Homeशहरस्वराज्य संघटनेच्या तक्रारीनंतर मशीनद्वारे मॅनहोल साफसफाई; अधिकारी व ठेकेदारांनी कामगाराlला जाणीवपूर्वक...

स्वराज्य संघटनेच्या तक्रारीनंतर मशीनद्वारे मॅनहोल साफसफाई; अधिकारी व ठेकेदारांनी कामगाराlला जाणीवपूर्वक मॅनहोलमध्ये उतरविल्याचा गंभीर आरोप

उल्हासनगर  दि. २ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर महानगरपालिकेच्या समता नगर, उल्हासनगर-४ येथील मॅनहोलमध्ये २९ जुलै २०२६ रोजी एका स्वच्छता कर्मचाऱ्याला प्रत्यक्ष मॅनहोलमध्ये उतरवून गटार साफसफाई करण्यात आल्याच्या घटनेविरोधात स्वराज्य संघटनेने महापालिका आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर संबंधित ठिकाणी आता मशीनद्वारे मॅनहोलची साफसफाई सुरू करण्यात आल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

या घडामोडीनंतर मॅनहोल साफ करण्यासाठी आवश्यक यांत्रिक साधने उपलब्ध असूनही यापूर्वी स्वच्छता कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक मॅनहोलमध्ये उतरवून साफसफाई करून घेण्यात येत होती, असा गंभीर आरोप स्वराज्य संघटनेने केला आहे. संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष ॲड. जय गायकवाड यांनी सांगितले की, “जर मशीन उपलब्ध होती, तर स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळण्याची गरजच नव्हती. संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांनी कायद्याचे उल्लंघन करत गरीब स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या जीवाला जाणीवपूर्वक धोका निर्माण केला आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून त्याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.” स्वराज्य संघटनेने नमूद केले की, ‘द प्रोहिबिशन ऑफ एम्प्लॉयमेंट अ‍ॅज मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स अँड देअर रिहॅबिलिटेशन ॲक्ट, २०१३’ अंतर्गत मॅनहोलमध्ये मनुष्य उतरवून साफसफाई करण्यास स्पष्टपणे प्रतिबंध आहे. अशा परिस्थितीत मशीन उपलब्ध असतानाही मानवी पद्धतीने साफसफाई करण्यात आली असल्यास, संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर कायद्यानुसार कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.

या प्रकरणी स्वराज्य संघटनेने महापालिका आयुक्तांना नव्याने निवेदन सादर करून पुढील मागण्या केल्या आहेत : १) संबंधित अधिकारी, अभियंते, पर्यवेक्षक आणि ठेकेदार यांच्यावर तात्काळ शिस्तभंगाची तसेच फौजदारी कारवाई करण्यात यावी. २) संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्यात यावी.३) भविष्यात कोणत्याही स्वच्छता कर्मचाऱ्याला मॅनहोलमध्ये उतरविण्याची वेळ येऊ नये, यासाठी सर्व मॅनहोल व गटार साफसफाईची कामे केवळ यांत्रिक पद्धतीनेच करण्यात यावीत. स्वराज्य संघटनेने इशारा दिला आहे की, स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या अधिकारी व ठेकेदारांवर तातडीने कारवाई न झाल्यास संघटना संविधानिक आणि लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडणार आहे. गरीब स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा इशारा संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष ॲड.. जय गायकवाड यांनी दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उल्हासनगरात शिवसेना व युवासेनेच्या वतीने तीन दिवसीय मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराला नागरिकांचा...

उल्हासनगर  दि. २ ( प्रमोद दळवी )  : शिवसेना नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून, जिल्हाप्रमुख गोपाळ...

मैत्री दिनानिमित्त निसर्गाशी अनोखी मैत्री ; आशा सेविकांना १०० रेनकोट व ५० औषधी वृक्षांचे...

उल्हासनगर दि २ ( प्रमोद दळवी )  : मैत्री दिनाचे औचित्य साधत शिवसेना नगरसेविका व महिला बालकल्याण समिती सभापती डॉ. मीना सोंडे आणि सोहम...

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडून उल्हासनगरकरांना विशेष भेट; लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे प्रवेशद्वाराचे जयंतीदिनी...

उल्हासनगर दि. १ ( प्रमोद दळवी )  : लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त उल्हासनगरच्या पॅनेल क्रमांक १२ मधील के.बी. रोड, आनंदनगर येथे उभारण्यात...

रिक्षा युनियनचे वार्षिक सदस्यत्व अभियान सुरू; अध्यक्ष हरजिंदरसिंह (विक्की) भुल्लर यांचे रिक्षाचालक-मालकांना संघटनेत सहभागी...

उल्हासनगर दि. १ ( प्रमोद दळवी )  : रमाकांत चव्हाण रिक्षा चालक-मालक संघटना, उल्हासनगर यांच्या वतीने १ ऑगस्ट २०२६ पासून वार्षिक सदस्यत्व अभियानाचा शुभारंभ...

सीएसएमटी – सावंतवाडी रोड दरम्यान नवीन दैनिक एक्सप्रेसला मंजुरी

- कोकण रेल्वेच्या प्रवाशांना मोठा दिलासा - खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्याला यश - पर्यटन, व्यापार, शिक्षण आणि रोजगारासाठी प्रवास...

error: Content is protected !!