Homeताज्या बातम्याउल्हासनगरात वाहतूक शाखेच्या दंडात्मक कारवाईला रिक्षाचालकांचा विरोध : समस्या न सुटल्यास...

उल्हासनगरात वाहतूक शाखेच्या दंडात्मक कारवाईला रिक्षाचालकांचा विरोध : समस्या न सुटल्यास रिक्षाचालकांची आंदोलनाची भूमिका

उल्हासनगर दि २६ ( प्रमोद दळवी ): उल्हासनगरात वाहतूक विभागाच्या पोलिसांनी ओवरसीट चालवणाऱ्या रिक्षाचालकांवर दहा हजार रुपयाची दंडात्मक कारवाईला सुरुवात केल्याने गेल्या आठवड्यात संताप झालेला रिक्षा चालकांनी रमाकांत चव्हाण रिक्षा युनियनचे अध्यक्ष हरजिंदरसिंह भुल्लर (विक्की भाई) यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक विभाग पोलीस कार्यालयावर धडक देत ही कारवाई न थांबल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर देखील वाहतूक पोलिसांनी जवळपास ६२ रिक्षाचालकांवर प्रत्येकी दहा हजार रुपयाची दंडात्मक कारवाई केल्याने अखेर उल्हासनगरातील रिक्षाचालकांमध्ये संताप्त वातावरण निर्माण झाले. पोलीस प्रशासनाच्या अन्यायकारक वागणुकीच्या विरोधात, व रिक्षा चालकांवरील अन्याय थांबवण्यासाठी हजारोच्या संख्येने रिक्षाचालकांनी वाहतूक विभाग पोलीस कार्यालयावर धडक देत ही कारवाई न थांबवल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

गेल्यात आठवड्यात वाहतूक विभागाच्या पोलिसांनी १०  रिक्षा चालकांवर प्रत्येकी दहा हजार रुपये दंडात्मक कारवाई केली होती. पण न्यायालयाने रिक्षाचालकांना दिलासा देत त्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये दंडात्मक कारवाई केली होती. त्याचवेळी वाहतूक विभागाच्या पोलिसांना रमाकांत चव्हाण रिक्षा युनियनचे अध्यक्ष हरजिंदरसिंह भुल्लर (विक्की भाई) व युनियनचे सरचिटणीस आप्पा कुलकर्णी यांनी वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई न थांबवल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला होता. पण त्यानंतर देखील ६२ रिक्षाचालकांवर ही दंडात्मक कारवाई केल्याने उल्हासनगरातील शेकडो रिक्षाचालकांनी विक्की भुल्लर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी वाहतूक पोलीस आयुक्त कार्यालयावर धडक देत वाहतूक विभागाचे पोलीस अधिकारी यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी ही कारवाई कायदेशीर असल्याचे व ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे सांगितले. त्यामुळे संतापलेल्या रिक्षाचालकांनी घोषणाबाजी करत आपला राग व्यक्त केला. दरम्यान युनियनचे पदाधिकाऱ्यांनी सोमवारी बैठक घेऊन बेमुदत बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. एकंदरीत पोलिसांच्या या दंडात्मक कारवाईमुळे रिक्षाचालकांमध्ये संतापाचे वातावरण  पसरले आहे.

आता रिक्षाचालकांचे पदाधिकारी कोणती भूमिका हाती घेणार याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन रिक्षाचालकांच्या समस्या मांडण्यात येणार असल्याचे विक्की भुल्लर यांनी सांगितले. पोलिसांनी रिक्षा चालकांवरील ही अन्यायकारक  दंडात्मक कारवाई थांबवली नाही तर रिक्षाचालकांनी बोंबाबोंब  आंदोलन व अर्धा चड्डी आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे. तसेच रमाकांत चव्हाण रिक्षा युनियनच्या वतीने वाहतूक विभागाच्या पोलीस अधिकारी यांना रिक्षा चालकाच्या समस्येचे निवेदन देण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उल्हासनगरसाठी २११.०६ कोटींच्या पाणीपुरवठा प्रकल्पाला मंजुरी; शहरवासीयांना मुबलक व शुद्ध पाणी मिळणार: खासदार श्रीकांत...

उल्हासनगर दि. १५ ( प्रमोद दळवी )  : केंद्र सरकारच्या अमृत अभियानांतर्गत उल्हासनगर शहरासाठी २११.०६ कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. या...

रेफरी पक्षपाती दाव्यांच्या दरम्यान अर्जेंटिनाला फिफा विश्वचषकातून बाहेर काढण्यासाठी 10 दशलक्षाहून अधिक स्वाक्षरी याचिका

अर्जेंटिनाला फिफा विश्वचषकातून बाहेर काढण्यासाठी 10 दशलक्षाहून अधिक स्वाक्षरी याचिका FIFA आणि सामना अधिकाऱ्यांवर लिओनेल मेस्सी आणि गतविजेत्याची बाजू घेत असल्याचा आरोप करून...

मुंबईच्या व्हीजेटीआयला पायाभूत योजनेसाठी माजी विद्यार्थ्यांकडून मिळालेली सर्वात मोठी देणगी; माजी विद्यार्थी 60 कोटी...

वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूटला सर्वात मोठे माजी विद्यार्थी देणगी मिळाली वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट (VJTI) ही राज्याच्या मालकीची स्वायत्त संस्था आहे जी विद्यापीठ...

केंद्राच्या परवडणाऱ्या घरांच्या योजनेसाठी मुळशी चराई भूमीविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली | पुणे बातम्या

पुणे : मुंबई उच्च न्यायालयाने राज्याला वळविण्याचा अधिकार असल्याचे सांगितले गायरान केंद्र किंवा राज्य सरकारच्या सार्वजनिक उद्देश/प्रकल्पांसाठी जमिनी (गावातील गुरांच्या मोफत चरण्यासाठी...

या 5 महाकाय पाळीव मांजरी इतक्या मोठ्या आहेत की लोक त्यांना जंगली प्राणी समजतात

नेहमीच एक मांजर आहे ज्याबद्दल लोक बोलणे थांबवू शकत नाहीत. ते असामान्यपणे फ्लफी आहे किंवा त्याचे डोळे निळे आहेत म्हणून नाही, तर त्याच्या आकारामुळे.काही...

error: Content is protected !!