Homeशहरउल्हासनगरच्या ७७ व्या स्थापना दिनानिमित्त शिक्षादानाचा अनोखा उपक्रम; नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

उल्हासनगरच्या ७७ व्या स्थापना दिनानिमित्त शिक्षादानाचा अनोखा उपक्रम; नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

उल्हासनगर दि.७ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर शहराच्या ७७ व्या स्थापना दिनानिमित्त शनिवार, ८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता स्विमिंग पूल, विराट अंबे स्पोर्ट्स क्लब, उल्हासनगर महानगरपालिका मुख्यालयाच्या मागे, कॅम्प क्र. ३ येथे स्थापना दिनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

यंदाच्या स्थापना दिनानिमित्त “शिक्षादान अभियान” हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असून, कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाने फुलहार आणण्याऐवजी एक वही (रजिस्टर) आणि एक पेन सोबत आणून या अभियानात सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजक दिलीप मालवणकर, शशिकांत दायमा यांनी केले आहे. संकलित करण्यात येणारे शैक्षणिक साहित्य गरजू विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहे. कार्यक्रमामध्ये उल्हासनगरच्या स्थापना शिलालेखास अभिवादन करून शहराच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकजुटीचा संकल्प करण्यात येईल.

उल्हासनगर हे महाराष्ट्रातील स्वतःचा स्थापना दिवस साजरा करणारे पहिले शहर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे या ऐतिहासिक दिवसाचे महत्त्व लक्षात घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहून शहराला अभिवादन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

RRR पुन्हा एकत्र; शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य, संघटनेच्या एकजुटीला नवी बळकटी

उल्हासनगर दि. ७ (प्रमोद दळवी ) : उल्हासनगरच्या शिवसेनेच्या राजकारणात महत्त्वाची मानली जाणारी एक भावनिक आणि प्रेरणादायी घटना नुकतीच घडली. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते राजेंद्रसिंह...

नवीन कोकण एक्सप्रेसला मंजुरी दिल्याबद्दल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा शिवसेनेच्या वतीने सत्कार

- खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने कोकणवासीयांच्या वतीने मानले आभार नवी दिल्ली दि. ४  : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोडदरम्यान नियमित...

उल्हासनगरातील सात मजली ‘आशालोक’ इमारतीला भीषण आग : ४९ फ्लॅटधारकांची सुखरूप सुटका, आठ दुचाकी...

उल्हासनगर, दि. ४ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर शहरातील कॅम्प - ४ परिसरातील नेताजी चौक ते व्हीनस चौकदरम्यान असलेल्या सात मजली आशालोक को-ऑपरेटिव्ह...

मुसळधार पावसाने अंबरनाथमध्ये घर नाल्यात कोसळले : आमदार डॉ. बालाजी किणीकर यांची तातडीने धाव,...

अंबरनाथ दि. ४ ( प्रमोद दळवी )  : अंबरनाथ पूर्व येथील कोकण नगर परिसरात सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली....

उल्हासनगर-१ मधील FIT & PRO Unisex Gym चे भव्य उद्घाटन; युवासेना लोकसभा सचिव हरजिंदरसिंह...

उल्हासनगर दि ३ (प्रमोद दळवी ) : उल्हासनगर  कॅम्प नं - १ येथील सी ब्लॉक परिसरात अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज FIT & PRO Unisex Gym...

error: Content is protected !!