अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी
नाशिक दि.१५: अवकाळी पावसामुळे घराचे पत्रे उडून जखमी झालेल्या शेतकरी कुटुंबियांना उपचारार्थ तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या.

येवला तालुक्यातील गवंडगाव येथे अवकाळी पावसामुळे यांच्या घराचे पत्रे उडून झालेले नुकसानीची पाहणी तसेच यामुळे जखमी झालेल्या त्यांच्या कुटुंबियांचीविचारपूस मंत्री भुजबळ यांनी केली, त्यावेळी ते बोलत होते.यावेळी उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे, नायब तहसीलदार पंकज नेवसे, तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

तकऱ्यांना बियाणे व ट्रॅक्टरचे वाटप
राष्ट्रीय गळीत धान्य विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना भुईमूग(१५५ क्विंटल), सोयाबीन (९५ क्विंटल) बियाण्यांचे वाटप मंत्री भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच शेतकरी बाळू कदम, सोमठाणा देश, असराबाई खांडेकर, नगरसुल, कानिफनाथ वारे, पाटोदा यांना राज्य कृषी पुरस्कृत यांत्रिक यांत्रिकरण योजनेतून ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले.






























