदनावर नागरिकांनी उस्फुर्तपणे स्वाक्षऱ्या केल्या.

या हल्ल्यात बळी पडलेले २८ पर्यटक देशभरातील विविध राज्यांतील असल्याने यातून संपूर्ण देशभरात दहशत माजवण्याचा दहशतवाद्यांचा उद्देश स्पष्ट होतो. हत्येचे जे व्हिडिओ आणि छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसारित झाली आहेत, ती पाहिल्यानंतर ही क्रूरता मानवतेलाही लाजवणारी आहे. गेल्या काही काळात हिंदु व्यावसायिक, कर्मचारी, काश्मीरी हिंदूंवर सातत्याने हल्ले होत आहेत. केंद्र सरकारने ३७० कलम रद्द करून काश्मीरला भारतीय घटनेच्या संपूर्ण चौकटीत आणले, निवडणुका घेतल्या, विकासाचे प्रयत्न केले; पण तरीसुद्धा जिहादी अतिरेकी कारवाया थांबायला तयार नाहीत. तसेच असे भीषण दहशतवादी हल्ले स्थानिकांच्या सहभागाशिवाय होणे शक्य नाही. वर्ष १९९० मध्ये ९० हजार हिंदूंची हत्या आणि साडेचार लाख काश्मिरी हिंदूंचे बलपूर्वक विस्थापन अशाच पद्धतीने करण्यात आले होते. आता ही आक्रमणे याच षड्यंत्राचा पुढचा भाग आहेत. त्यामुळे या हल्ल्यात कोणत्या संघटना, नेते वा जिहादी आतंकवादी सहभागी आहेत, हे शोधून त्यांच्यावर ‘दशहतवादविरोधी कायद्यांअंतर्गत कठोर कारवाई करून कायमचा धडा शिकवला पाहिजे, अशी मागणी समितीने केली आहे. अशी माहिती हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ता डॉ. उदय धुरी यांनी दिली .

­­­

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

96 वर्षात प्रथमच, स्पेन विरुद्ध अर्जेंटिना विश्वचषक फायनलच्या आधी फिफाने विशेष पुरस्काराचे अनावरण केले...

FIFA ने ऐतिहासिक विश्वचषक चॅम्पियनशिप रिंगचे अनावरण केले (प्रतिमा: X) FIFA विश्वचषक स्पर्धेच्या 96 वर्षांच्या इतिहासात प्रथमच, चॅम्पियन्सना विशेष FIFA विश्वचषक चॅम्पियनशिप रिंग...

डीआरआयने मुंबई विमानतळावर ₹7.49 कोटी सोन्याची तस्करी करणाऱ्या सिंडिकेटचा पर्दाफाश; सहा अटक | मुंबई...

डीआरआयच्या म्हणण्यानुसार, अटक आरोपींनी कबूल केले की ते सोने तस्करी करणाऱ्या सिंडिकेटच्या हँडलरच्या सूचनेनुसार काम करत होते. मुंबई: महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) छत्रपती...

महाराष्ट्रातील बहुतांश भागात जुलै अखेरपर्यंत सरासरीपेक्षा कमी पाऊस, राज्यांचा IMD चा विस्तारित अंदाज |...

वायव्य बंगालच्या उपसागरावर आणि लगतच्या उत्तर ओडिशा-पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावरील सुप्रसिद्ध कमी दाबाच्या क्षेत्राचा महाराष्ट्राला मर्यादित लाभ मिळण्याची अपेक्षा आहे, असे आयएमडीने म्हटले आहे....

ऑस्कर वाइल्डचा दिवसाचा कोट: “हे असे आहे कारण मानवतेला ती कुठे जात आहे हे...

ऑस्कर वाइल्डच्या शहाणपणावर प्रकाश टाकला आहे की मानवी प्रगती अनेकदा अचूक गंतव्यस्थान माहित नसल्यामुळे उद्भवते. अनिश्चितता शोध आणि सर्जनशील समस्या सोडवण्यास प्रोत्साहित करते,...

NCP (SP) NDA कडे झुकण्याची चिन्हे दिल्यानंतर NCP मध्ये अस्वस्थता | पुणे बातम्या

शरद पवार, सुनेत्रा पवार पुणे : शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) एनडीएकडे झुकण्याचे संकेत मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे.पवारांचा पक्ष एनडीएमध्ये...

error: Content is protected !!