Homeशहरकळव्यातील आंतरराष्ट्रीय दर्जाचा तरण तलाव आणि क्रीडा संकुलातून होतकरू खेळाडू घडतील- उपमुख्यमंत्री...

कळव्यातील आंतरराष्ट्रीय दर्जाचा तरण तलाव आणि क्रीडा संकुलातून होतकरू खेळाडू घडतील- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यशवंत रामा साळवी तरण तलाव पुनर्विकास आणि बहुउद्देशीय क्रीडा संकुलाच्या कामाचे भूमिपूजन

– ५० कोटी रुपयांच्या प्रकल्पाला प्रत्यक्ष सुरुवात

– ठाणे जिल्ह्यात साकारत आहे ऑलिंपिक दर्जाचा अत्याधुनिक तरण तलाव

– खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून खेळाडूंना मिळणार जागतिक दर्जाच्या सुविधा

ठाणे दि. २६ : कळव्यात उभारण्यात येणारा आंतरराष्ट्रीय दर्जाचा तरण तलाव आणि अत्याधुनिक बहुउद्देशीय क्रीडा संकुल हे केवळ कळव्याच्याच नव्हे, तर संपूर्ण ठाणे जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे. या ठिकाणी उपलब्ध होणाऱ्या आधुनिक आणि दर्जेदार सुविधांमुळे होतकरू खेळाडूंना आपल्या परिसरातच प्रशिक्षण आणि सरावासाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध होईल. भविष्यात हजारो खेळाडू या क्रीडा संकुलात प्रशिक्षण घेतील, आपली गुणवत्ता सिद्ध करतील आणि त्यातून राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकणारे खेळाडू घडतील. हे खेळाडू आपल्या शहरासह ठाणे जिल्ह्याचे आणि महाराष्ट्राचे नाव मोठे करतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने कळवा येथील यशवंत रामा साळवी तरण तलावाच्या पुनर्विकासासह उभारण्यात येणाऱ्या बहुउद्देशीय क्रीडा संकुलाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून कळवा येथील यशवंत रामा साळवी तरण तलावाच्या पुनर्विकासासह बहुउद्देशीय क्रीडा संकुलाच्या उभारणीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न झाले. सुमारे ५० कोटी रुपयांच्या निधीतून साकारल्या जाणाऱ्या या प्रकल्पामुळे ठाणे, कळवा तसेच परिसरातील हजारो खेळाडूंना ऑलिंपिक दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज असे आधुनिक क्रीडा केंद्र उपलब्ध होणार आहे.

क्रीडा क्षेत्रात दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या उद्देशाने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मतदारसंघात विविध ठिकाणी आधुनिक क्रीडा संकुले उभारण्यात येत आहे. त्या अनुषंगाने अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, कळवा, दिवा आणि मुंब्रा येथे विविध क्रीडा सुविधा उभारण्याचे काम सुरू असून अनेक प्रकल्प पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. अंबरनाथ येथे अत्याधुनिक शूटिंग रेंज, विविध शहरांमध्ये क्रीडा संकुले तसेच खेळाडूंना आवश्यक आधुनिक साहित्य आणि प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर दिला गेला आहे.  त्याचाच एक महत्त्वाचा टप्पा म्हणून कळव्यातील हा ऑलिंपिक दर्जाच्या तरण तलावाचा पुनर्विकास आणि बहुउद्देशीय क्रीडा संकुलाचा प्रकल्प साकारत आहे.

ठाणे महानगरपालिकेच्या कळवा येथील मनीषानगर परिसरात असलेला यशवंत रामा साळवी तरण तलाव १९९१ साली उभारण्यात आला होता. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ या तलावाचा उपयोग कळवा, खारेगाव, ठाणे आणि परिसरातील नागरिक तसेच जलतरणपटूंनी केला आहे. राष्ट्रीय स्तरावरील विविध जलतरण स्पर्धांचे आयोजनही या ठिकाणी होत आले आहे. सुमारे ४२७० चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या या जागेवरील जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी अत्याधुनिक आणि सर्व सुविधांनी सुसज्ज अशी नवी वास्तू उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत ऑलिंपिक दर्जाचा आधुनिक तरण तलाव, बहुउद्देशीय क्रीडा संकुल आणि खेळाडूंना आवश्यक सर्व सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राज्यस्तरीय, राष्ट्रीय तसेच भविष्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी आवश्यक सुविधा येथे उपलब्ध होणार असून ठाणे जिल्ह्याच्या क्रीडा विकासाला नवे बळ मिळणार आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघात क्रीडा सुविधांचे जाळे उभारणार –  खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे

