उल्हासनगर दि.२७ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ चा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेला आहे. त्या अनुषंगाने उल्हासनगरात २३ डिसेंबर पासून जवळपास दीड हजार हून अधिक शहरातील सहा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून उमेदवारांना नामनिर्देशन पत्रांची विक्री करण्यात आली आहे. सर्वात पहिले शहरातून काँग्रेस पक्षाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून आतापर्यंत फक्त ३ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले असल्याची माहिती उल्हासनगर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त (निवडणूक )गणेश शिंपी यांनी दिली
२३ डिसेंबर २०२५ पासून शहरातील ६ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात उमेदवारांना नामनिर्देशन पत्रांची विक्री व उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ६ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून २३ डिसेंबर पासून तब्बल १५०२ उमेदवारांना नामनिर्देशन पत्रांची विक्री करण्यात आली आहे. याशिवाय आतापर्यंत फक्त ३ उमेदवारांनी आपला अर्ज दाखल केले आहे . त्यात शहरातील पॅनल क्रमांक १८ मधून काँग्रेसच्या माजी नगरसेविका अंजली चंद्रकांत साळवे यांनी उल्हासनगर महापालिका निवडणूक साठी पहिला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मान पटकावला आहे. अंजली साळवे यांनी तहसीलदार कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळी जिल्हाध्यक्ष रोहित साळवे, डॉ. चंद्रकांत साळवे, विशाल सोनवणे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पुढील दोन दिवसात २० उमेदवारी अर्ज जाहीर करणार असल्याचं रोहित साळवे यांनी सांगितले.
उल्हासनगर शहरातील ६ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय असून २३ डिसेंबर ते २७ डिसेंबर २०२५ रोजी पासून निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक १) यामध्ये २२५ नामनिर्देशक पत्रांची विक्री, क्रमांक – २ मध्ये १६७ नामनिर्देशन पत्रांची विक्री, क्रमांक -३ मध्ये २१९ नामनिर्देशन पत्राची विक्री. क्रमांक -४ मध्ये – २३० नामनिर्देशन पत्रांची विक्री, क्रमांक -५ मध्ये ३४७ नामनिर्देशक पत्रांची विक्री व क्रमांक -६ मध्ये ३१४ नामनिर्देशन पत्रांची विक्री असे एकूण ६ निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयातून १५०२ नामनिर्देशक पत्रांची आजपर्यंत विक्री झाली आहे. सर्वात जास्त नामनिर्देशन पत्रांची विक्री निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय क्रमांक -५ मधून झाली आहे. आतापर्यंत ३ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले असून नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा अंतिम दिनांक ३० डिसेंबर २०२५ असा आहे.





























