अंबरनाथ दि. १७ ( प्रमोद दळवी ) : अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्टेशनच्या मध्ये असणाऱ्या मोरिवली गाव येथे रेल्वे क्रॉसिंग दरम्यान होणाऱ्या अपघातांची घटना चिंताजनक आहे. गेल्या तीन वर्षात या ठिकाणी जवळपास ४० हून अधिक जणांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे. या रेल्वे क्रॉसिंगच्या दरम्यान होणाऱ्या अपघाताच्या घटना टाळण्यासाठी सेंट्रल रेल्वेच्या कल्याण रेल्वे पोलिसांनी क्रॉसिंग होत असलेल्या ठिकाणी पोलिसांनी साखळी करून रेल्वे रूळ क्रॉसिंग करून आपला जीव धोक्यात घालू नये याबाबत लोकांमध्ये जनजागृती केली

रेल्वे रूळ क्रॉस करणे किती खतरनाक आहे आणि रेल्वे पोलीस लोकांना रेल्वे रूळ क्रॉस न करता सुरक्षित रस्त्याचा वापर करा याबाबत जनजागृती करण्याकरिता अभियान राबवत आहे. याकरिता पोलिसांनी अंबरनाथ व बदलापूर रेल्वे स्टेशनच्या दरम्यान मोरिवली गाव येथे पोलिसांनी साखळी करून नागरिकांना रेल्वे रूळ क्रॉस करू नका याबाबत सांगितले. तसेच जे नागरिक रेल्वे रूळ ओलांडत होते त्यांना गुलाबाचे फुल देऊन त्यांना आपला जीव धोक्यात घालू नका, रेल्वे रूळ क्रॉस करू नका याबाबत संदेश दिला. रेल्वे अपघाताच्या घटना टाळण्यासाठी लोकांचेही सहकार्य महत्त्वाचे आहे असे पोलिसांनी सांगितले. याशिवाय रेल्वे प्रशासनाने व पोलिसांनी नागरिकांना सुरक्षित प्रवास करण्याकरिता नियमाचे पालन करण्याच्या सूचना दिल्या..

रेल्वे क्रॉसिंगच्या दरम्यान किंवा रेल्वेमधून पडून जे विविध अपघात होत असतात आणि त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचा जीव जात असतो या अनुषंगाने रेल्वे मंत्रालयाकडून मागच्या बऱ्याच वर्षापासून मिशन 0 डेत ची संकल्पना राबविण्यात येत आहे. यात संकल्पनेला एक एडिशन म्हणून रेल्वेचे सीपी राकेश कलासागर यांनी नागरिकांमध्ये जनजागृती अभियान सुरू केला आहे. यामध्ये प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रेल्वे क्रॉस करताना अपघात होत आहेत त्या ठिकाणी थांबून लोकांमध्ये जनजागृती करणे. रेल्वे क्रॉसिंग करताना होणाऱ्या अपघाताबाबत माहिती देणे. रेल्वे क्रॉसिंग करण्यापासून त्यांना थांबवणे, याशिवाय सुरक्षित रस्त्याचा वापर करणे हे सांगण्याकरिता रेल्वे पोलिसांनी जनजागृती अभियान सुरू केला आहे. याच मिशनच्या अंतर्गत बुधवारी मोरिवली अंबरनाथ आणि बदलापूरच्या दरम्यानच एक ठिकाण आहे या ठिकाणावरून लोक मोरिवली पासून अंबरनाथकडे येण्याकरिता रेल्वे रूळ क्रॉस करीत असतात त्या ठिकाणी आरपीएफ व जीआरपी पोलिसांनी साखळी करून रेल्वे रूळ क्रॉस करू नका, आपला जीव धोक्यात घालू नका हे नागरिकांना सांगत जनजागृती केली. तसेच हातात वेगवेगळे बॅनर्स घेऊन लोकांना ते दाखवत रेल्वे रूळ क्रॉस करणे किती हानिकारक आहे. याबाबत प्रबोधन केले. या जनजागृती अभियानामध्ये सेंट्रल रेल्वेच्या डीसीपी प्रज्ञा झेडगे, एसीपी धनराज पाटील, कल्याण रेल्वेचे पोलीस निरीक्षक, आर पी एफ चे एसीपी नरेंद्र सिंग तसेच आरपीएफ व जीआरपी पोलिसांची टीम या अभियानात सहभागी झाली होती.





























