कल्याण दि २७ : कल्याण जिल्हा न्यायालय वकील संघटनेतर्फे “जप्ती पंचनामे” या विषयावर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती.सदर व्याख्यानमालेचे प्रमुख मार्गदर्शन वरिष्ठ वकील ॲड विलास नाईक हे होते. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲड. विलास नाईक यांनी उपस्थित वकिल बांधवांना जप्ती पंचनामे याबाबत कायदेशीर बाबी,त्यातील तांत्रिक मुद्दे आणि न्यायालयीन उपयोग याबद्दल अत्यंत सखोल आणि समर्पक मार्गदर्शन केले.प्रत्यक्ष उलटतपासणी घेत असतानाच काही नवोदित वकिल गैरवर्तन करत असतात हे त्यांनी उपस्थित वकिलांच्या निदर्शनास आणून देत नवीन व्यवसायामध्ये आलेल्या वकिलांचि कानउघाडणी हि केली.
अनेक नवोदित वकिलांनी मागे बसून उलटतपासणीचे विनोदात रूपांतर करत खिल्ली उडवणे, अशोभनीय हावभाव करत गंभीर वातावरणात व्यत्यय निर्माण करणे ही बाब लक्षात आणून देत एक चिंताजनक विषय आपल्या व्याख्यानामध्ये उपस्थित केला.वरिष्ठ वकिलांचे प्रत्यक्ष अनुभव, त्यांची केस हाताळण्याची पद्धत, आणि प्रात्यक्षिक स्वरूपातील उलटतपासणी हे नवोदित वकिलांसाठी अमूल्य संधी असते. कागदावरील ज्ञानापेक्षा कोर्टात प्रत्यक्ष काय घडते हे शिकण्यासाठी हे क्षण अत्यंत मौल्यवान असतात. त्यामुळे अशा वेळेस शांततेने, मनोयोगाने आणि आदरपूर्वक ऐकणे हेच वकिली व्यवसायात पुढे जाण्याचे खरे पाऊल आहे असा हि गुरुमंत्र ॲड विलास नाईक यांनी दिला. अध्यक्षीय भाषण करताना ॲड. प्रकाश रा. जगताप यांनी ॲड विलास नाईक यांचे आभार व्यक्त करत सांगितले की, “व्यंग्य किंवा उपहास नव्हे, तर विनम्रता आणि जिज्ञासू वृत्ती ही यशस्वी वकिलीची पायरी आहे.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. प्रकाश रा. जगताप, अध्यक्ष – कल्याण जिल्हा न्यायालय वकील संघटना यांनी भुषविले तर संघटनेचे इतर पदाधिकारी ॲड. गणेश पाटील (उपाध्यक्ष), ॲड. चंद्रकांत वाममारे (सचिव), ॲड. अभिषेक गायकर (खजिनदार), ॲड. सुषील धनगर (सहसचिव), ॲड. सुदेश भगत (सहसचिव), ॲड. क्रांती राठोड (सहसचिव), ॲड. भरत पाटील (ग्रंथपाल) यांनी उपस्थित दर्शविली .कार्यकारीणी सदस्य ॲड. प्रतीक बाकरकर, ॲड. गणेश जाधव, ॲड. मधूर मोरे, ॲड. मनीषा धिवरे अदानी कार्यक्रमासाठी सक्रिय भूमिका बजावली.





























