उल्हासनगर दि.१७ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर शहरात विविध विकास कामे निधी उपलब्ध झाल्या नसल्यामुळे ती रखडली आहेत. या विविध विकास कामांना निधी उपलब्ध व्हावा यासाठी उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी यांनी अधिवेशन दरम्यान महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी भेट घेतली. त्यावेळी त्यांच्यासोबत उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त मनीषा आव्हाळे आदी मान्यवर उपस्थित होते

त्यावेळी उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी यांनी महानगरपालिकेची स्वातंत्र्य पाणी पुरवठा योजनाच्या प्रस्तावास मान्यता देणे ,१४० एमएलडी पाणी आरक्षित करणे तसेच उल्हासनगर शहरातील सर्व रस्ते सीसी होण्यासाठी निधी उपलब्ध करून देणे आणि इतर महत्वाच्या विषयावर चर्चा केली. तसेच उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी देखील या विकास कामासंदर्भात गिरीश महाजन यांच्याशी चर्चा केली.





























