अंबरनाथ दि १९ ( प्रमोद दळवी ): अंबरनाथच्या भेंडी पाड्यात रस्त्याच्या बाजूला बसताना मांडलेल्या अनधिकृत चिकन विक्रेत्यांमुळे परिसरात मोठी दुर्गंधी पसरली आहे . या समस्या कडे अंबरनाथ नगरपालिका दुर्लक्ष करत असल्याने एका तरुणांने थेट गळ्यात कोंबडीच्या पायांची माळ आणि पिशवीत जैविक कचरा घेऊन पालिकेत प्रवेश केला. यामुळे अंबरनाथ नगरपालिकेत एकच खळब उडाली. यश जगले असे या तरुणाचं नाव असून तो अंबरनाथच्या नवीन भेंडी पाडा परिसरात राहतो.

नवीन भेंडी पाडा परिसरातील अनधिकृत चिकन विक्रेते यांचा जैविक कचरा थेट नाल्यात टाकून देतात. हा कचरा अंबरनाथ नगरपालिका उचलत नाही त्यामुळे या परिसरात मोठी दुर्गंधी पसरते. याबाबत यश जगले यांनी अनेकदा अंबरनाथ नगरपालिकेत तोंडी आणि लेखी तक्रारी केल्या मात्र त्याकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा त्याचा आरोप आहे. त्यामुळे सकाळी ते गळ्यात कोंबडींच्या पायांची माळ आणि पिशवीत चिकन वाल्यांचा जैविक कचरा घेऊन पालिकेत आले आणि थेट मुख्याधिकाऱ्यांच्या केबिन बाहेरच हा कचरा काढून ठेवला. त्यामुळे पालिकेत मोठी दुर्गंधी पसरली. जर पालिका स्वच्छ आहेत तर आम्ही दुर्गंधीत का राहावं पालिकेचे अधिकाऱ्यांनाही आम्ही कशा परिस्थितीत राहतो ते कळावं म्हणून आपण हा कचरा या ठिकाणी टाकल्याचं यश जगलं नाही सांगितलं.

परिसरातील नाल्यात चिकन वाले सडलेल्या कोंबड्याचे मास, कापलेले पाय मुंडके असे गोण्या भरून टाकत असतात. तो कचरा त्या ठिकाणाहून काढण्यात येत नाही. त्यामुळे त्या परिसरातील नाल्या चोकअप होत असतात व दुर्गंधीचे वातावरण देखील निर्माण होत असते. आता पावसाळा सुरू होणार आहे गेल्या तीन महिन्यापासून आरोग्य विभागाला लेखी तक्रार व तोंडी देखील सांगण्यात आले तरी देखील कोणतीच कारवाई करण्यात येत नाही. ते आश्वासन देतात की आम्ही साफसफाई करू पण साफसफाई केली जात नाही. याशिवाय मुख्याधिकारी देखील भेटत नव्हते. शेवटी मला हे अनोखे पद्धतीने आंदोलन करावे लागले असे यश जगले यांनी सांगितले. याशिवाय त्या ठिकाणी टाकण्यात आलेला कचरा उचलून या ठिकाणी मुख्याधिकारी यांना दाखवण्यासाठी आणला जर परिसरतील लोक या दुर्गंधी वातावरणात राहतात, मग तुम्ही का राहत नाही. तुमची यंत्रणा या ठिकाणी साफसफाई करतात मग त्या ठिकाणी साफसफाई का करत नाही. प्रत्येक वेळा पत्रव्यवहार करूनही त्याला दाद मिळत नाही मग पत्रव्यवहार करून फायदा काय. जर नगरपालिका स्वच्छ ठेवण्यात येते मग परिसर स्वच्छ का ठेवण्यात येत नाही असाही प्रश्न यश जगले यांनी मुख्याधिकारी यांना विचारला. नगरपालिका स्वच्छ असून फायदा नाही अंबरनाथ शहर देखील स्वच्छ असणे गरजेचे आहे असे देखील यश म्हणाले. परिसरात स्वच्छता का केली नाही असे मुख्याधिकारी यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला हवं असाही टोला यश जगले यांनी लगावला.

सुरक्षारक्षकांनी यश यांना पकडून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे नगरपालिकेमध्ये एकच खळबळ झाली. नगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मुख्याधिकारी यांनी यश यांच्यासोबत चर्चा केली त्यावेळी यश यांनी शहरातील बीएमसी रोडवर, नवीन भेंडी पाडा, गाडगे नगर या परिसरात मोठ्या संख्येने कचऱ्याचे ढीग जमा झालेले आहेत. मुख्याधिकारी यांनी यश जगले यांची सविस्तर माहिती ऐकून घेतल्यावर त्वरित ज्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले होते त्या ठिकाणी साफसफाई करण्याचे आदेश दिले. त्या ठिकाणी तुंबलेली गटारी देखील साफ करण्यात आली. यापूर्वी देखील यश जगले यांनी २१ मे ला अंबरनाथ नगरपालिकेत एका मेलेल्या कुत्र्याला सोबत आणून त्या ठिकाणी आंदोलनाला बसले होते. भटक्या कुत्र्यांसाठी शेल्टर होम बनवण्यासाठी मागणी केली होती. त्यावेळी नगरपालिकेने त्यांची मागणी मान्य केली होती.




























