Homeशहरअजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त उल्हासनगरात महिलांसाठी ‘मेनोपॉज जनजागृती व्याख्यान’ उत्साहात संपन्न

अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त उल्हासनगरात महिलांसाठी ‘मेनोपॉज जनजागृती व्याख्यान’ उत्साहात संपन्न

उल्हासनगर दि. २६ ( प्रमोद दळवी ) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उल्हासनगर शहर जिल्ह्याच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मा. हरकिरण कौर सोनिया धामी यांच्या मार्गदर्शनाखाली व विशेष प्रयत्नांतून मा. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त ४० वर्षांवरील महिलांसाठी ‘मेनोपॉज जनजागृती व्याख्यान’ या विशेष कार्यक्रमाचे उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वी आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात मा. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी अजितदादा पवार यांच्या कार्याचा गौरव करत समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या डॉ. (श्रीमती) सुषमा तोमर यांनी ‘मेनोपॉज’ या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी मेनोपॉज हा महिलांच्या आयुष्यातील नैसर्गिक टप्पा असून त्याबाबत समाजात असलेले गैरसमज दूर करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. तसेच संतुलित आहार, नियमित व्यायाम, मानसिक आरोग्याची काळजी, सकारात्मक जीवनशैली आणि वेळोवेळी वैद्यकीय सल्ला घेण्याचे महत्त्व त्यांनी उपस्थित महिलांना समजावून सांगितले. या व्याख्यानादरम्यान महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध प्रश्न विचारले. डॉ. तोमर यांनी त्यांच्या शंकांचे सविस्तर निरसन करून महिलांच्या आरोग्याविषयी जागरूक राहण्याचे आवाहन केले. उपस्थित महिलांनी हा कार्यक्रम अत्यंत ज्ञानवर्धक, प्रेरणादायी आणि उपयुक्त असल्याची भावना व्यक्त करत त्याचे मनापासून कौतुक केले.

मा. हरकिरण कौर सोनिया धामी यांच्या प्रेरणा, मार्गदर्शन आणि विशेष प्रयत्नांतून आयोजित हा उपक्रम महिलांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणारा तसेच समाजात सकारात्मक संदेश देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरला. कार्यक्रमाच्या शेवटी प्रमुख वक्त्या डॉ. (श्रीमती) सुषमा तोमर, उपस्थित सर्व मान्यवर, महिला भगिनी, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

फडणवीसांनी पुन्हा दिल्लीतील हालचाली फेटाळून लावल्या, ‘भारत विथ पीएम’ | मुंबई बातम्या

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा दिल्लीला हलवल्याचा अंदाज खोडून काढला आणि ते म्हणाले की ते “फक्त मुंबईत... महाराष्ट्रातच” राहणार आहेत.केंद्रीय...

पुण्याच्या आयटी कॉरिडॉरमध्ये प्रीमियम, आरोग्य-केंद्रित टिफिन सेवांसाठी वाढती भूक दिसत आहे | पुणे बातम्या

पुणे : पुण्यातील आयटी कॉरिडॉरमध्ये प्रीमियम टिफिन सेवांना जोरदार मागणी दिसून येत आहे कारण कार्यरत व्यावसायिक वाढत्या प्रमाणात हेल्दी, गॉरमेट जेवणाचे पर्याय...

‘माझा खेळ तोच आहे’: अवघ्या १५ व्या वर्षी ‘मॅन ऑफ द सिरीज’ ठरल्यानंतर वैभव...

वैभव सूर्यवंशी (एएनआय फोटो) भारताचा किशोरवयीन संवेदना वैभव सूर्यवंशी याने हरारे येथे झिम्बाब्वेवर 3-0 ने भारताच्या T20I मालिकेत बाजी मारल्यानंतर, सामनावीर आणि मालिका...

कन्फ्यूशियसचे दिवसाचे कोट, “जेव्हा तुम्ही एखाद्या योग्य व्यक्तीला पाहता, तेव्हा त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न...

कन्फ्यूशियसचे दिवसाचे कोट कन्फ्यूशियस हा इतिहासातील सर्वात प्रसिद्ध आणि प्रभावी विचारवंतांपैकी एक आहे. त्याच्या शिकवणींनी चीन, कोरिया, जपान, व्हिएतनाम आणि आशियातील इतर अनेक...

कळव्यातील आंतरराष्ट्रीय दर्जाचा तरण तलाव आणि क्रीडा संकुलातून होतकरू खेळाडू घडतील- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यशवंत रामा साळवी तरण तलाव पुनर्विकास आणि बहुउद्देशीय क्रीडा संकुलाच्या कामाचे भूमिपूजन - ५० कोटी रुपयांच्या प्रकल्पाला प्रत्यक्ष सुरुवात -...

error: Content is protected !!