कल्याण लोकसभा मतदारसंघात क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी विविध शहरांमध्ये अत्याधुनिक क्रीडा संकुले उभारण्यासह खेळाडूंना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. डोंबिवली येथे बहुउद्देशीय क्रीडा संकुल आणि स्टेडियम उभारण्याचे काम प्रगतीपथावर असून, देशातील पहिले ‘व्हर्टिकल क्रीडा संकुल’ म्हणून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आकार घेत आहे. त्याच धर्तीवर कळवा येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा तरण तलाव आणि अत्याधुनिक बहुउद्देशीय क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे. मतदारसंघातील होतकरू खेळाडूंना प्रशिक्षण आणि सरावासाठी आवश्यक सुविधा आपल्याच शहरात उपलब्ध व्हाव्यात तसेच त्यांना राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पुढे जाण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे, हा या प्रकल्पांमागील उद्देश आहे. आगामी काळात ठाणे जिल्ह्यात आणखी विविध ठिकाणी आधुनिक क्रीडा संकुले आणि आवश्यक क्रीडा सुविधा कशा उभारता येतील, याचेही नियोजन करण्यात येत असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी सांगितले. कळव्यातील या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या भूमिपूजनाबद्दल त्यांनी कळवावासीय, खेळाडू आणि क्रीडाप्रेमींना शुभेच्छा दिल्या. ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून यावेळी खासदार डॉ.शिंदे कार्यक्रमाला उपस्थित होते.

बहुउद्देशीय क्रीडा संकुलाची प्रमुख वैशिष्ट्ये

या अत्याधुनिक क्रीडा संकुलात सुमारे १५० दुचाकी आणि ५० हून अधिक चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था, कार लिफ्ट, प्रशस्त लॉबी, कार्यालय, २७५ आसनक्षमतेचा बँक्वेट हॉल, प्री-फंक्शन एरिया, कॅफेटेरिया, खेळाडूंसाठी स्वतंत्र चेंजिंग रूम आणि स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत. याशिवाय टेबल टेनिस, अत्याधुनिक जिम्नॅशियम, योगा सेंटर, बुद्धिबळ, कॅरम, बॅडमिंटन, मार्शल आर्ट्स, पिकलबॉल, बास्केटबॉल, स्केटिंग, कबड्डी, बॉक्स क्रिकेट, पॅडल बॉल कोर्ट तसेच विविध इंडोर क्रीडा प्रकारांसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध असतील. प्रत्येक क्रीडा प्रकारासाठी प्रेक्षकांची स्वतंत्र आसनव्यवस्था देखील करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे ठाणे जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडूंना आधुनिक प्रशिक्षण, सराव आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी आवश्यक दर्जाच्या सुविधा आपल्या परिसरातच उपलब्ध होणार असून जिल्ह्याच्या क्रीडा विकासात हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

फडणवीसांनी पुन्हा दिल्लीतील हालचाली फेटाळून लावल्या, ‘भारत विथ पीएम’ | मुंबई बातम्या

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा दिल्लीला हलवल्याचा अंदाज खोडून काढला आणि ते म्हणाले की ते “फक्त मुंबईत... महाराष्ट्रातच” राहणार आहेत.केंद्रीय...

पुण्याच्या आयटी कॉरिडॉरमध्ये प्रीमियम, आरोग्य-केंद्रित टिफिन सेवांसाठी वाढती भूक दिसत आहे | पुणे बातम्या

पुणे : पुण्यातील आयटी कॉरिडॉरमध्ये प्रीमियम टिफिन सेवांना जोरदार मागणी दिसून येत आहे कारण कार्यरत व्यावसायिक वाढत्या प्रमाणात हेल्दी, गॉरमेट जेवणाचे पर्याय...

‘माझा खेळ तोच आहे’: अवघ्या १५ व्या वर्षी ‘मॅन ऑफ द सिरीज’ ठरल्यानंतर वैभव...

वैभव सूर्यवंशी (एएनआय फोटो) भारताचा किशोरवयीन संवेदना वैभव सूर्यवंशी याने हरारे येथे झिम्बाब्वेवर 3-0 ने भारताच्या T20I मालिकेत बाजी मारल्यानंतर, सामनावीर आणि मालिका...

कन्फ्यूशियसचे दिवसाचे कोट, “जेव्हा तुम्ही एखाद्या योग्य व्यक्तीला पाहता, तेव्हा त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न...

कन्फ्यूशियसचे दिवसाचे कोट कन्फ्यूशियस हा इतिहासातील सर्वात प्रसिद्ध आणि प्रभावी विचारवंतांपैकी एक आहे. त्याच्या शिकवणींनी चीन, कोरिया, जपान, व्हिएतनाम आणि आशियातील इतर अनेक...

गोंधळात टाकणारा फरक : आरोग्य विभागाला पुण्यात डेंग्यूचे ४५२ रुग्ण; PMC फक्त 22 |...

पीएमसीने रुग्णालयांना त्यांचा डेटा सुधारण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत पुणे: शहरातील डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या संख्येत PMC आणि राज्य आरोग्य डेटामधील गोंधळात टाकणारा फरक दिसून...

error: Content is protected !!