Homeशहरउलटतपासणी म्हणजे शिकण्याची संधी – नवोदित वकिलांनी संयम आणि आदर राखावा -...

उलटतपासणी म्हणजे शिकण्याची संधी – नवोदित वकिलांनी संयम आणि आदर राखावा – ॲड विलास नाईक

कल्याण दि २७ : कल्याण जिल्हा न्यायालय वकील संघटनेतर्फे  “जप्ती पंचनामे” या विषयावर  व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती.सदर व्याख्यानमालेचे प्रमुख मार्गदर्शन वरिष्ठ वकील ॲड विलास नाईक हे होते. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲड. विलास नाईक यांनी उपस्थित वकिल बांधवांना जप्ती पंचनामे याबाबत कायदेशीर बाबी,त्यातील तांत्रिक मुद्दे आणि न्यायालयीन उपयोग याबद्दल अत्यंत सखोल आणि समर्पक मार्गदर्शन केले.प्रत्यक्ष उलटतपासणी घेत असतानाच काही नवोदित वकिल गैरवर्तन करत असतात हे त्यांनी उपस्थित वकिलांच्या निदर्शनास आणून देत नवीन व्यवसायामध्ये आलेल्या वकिलांचि कानउघाडणी हि केली.

अनेक नवोदित वकिलांनी मागे बसून उलटतपासणीचे विनोदात रूपांतर करत खिल्ली उडवणे, अशोभनीय हावभाव करत गंभीर वातावरणात व्यत्यय निर्माण करणे ही बाब लक्षात आणून देत एक चिंताजनक विषय आपल्या व्याख्यानामध्ये उपस्थित केला.वरिष्ठ वकिलांचे प्रत्यक्ष अनुभव, त्यांची केस हाताळण्याची पद्धत, आणि प्रात्यक्षिक स्वरूपातील उलटतपासणी हे नवोदित वकिलांसाठी अमूल्य संधी असते. कागदावरील ज्ञानापेक्षा कोर्टात प्रत्यक्ष काय घडते हे शिकण्यासाठी हे क्षण अत्यंत मौल्यवान असतात. त्यामुळे अशा वेळेस शांततेने, मनोयोगाने आणि आदरपूर्वक ऐकणे हेच वकिली व्यवसायात पुढे जाण्याचे खरे पाऊल आहे असा हि गुरुमंत्र ॲड विलास नाईक यांनी दिला. अध्यक्षीय भाषण करताना ॲड. प्रकाश रा. जगताप यांनी ॲड विलास नाईक यांचे आभार व्यक्त करत सांगितले की, “व्यंग्य किंवा उपहास नव्हे, तर विनम्रता आणि जिज्ञासू वृत्ती ही यशस्वी वकिलीची पायरी आहे.”

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. प्रकाश रा. जगताप, अध्यक्ष – कल्याण जिल्हा न्यायालय वकील संघटना यांनी भुषविले तर संघटनेचे इतर पदाधिकारी ॲड. गणेश पाटील (उपाध्यक्ष), ॲड. चंद्रकांत वाममारे (सचिव), ॲड. अभिषेक गायकर (खजिनदार), ॲड. सुषील धनगर (सहसचिव), ॲड. सुदेश भगत (सहसचिव), ॲड. क्रांती राठोड (सहसचिव), ॲड. भरत पाटील (ग्रंथपाल) यांनी उपस्थित दर्शविली .कार्यकारीणी सदस्य ॲड. प्रतीक बाकरकर, ॲड. गणेश जाधव, ॲड. मधूर मोरे, ॲड. मनीषा धिवरे अदानी कार्यक्रमासाठी सक्रिय भूमिका बजावली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लिओनेल मेस्सी विरुद्ध किलियन एमबाप्पे: अर्जेंटिनाच्या कर्णधाराने गोल्डन बूटची आघाडी मिळवण्यासाठी विश्वचषकातील विक्रम मोडला

बुधवार, 15 जुलै 2026 रोजी अटलांटा येथे इंग्लंड आणि अर्जेंटिना यांच्यातील विश्वचषक उपांत्य फेरीच्या फुटबॉल सामन्याच्या शेवटी अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी चाहत्यांना हातवारे करतो....

नवी मुंबईत गर्भवती महिलेला इंजेक्शननंतर गंभीर ऍलर्जीचा धक्का बसला | मुंबई बातम्या

नवी मुंबई: 1 जुलै रोजी ऐरोली येथील NMMC रुग्णालयात प्रसूतीपूर्वीचे मानक इंजेक्शन दिल्यानंतर गंभीर अवस्थेत ऋचा मिश्रा (26) या आठ महिन्यांच्या गर्भवती...

हेराफेरीच्या सोडतीपासून ते खराब कारभारापर्यंत: खेळाडूंनी एआयटीए प्रशासकाला दीर्घकालीन समस्यांची चौकशी करण्याची विनंती केली

पुणे: अनिर्णितपणे आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये हेराफेरी, कार्यक्षम उच्च-कार्यक्षमता केंद्रांची गरज, आकर्षक बक्षीस रकमेसह मजबूत देशांतर्गत सर्किट आणि प्रशासनातील हितसंबंधांचा संघर्ष हे टेनिसपटूंनी...

चांगले आरोग्य शोधत आहात? दररोज या 10 शक्तिशाली पुष्टीकरणांची पुनरावृत्ती करा

आरोग्य ही आपल्यापैकी बहुतेक जण विचार करणारी गोष्ट नाही जोपर्यंत ती दूर होत नाही.एक आठवडा, तुम्ही दीर्घ कामाचे दिवस, जेवण वगळून, कॉफीवर टिकून राहून...

राज्याने पुणे महानगर प्रदेश, 668sqkm MSRDC नियोजन क्षेत्र एकसमान विकास नियमांतर्गत आणले | पुणे...

अधिका-यांनी सांगितले की, या निर्णयामुळे पीएमआरडीए क्षेत्र आणि त्याच्या लगतच्या महापालिका हद्दीतील विकास नियमांमध्ये एकसमानता येईल. पुणे : राज्य सरकारने बुधवारी पुणे महानगर...

error: Content is protected !!