Homeताज्या बातम्यागल्लीचे राजकारण करणाऱ्यांना दिल्ली आणि जगाचे काय कळणार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे...

गल्लीचे राजकारण करणाऱ्यांना दिल्ली आणि जगाचे काय कळणार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची उबाठा गटावर खरमरीत टीका

  • ऑपरेशन सिंदूरसंदर्भात केलेल्या परदेश दौऱ्याचा उलगडला अनुभव
  • विधानसभा हा ट्रेलर पूर्ण पिक्चर महापालिकेत दाखवू

मुंबई दि १९ : गल्लीत राजकारण करणाऱ्यांना दिल्ली आणि जगाचे काय करणार, अशी खरमरीत टीका शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उबाठा गटावर केली. वरळी डोम येथे आयोजित शिवसेनेच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार मिलिंद देवरा यांची ऑपरेशन सिंदूर आणि परदेश दौऱ्याचे अनुभव उलगडणारी प्रकट मुलाखत ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांनी घेतली. यावेळी खासदार डॉ. शिंदे यांनी परदेश दौऱ्यातील आठवणींना उजाळा दिला.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरनंतर भारताच्या १४० कोटी जनतेचा संदेश जगभरात पोहोचवण्यासाठी शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याची संधी मिळणे, ही आयुष्यातील मोठी संधी आहे. ती माझ्यासारख्या तरुणाला दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देतो. शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याबाबत जेव्हा केंद्र सरकारकडून विचारणा झाली तेव्हा मनात दडपण आले होते. देशाची बाजू आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडायचे आणि त्यात ज्येष्ठ नेत्यांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करणे ही मोठी गोष्ट होती. १४ दिवसांच्या या दौऱ्यात ज्येष्ठ नेत्यांकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. शिष्टमंडळातील सर्वच वयाने आणि अनुभवाने मोठे होते. यूएई, काँगो प्रजासत्ताक, सिएरा लिओन आणि लायबेरिया या देशांतील प्रमुखांशी चर्चा केली. दोन देशांच्या संसदेत भाषण करण्याची संधी मिळाली हा आपल्या कारकिर्दितील मोठा अनुभव असून तो भविष्यात नक्कीच फायदेशीर ठरेल, असा विश्वास खासदार डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला. परदेशात एका कार्यक्रमात शिष्टमंडळातील डॉ. सस्मित पात्रा यांनी भाषणात माझा उल्लेख भाऊ म्हणून केला होता. त्यानंतर शिष्टमंडळातील सर्वच सहकारी भाऊ बोलू लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भाऊ म्हणून उल्लेख केला आणि कामाचे कौतुक केले. यावरुन पंतप्रधान मोदी हे सातही शिष्टमंडळांच्या दौऱ्यावर बारीक लक्ष ठेवून होते, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले.

शिष्टमंडळांचा परदेश दौरा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून केल्याची टीका करणाऱ्यांचा खासदार डॉ. शिंदे यांनी खरपूस समाचार घेतला. त्यांना विधानसभेत ट्रेलर दाखवला आणि आता महापालिकेत पिक्चर दाखवू असा इशारा खासदार डॉ. शिंदे यांनी उबाठा गटाला दिला.

जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादी हल्ले बंद करणार नाही तोपर्यंत त्यांच्याशी कोणतीही चर्चा होणार नाही. दहशतवादाला भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला चोख उत्तर देण्याचे काम सरकारने केले. पूर्व आफ्रिकेतील देश हे इस्लामिक स्टेट ऑफ कोऑपरेशन या संघटनेचे सदस्य आहेत. पाकिस्तानसुद्धा या संघटनेचा सदस्य आहे. त्यामुळे या संघटनेतील इतर सदस्य देशांसमोर पाकिस्तानचा बुरखा फाडल्याने भविष्यात ते पाकिस्तानला पाठिंबा देणार नाहीत, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. अमेरिका आणि गयाना दौऱ्यातील अनुभव यावेळ खासदार मिलिंद देवरा यांनी सांगितले. अमिरिकेत गिटार वाजवण्यासाठी नाही तर पाकिस्तानची वाजवण्यासाठी गेलो होतो, असे खासदार देवरा म्हणाले. खासदारांच्या शिष्टमंडळांचे परदेश दौऱ्यांचे महत्व हे संजय राऊत आणि आसिफ मुनीर यांना कळणार नाही, कारण त्यांची ती कुवत नाही, अशी टीका खासदार देवरा यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उल्हासनगरसाठी २११.०६ कोटींच्या पाणीपुरवठा प्रकल्पाला मंजुरी; शहरवासीयांना मुबलक व शुद्ध पाणी मिळणार: खासदार श्रीकांत...

उल्हासनगर दि. १५ ( प्रमोद दळवी )  : केंद्र सरकारच्या अमृत अभियानांतर्गत उल्हासनगर शहरासाठी २११.०६ कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. या...

रेफरी पक्षपाती दाव्यांच्या दरम्यान अर्जेंटिनाला फिफा विश्वचषकातून बाहेर काढण्यासाठी 10 दशलक्षाहून अधिक स्वाक्षरी याचिका

अर्जेंटिनाला फिफा विश्वचषकातून बाहेर काढण्यासाठी 10 दशलक्षाहून अधिक स्वाक्षरी याचिका FIFA आणि सामना अधिकाऱ्यांवर लिओनेल मेस्सी आणि गतविजेत्याची बाजू घेत असल्याचा आरोप करून...

मुंबईच्या व्हीजेटीआयला पायाभूत योजनेसाठी माजी विद्यार्थ्यांकडून मिळालेली सर्वात मोठी देणगी; माजी विद्यार्थी 60 कोटी...

वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूटला सर्वात मोठे माजी विद्यार्थी देणगी मिळाली वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट (VJTI) ही राज्याच्या मालकीची स्वायत्त संस्था आहे जी विद्यापीठ...

केंद्राच्या परवडणाऱ्या घरांच्या योजनेसाठी मुळशी चराई भूमीविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली | पुणे बातम्या

पुणे : मुंबई उच्च न्यायालयाने राज्याला वळविण्याचा अधिकार असल्याचे सांगितले गायरान केंद्र किंवा राज्य सरकारच्या सार्वजनिक उद्देश/प्रकल्पांसाठी जमिनी (गावातील गुरांच्या मोफत चरण्यासाठी...

या 5 महाकाय पाळीव मांजरी इतक्या मोठ्या आहेत की लोक त्यांना जंगली प्राणी समजतात

नेहमीच एक मांजर आहे ज्याबद्दल लोक बोलणे थांबवू शकत नाहीत. ते असामान्यपणे फ्लफी आहे किंवा त्याचे डोळे निळे आहेत म्हणून नाही, तर त्याच्या आकारामुळे.काही...

error: Content is protected !!