डोंबिवली दि.२९ : डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन प्रस्तुत आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ, डोंबिवली आयोजित “रासरंग २०२५” उत्सवामध्ये यंदाही महिला-भगिनींसाठी खास भोंडला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम परंपरागत गरबा-भोंडला उत्सवाच्या भक्तीभाव, आनंद आणि उत्साहाने परिपूर्ण वातावरणात रविवारी साजरा करण्यात आला. यावेळी मराठी अभिनेत्री रुपाली भोसले यांनी या भोंडला कार्यक्रमाला मुख्य उपस्थित लावली आणि महिला भगिनीं समवेत कार्यक्रमाचा आनंद घेतला. यावेळी उत्सवामध्ये सहभागी महिलांसाठी विविध खेळ आणि विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या विजेत्यांना विविध आकर्षक बक्षिसे देऊन गौरवण्यात आले, ज्यामुळे उत्सवातील आनंद आणि स्पर्धात्मक उत्साह दुप्पट झाला.

खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातुन आयोजित करण्यात आलेल्या रासरंग – २०२५ गरबा उत्सवाला मोठ्या संख्येने गरबा रसिक उपस्थित राहून या गरबा उत्सवाचा आनंद घेत आहे. याच अंतर्गत महिलांसाठी दरवर्षीप्रमाणे भोंडला कार्यक्रमाचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. भोंडला हा पारंपरिक खेळ असून, विशेषतः नवरात्रीच्या सणासोबत साजरा केला जातो. भोंडला खेळात महिलांकडून गटबद्ध पद्धतीने किंवा स्वतंत्रपणे नृत्य केले जाते. प्रत्येक तालावर आणि संगीताच्या लयीत सहभागी महिला सुंदर नृत्य करून उत्सवाच्या रंगात भर घालतात. यामध्ये केवळ नृत्यच नाही तर समूहाची एकात्मता, तालमेल आणि आनंदाची अनुभूतीही महत्त्वाची असते.

याच पार्श्वभूमीवर डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन प्रस्तुत आणि श्री नवदुर्गा युवा मंडळाच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. यंदाच्या कार्यक्रमाला मराठी अभिनेत्री रुपाली भोसले उपस्थित होत्या. त्यांनी मुख्य उपस्थिती लावत देवीची आराधना केली तसेच महिला-भगिनींसोबत भोंडला खेळून कार्यक्रमाचा उत्साह दुप्पट केला. त्यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण कार्यक्रम अधिकच रंगतदार, संस्मरणीय आणि उत्साहपूर्ण ठरला. महिला भगिनींना दैनंदिन जीवनातून वेळ काढून अशा पद्धतीने उत्सव साजरा करता यावा यासाठी दरवर्षी हा उपक्रम आयोजित करण्यात येतो. याव्यतिरिक्त उत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम, गायन, नृत्य व विविध सर्जनशील स्पर्धा आयोजित करून महिला-भगिनींच्या प्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येते. यंदाही भोंडल्याच्या निमित्ताने महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यातील विजेत्यांना सोन्याची नथ, पैठणी तसेच गृहपयोगी वस्तू बक्षीस म्हणून देण्यात आल्या.





























