Homeताज्या बातम्या“रासरंग २०२५” अंतर्गत रंगला भोंडला कार्यक्रम :- भोंडला कार्यक्रमाला लाभली रुपाली भोसले...

“रासरंग २०२५” अंतर्गत रंगला भोंडला कार्यक्रम :- भोंडला कार्यक्रमाला लाभली रुपाली भोसले यांची मुख्य उपस्थिती

डोंबिवली दि.२९ : डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन प्रस्तुत आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ, डोंबिवली आयोजित “रासरंग २०२५” उत्सवामध्ये यंदाही महिला-भगिनींसाठी खास भोंडला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम परंपरागत गरबा-भोंडला उत्सवाच्या भक्तीभाव, आनंद आणि उत्साहाने परिपूर्ण वातावरणात रविवारी साजरा करण्यात आला. यावेळी मराठी अभिनेत्री रुपाली भोसले यांनी या भोंडला कार्यक्रमाला मुख्य उपस्थित लावली आणि महिला भगिनीं समवेत कार्यक्रमाचा आनंद घेतला. यावेळी उत्सवामध्ये सहभागी महिलांसाठी विविध खेळ आणि विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या विजेत्यांना विविध आकर्षक बक्षिसे देऊन गौरवण्यात आले, ज्यामुळे उत्सवातील आनंद आणि स्पर्धात्मक उत्साह दुप्पट झाला.

खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातुन आयोजित करण्यात आलेल्या रासरंग – २०२५ गरबा उत्सवाला मोठ्या संख्येने गरबा रसिक उपस्थित राहून या गरबा उत्सवाचा आनंद घेत आहे. याच अंतर्गत महिलांसाठी दरवर्षीप्रमाणे भोंडला कार्यक्रमाचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. भोंडला हा पारंपरिक खेळ असून, विशेषतः नवरात्रीच्या सणासोबत साजरा केला जातो. भोंडला खेळात महिलांकडून गटबद्ध पद्धतीने किंवा स्वतंत्रपणे नृत्य केले जाते. प्रत्येक तालावर आणि संगीताच्या लयीत सहभागी महिला सुंदर नृत्य करून उत्सवाच्या रंगात भर घालतात. यामध्ये केवळ नृत्यच नाही तर समूहाची एकात्मता, तालमेल आणि आनंदाची अनुभूतीही महत्त्वाची असते.

याच पार्श्वभूमीवर डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन प्रस्तुत आणि श्री नवदुर्गा युवा मंडळाच्या वतीने  हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. यंदाच्या कार्यक्रमाला  मराठी अभिनेत्री रुपाली भोसले उपस्थित होत्या. त्यांनी मुख्य उपस्थिती लावत देवीची आराधना केली तसेच महिला-भगिनींसोबत भोंडला खेळून कार्यक्रमाचा उत्साह दुप्पट केला. त्यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण कार्यक्रम अधिकच रंगतदार, संस्मरणीय आणि उत्साहपूर्ण ठरला. महिला भगिनींना दैनंदिन जीवनातून वेळ काढून अशा पद्धतीने उत्सव साजरा करता यावा यासाठी दरवर्षी हा उपक्रम आयोजित करण्यात येतो. याव्यतिरिक्त उत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम, गायन, नृत्य व विविध सर्जनशील स्पर्धा आयोजित करून महिला-भगिनींच्या प्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येते. यंदाही भोंडल्याच्या निमित्ताने महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यातील विजेत्यांना सोन्याची नथ, पैठणी तसेच गृहपयोगी वस्तू बक्षीस म्हणून देण्यात आल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कबाला की फिफाचे नियम? मेस्सीचा अर्जेंटिना इंग्लंड विरुद्ध उपांत्य फेरीसाठी ‘लकी’ नेव्ही ब्लू जर्सी...

जॉर्डन विरुद्ध नेव्ही ब्लू जर्सीमध्ये लिओनेल मेस्सी (प्रतिमा: एक्स) गतविजेता अर्जेंटिना FIFA विश्वचषक 2026 च्या उपांत्य फेरीत इंग्लंडबरोबर आणखी एक ब्लॉकबस्टर शत्रुत्वासाठी सज्ज...

व्हिएतनाम स्पीडबोट दुर्घटना: 15 भारतीय पर्यटकांचे पार्थिव आज मायदेशी रवाना

मुंबई: व्हिएतनामच्या फु क्वोक बेटावर गेल्या आठवड्यात झालेल्या स्पीडबोट दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या १५ भारतीय नागरिकांचे पार्थिव मंगळवारी सहा देशांतर्गत उड्डाणांनी मुंबईहून त्यांच्या...

‘मेरी पूरी दुनिया चली गई’: केतन अग्रवालच्या आईने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून न्याय...

केतन अग्रवालच्या आईने पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक भावनिक पत्र लिहिले आहे पुणे : पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालची आई राखी अग्रवाल हिने पंतप्रधान नरेंद्र...

काचेची त्वचा हवी आहे? नैसर्गिकरित्या निरोगी, चमकदार त्वचेसाठी दररोज ही 5 पेये पिणे सुरू...

हे रंगीबेरंगी पेय सौंदर्य प्रेमींमध्ये आणि चांगल्या कारणास्तव आवडते बनले आहे.गाजरात बीटा-कॅरोटीन मुबलक प्रमाणात असते, तर बीटरूटमध्ये अँटिऑक्सिडंट, फोलेट आणि व्हिटॅमिन सी असते. त्वचेचे...

मोशी शोकांतिका: PCMC ने डब्ल्यूटीई प्लांट प्रकल्प प्रमुख, सुरक्षा अधिकारी दोषी हत्येचा गुन्हा दाखल...

कचऱ्याच्या ढिगाऱ्याने प्रशासकीय इमारतीतील अनेक कामगार अडकून पडल्याची भीषण घटना उघडकीस आली. पुणे: मोशी कचरा डेपो दुर्घटनेत नऊ जणांचा बळी गेल्याच्या पाच दिवसांनंतर...

error: Content is protected !!