Homeशहरउल्हासनगरात १ ऑगस्ट २०२६ पासून रिक्षाचालकांना प्रवाशांशी मराठी भाषेत संवाद साधने अपेक्षित...

उल्हासनगरात १ ऑगस्ट २०२६ पासून रिक्षाचालकांना प्रवाशांशी मराठी भाषेत संवाद साधने अपेक्षित : युनियन मार्फत रिक्षा चालकांना प्रशिक्षण व मार्गदर्शन: बैठकीत निर्णय

उल्हासनगर दि.१८ ( प्रमोद दळवी ) :महाराष्ट्राचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशानुसार व कल्याण आर.टी.ओ. यांच्या निर्देशांच्या अनुषंगाने शिवसेना गटनेते तथा सभागृह नेते अरुण अशान यांच्या उ.म.पा गटनेता कार्यालय, उल्हासनगर महानगरपालिका येथे उल्हासनगर रिक्षा युनियनची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती.

१ ऑगस्ट २०२६ पासून रिक्षाचालकांना प्रवाशांशी मूलभूत मराठी भाषेत संवाद साधणे अपेक्षित असल्याच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. या उपक्रमासाठी कोकण मराठी साहित्य परिषद यांचे विशेष सहकार्य लाभणार असून, प्रा. डॉ. प्रदीप ढवळ व सौ. नमिता कीर यांनी मराठी भाषा प्रशिक्षण, संवाद कौशल्य विकास आणि जनजागृती मोहिमेबाबत मार्गदर्शन केले. यावेळी उल्हासनगर रिक्षा युनियनचे अध्यक्ष हरजिंदरसिंह भुल्लर (विक्की) यांनी रिक्षाचालक बांधवांना शासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले. तसेच मराठी भाषा शिकण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण, मार्गदर्शन व सहकार्य युनियनमार्फत उपलब्ध करून दिले जाईल असे सांगितले. बैठकीत मोफत मराठी संभाषण वर्ग, प्रशिक्षण शिबिरे, जनजागृती अभियान आणि मार्गदर्शन सत्रे आयोजित करण्याबाबतही निर्णय घेण्यात आला.

त्यावेळी अरुण अशान ( शिवसेना गटनेते / सभागृह नेते ), हरजिंदरसिंह भुल्लर (विक्की) – अध्यक्ष उल्हासनगर रिक्षा युनियन, शेखर यादव, प्रा. डॉ. प्रदीप ढवळ (कोकण मराठी साहित्य परिषद) ,सौ. नमिता कीर ( कोकण मराठी साहित्य परिषद), सौ. साक्षी सर्वे ( नगरसेविका) ,सौ. मीना सौंडे ( नगरसेविका) , प्रकाश माळी ( समन्वयक) ,शिवसेना विभागप्रमुख .प्रमोद पांडेय व अन्य यावेळी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मध्यवर्ती रुग्णालयात पहिली एंडोस्कोपिक सेप्टोप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वी : उल्हासनगरच्या आरोग्यसेवेत अत्याधुनिक सुविधेची भर

उल्हासनगर दि. १३ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयातील वैद्यकीय सेवांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा आणि अभिमानास्पद टप्पा गाठण्यात आला आहे. शासकीय वैद्यकीय...

‘हर घर तिरंगा २०२६’ अभियानांतर्गत उल्हासनगरमध्ये भव्य बाईक रॅली : राष्ट्रभावनेचा जागर

उल्हासनगर दि. १३ ( प्रमोद दळवी ) : ‘हर घर तिरंगा २०२६’ अभियानांतर्गत नागरिकांमध्ये राष्ट्रभावना निर्माण व्हावी, देशप्रेमाची भावना वृद्धिंगत व्हावी तसेच राष्ट्रीय ध्वजाबद्दल...

एक हात मदतीचा सामाजिक संस्थेच्या मागणीला यश ; महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना लवकरच गणवेश व...

उल्हासनगर दि.१३ ( प्रमोद दळवी )  : शाळा सुरू होऊन जवळपास दीड महिना उलटूनही उल्हासनगर महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश व आवश्यक शैक्षणिक साहित्य...

अंबरनाथमध्ये गाळ्याच्या वादातून भाजप-मनसे कार्यकर्ते भिडले; पोलीस ठाण्याच्या आवारात वाहनाची तोडफोड,मनसे शहराध्यक्ष शैलेश शिर्के...

अंबरनाथ दि. १२ ( प्रमोद दळवी )  : अंबरनाथ पूर्वेकडील शिवाजीनगर परिसरात गाळ्याच्या जुन्या वादातून भाजप आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद होऊन हाणामारी झाल्याची...

पावसाळ्यातील साथीच्या आजारांवर उल्हासनगर मनपाची प्रभावी कार्यवाही : शहरात सध्या एकही डेंग्यू पॉझिटिव्ह...

उल्हासनगर दि. १२ ( प्रमोद दळवी )  : पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, टायफॉईड यांसारख्या साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन उल्हासनगर महानगरपालिका आरोग्य...

error: Content is protected !!