- कुत्री भुंकल्यामुळे नाग त्या ठिकाणी सोडून चोरट्याचे पलायन
उल्हासनगर दि २२ (प्रमोद दळवी ): मध्यरात्रीच्या सुमारास एका चोरट्याने उल्हासनगरातील महादेवाच्या मंदिरातील पिंडीवरील धातूचा नाग चोरण्याचा प्रयत्न केल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाले असून या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले विसरले आहे. पोलिसांनी धार्मिक स्थळाच्या ठिकाणी गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांमध्ये केली जात आहे.

उल्हासनगरातील कॅम्प नंबर ३ परिसरातील ओटी सेक्शन मध्ये महादेव मंदिर आहे. या मंदिरातील महादेवाच्या पिंडीवर असलेला तांबा किंवा पितळेचा नाग २१ जून रोजी मध्यरात्री तीनच्या सुमारास एका चोरट्याने चोरण्याचा प्रयत्न केला. पिंडीवरील नाग काढून त्यांनी मंदिराच्या ओट्यावर ठेवला आणि उडी मारून कंपाऊंडच्या बाहेर गेला . नंतर त्याने ग्रील मधून तो नाग बाहेर घेण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी नाग बाहेर काढत असताना तो पडून आत खुर्चीवर पडला आणि आवाज झाला. या आवाजाने त्या परिसरातील कुत्री भुंकू लागल्याने आपण पकडले जाऊ याची खात्री त्याला होतास त्याने नाग त्याच ठिकाणी सोडून पळ काढली.
सकाळी स्थानिक नागरिकांनी मंदिराकडे पाहणी केली असता त्यांना तो नाग बाहेर पडलेला दिसला. त्यांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता हा चोरीचा प्रयत्न झाल्याचा प्रकार उघडकीस आला. त्या परिसरात रात्रीच्या सुमारास नशेखोर टोळीचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला असून या टोळीने नशेच्या पैशासाठी हा नाग चोरीचा प्रयत्न त्यांनी केला असावा असा अंदाज नागरिकांनी वर्तवला आहे. पोलिसांनी धार्मिक स्थळाच्या ठिकाणी गस्त वाढवावा अशी मागणी नागरिकांमध्ये केली जात आहे. पोलिसांनी या सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्या चोरट्याचा शोध घेऊन त्याला अटक करावी अशी मागणी नागरिकांमध्ये केली जात आहे.





























