Homeशहरअमली पदार्थाची विक्री करण्याआधीच इसमावर पोलिसांची झडप : एक लाख तीस हजाराचा...

अमली पदार्थाची विक्री करण्याआधीच इसमावर पोलिसांची झडप : एक लाख तीस हजाराचा मुद्देमाल जप्त

  • उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांची कामगिरी

उल्हासनगर दि २९ ( प्रमोद दळवी ) : गांजा व चरस या अमली पदार्थाची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या एका इसमावर उल्हासनगर गुन्हे  शाखेच्या पोलिसांनी झडप घालून त्याला रंगेहात पकडले आहे. त्याच्याकडून सुमारे एक लाख तीस हजार रुपये किमतीचा गांजा व चरस पोलिसांनी जप्त केला आहे.

पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार उल्हासनगर गुन्हे शाखेतील एस आय बबन बांडे यांना अंबरनाथ पश्चिमेतील भगतसिंगनगर परिसरात  एक इसम अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची एक खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीरंग गोसावी बबन बांडे, चंद्रकांत सावंत , सुरेश जाधव , गणेश गावडे, योगेश वाघ, राजेंद्र थोरवे, विक्रम जाधव, संजय शेरमाळे, रामदास उगले , महिला पोलीस मनोरमा सावळे या पोलीस पथकांनी घटनास्थळी सापळा रचला . या ठिकाणी पोलिसांनी संशयित म्हणून अल्ला बक्ष शेख  (५४ ) राहणार भगतसिंगनगर, बडोदा बँकच्या मागे, झोपडपट्टी अंबरनाथ पश्चिम, याला ताब्यात घेतले.

पोलिसांनी त्याची अंग झडती घेतली असता त्याच्या जवळील झोळीतून एक किलो ४००  ग्रॅम गांजा सुमारे ९०  हजार रुपये किमतीचा, व २५  ग्रॅम चरस सुमारे ४०  हजार रुपये किमतीचा असा एकूण एक लाख तीस हजार रुपयाचा अमली पदार्थ पोलिसांनी त्याच्याकडून हस्तगत केला. पोलिसांनी पंचनामा करून तो मुद्देमाल जप्त केला आहे. या गुन्ह्यात त्याच्यासोबत आणखीन एक महिला सहभागी असल्याची ही माहिती पोलिसांना मिळाली. तिचे नाव शबाना असल्याचे पोलिसांना समजले. याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात एनडीपीएस कलमान्वये  अल्ला बक्ष शेख व शबाना या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस त्या महिलेचा शोध घेत असून. तिला पकडल्यावर अमली पदार्थ विक्री करणाऱ्या टोळी पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘चार जणांच्या कुटुंबात, आम्ही सर्व एकाच स्वप्नात जगलो’: केएस भरतने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा...

भारताचे केएस भरत (पीटीआय फोटो/आर सेंथिलकुमार) भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज केएस भरतने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे, ज्याने त्याला देशासाठी सात कसोटी सामने खेळताना...

वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर बेस्ट बसने दिलेल्या धडकेत ॲप कॅब चालकाचा मृत्यू झाला

मालाड पूर्व येथे पश्चिम द्रुतगती महामार्गावर बेस्ट बसने धडक दिल्याने ॲप कॅब चालकाचा मृत्यू झालामालाड पूर्व येथे पश्चिम द्रुतगती महामार्गावर बेस्ट बसने धडक...

घोषणेनंतर चार वर्षांनी, रांजणगाव येथील इलेक्ट्रॉनिक क्लस्टरमध्ये पायाभूत कामांना वेग आला

297 एकरांमध्ये पसरलेल्या या प्रकल्पात एकूण 492 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे, ज्यामध्ये MIDC 285 कोटी आणि केंद्राचा 208 कोटी रुपयांचा वाटा आहे. पुणे...

व्यक्तिमत्व चाचणी: तुम्ही ग्राउंड, भावनिकदृष्ट्या दूर, स्वप्न पाहणारे, बंडखोर, नियंत्रण करणारे, संवेदनशील, तापट किंवा...

आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाटते की आपल्याला काही विशिष्ट रंग “आवडतात”, परंतु बऱ्याचदा, आपण ज्या शेड्स काढल्या जातात त्या आपल्या आंतरिक जगाबद्दल आपल्या...

आयटी फर्मच्या हिंजवडी शाखेने प्रोजेक्टशिवाय अनेक फ्रेशर्सना कामावर घेतले, सरकारच्या आयटी कॉन्ट्रॅक्टवर डोळा: हिंजवडी...

सीईओला मंगळवारी त्यांच्या नाशिकमधील आडगाव येथील निवासस्थानातून ताब्यात घेण्यात आले आणि रात्री त्यांना पुण्यात आणण्यात आले, त्यानंतर बुधवारी फसवणूक प्रकरणात त्यांना औपचारिक अटक...

error: Content is protected !!