Homeशहरउल्हासनगरात पहिला उमेदवारी अर्ज काँग्रेसकडून दाखल : आतापर्यंत १५०२ नामनिर्देशन...

उल्हासनगरात पहिला उमेदवारी अर्ज काँग्रेसकडून दाखल : आतापर्यंत १५०२ नामनिर्देशन पत्रांची विक्री : एकूण ३ उमेदवारांचे अर्ज दाखल

उल्हासनगर दि.२७  ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ चा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेला आहे. त्या अनुषंगाने उल्हासनगरात २३  डिसेंबर पासून जवळपास दीड हजार हून अधिक शहरातील सहा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून उमेदवारांना नामनिर्देशन पत्रांची विक्री करण्यात आली आहे. सर्वात पहिले शहरातून काँग्रेस पक्षाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून आतापर्यंत फक्त ३  उमेदवारांचे  अर्ज दाखल झाले असल्याची माहिती उल्हासनगर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त (निवडणूक )गणेश शिंपी यांनी दिली

२३  डिसेंबर २०२५  पासून शहरातील ६ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात उमेदवारांना नामनिर्देशन पत्रांची विक्री व उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ६ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून २३  डिसेंबर पासून  तब्बल १५०२  उमेदवारांना नामनिर्देशन पत्रांची विक्री करण्यात आली आहे. याशिवाय आतापर्यंत फक्त ३ उमेदवारांनी आपला अर्ज दाखल केले आहे . त्यात  शहरातील पॅनल क्रमांक १८  मधून काँग्रेसच्या माजी नगरसेविका अंजली चंद्रकांत साळवे यांनी उल्हासनगर महापालिका निवडणूक साठी पहिला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मान पटकावला आहे. अंजली साळवे यांनी तहसीलदार कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळी  जिल्हाध्यक्ष रोहित साळवे, डॉ. चंद्रकांत साळवे, विशाल सोनवणे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पुढील दोन दिवसात २०  उमेदवारी अर्ज जाहीर करणार असल्याचं रोहित साळवे यांनी सांगितले.

उल्हासनगर शहरातील ६  निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय असून २३  डिसेंबर ते २७  डिसेंबर २०२५ रोजी पासून निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक १) यामध्ये २२५  नामनिर्देशक पत्रांची विक्री, क्रमांक – २  मध्ये १६७ नामनिर्देशन पत्रांची विक्री, क्रमांक -३ मध्ये २१९ नामनिर्देशन पत्राची विक्री. क्रमांक -४ मध्ये – २३०  नामनिर्देशन पत्रांची विक्री, क्रमांक -५ मध्ये ३४७ नामनिर्देशक पत्रांची विक्री व क्रमांक -६  मध्ये ३१४ नामनिर्देशन पत्रांची विक्री असे एकूण ६  निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयातून १५०२ नामनिर्देशक पत्रांची आजपर्यंत विक्री झाली आहे. सर्वात जास्त नामनिर्देशन पत्रांची विक्री निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय क्रमांक -५  मधून झाली आहे. आतापर्यंत ३ उमेदवारांचे  अर्ज दाखल झाले असून नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा अंतिम दिनांक ३०  डिसेंबर २०२५ असा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ओल्या आणि सुक्या कचऱ्यासाठी स्वतंत्र रिटेंडर्सची मागणी काँग्रेसने केली, या निर्णयामुळे ५६७ कोटी रुपयांची...

पीएमसीमधील काँग्रेस नेते रामचंद्र कदम यांनी आरोप केला की देशभरात केवळ चार कंत्राटदार मिश्र कचऱ्याची प्रक्रिया हाताळतात आणि आपापसात करार विभाजित करण्यासाठी कार्टेल...

‘आता तुम्ही संजू सॅमसन आणि वैभव सूर्यवंशीप्रमाणेच केएल राहुललाही खराब करत आहात’: भारताच्या माजी...

केएल राहुल (इमेज क्रेडिट: बीसीसीआय) नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार क्रिस श्रीकांतने लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेदरम्यान केएल राहुलला सहाव्या क्रमांकावर पाठवल्याबद्दल भारतीय...

बेस्ट अपघातात ठार झालेले 65 वर्षीय शेतकरी आपल्या मुलीला भेटण्यासाठी आणि कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी...

मुंबई : मानखुर्द येथे सायन-पनवेल महामार्गावर सोमवारी बेस्टची बस रस्त्याच्या कडेला असलेल्या दुभाजकावर आदळल्याने दहा जण गंभीर जखमी झाले असून एकाचा मृत्यू...

आंतरराष्ट्रीय अभ्यास कोविड उघड झाल्यानंतर पुरवठा साखळीतील अंतर स्थानिक उपाय देते | पुणे बातम्या

पुणे : कोविड साथीच्या रोगाने जग कसे असुरक्षित आहे हे दाखवून दिल्यानंतर महाद्वीपांमध्ये पसरलेल्या प्रयोगशाळा स्थानिक पातळीवर निदान आणि संशोधनासाठी आवश्यक असलेले महत्त्वाचे जैविक...

एलोन मस्कचे कोट: इलॉन मस्कचे दिवसाचे कोट: “तुम्ही चुकीचे आहात असा दृष्टीकोन घ्यावा. तुमचे...

आत्मविश्वासासह यशाची जोड पुरेशी वैशिष्ट्यपूर्ण आहे. इलॉन मस्कचे प्रसिद्ध कोटेशन अगदी विरुद्ध आहे: "तुम्ही चुकीचे आहात असा दृष्टीकोन घ्यावा. तुमचे ध्येय कमी...

error: Content is protected !!