Homeशहरछत्रपतींच्या सन्मानासाठी संघटनांचा एल्गार: शिवाजी महाराज चौकात उपोषण व आंदोलन

छत्रपतींच्या सन्मानासाठी संघटनांचा एल्गार: शिवाजी महाराज चौकात उपोषण व आंदोलन

उल्हासनगरदि. २७ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर -३ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपतींच्या सन्मानासाठी आणि चौकातील प्रतिमेच्या संरक्षणासाठी विविध सामाजिक व हिंदू संघटनेच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण व आंदोलन करण्यात आले.

विविध संघटनांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता. यामध्ये प्रीती प्रफुल भोसले, शैलेश तिवारी, तुषार बागुल, सुधीर कन्हरे, नरेशदादा थोपटे, चेतन साळुंखे, व्ही. व्ही. पाटील, सनी भाऊ तेलकर, विलास आंग्रे, सुरजीत पंजाबी, दीपक शाहू, विशाल भोसले, अमर सुपे, विकी पाटील, अनिल जेसवाल, नितीन चंदालिया, किरण पवार, वासू, राजेश तेजवानी, भीष्म असुदानी, दीपक गाडे, सचिनभाऊ साठे, राजू पाल, धनंजय मिश्रा, गणेश तिखंडे आदींचा समावेश होता.

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील प्रतिमा (राजसदर), चबुतरा व परिसराची सुरक्षा, तसेच महापालिका प्रशासनाचा कथित गलथान कारभार, कामातील दिरंगाई याविरोधात आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रतिमेभोवती काचेचे संरक्षक कुंपण उभारावे, कचरा व घाण रोखावी, तसेच अभिषेकाच्या नावाखाली होणारी हानी थांबवावी, अशी मागणी त्यावेळी करण्यात आली. काही दिवसांपूर्वी प्रतिमेसमोर नृत्य करून सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केल्याच्या घटनेवरही संताप व्यक्त करत संबंधितांवर कारवाई करून जाहीर माफी घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.

याशिवाय चौकाचे अधिकृत नाव “छत्रपती शिवाजी महाराज चौक” किंवा “श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज चौक” असे सन्मानपूर्वक घोषित करावे, तसेच परिसरातील दुकानांच्या पाट्यांवरही योग्य उल्लेख करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली. प्रतिमा व राजसदरावर वारंवार निकृष्ट दर्जाची दुरुस्ती होत असल्याचा आरोप करत संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून टिकाऊ व दर्जेदार सुशोभीकरण करावे, तसेच प्रतिमा किमान १० फूट उंच, अखंड व भव्य स्वरूपात उभारावी आणि भविष्यात अनुचित प्रकार टाळण्यासाठी CCTV कॅमेरे बसवावेत, अशी मागणी करण्यात आली.या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रीय छावा संघटना महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष निखिल गोळे यांनी केले. त्यांनी प्रशासनाला इशारा देत, “छत्रपतींच्या सन्मानाशी तडजोड सहन केली जाणार नाही; मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ज्ञानगंगा शिक्षण संकुलात आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती रॅली

ठाणे दि. २६ ( प्रमोद दळवी )  : ज्ञानगंगा शिक्षण संकुल, कासारवडवली येथे आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त ज्ञानगंगा एज्युकेशन ट्रस्टच्या डिग्री कॉलेज ऑफ...

अंबरनाथमध्ये साकार होणार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक

- पूर्णाकृती पुतळ्यासाठी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर -  खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश अंबरनाथ दि. २६ : अंबरनाथ शहरातील लाखो नागरिकांच्या...

६,६,६,६,०,६! सिएटल ऑर्काससाठी इयान हॉलंडच्या 17व्या षटकात मार्कस स्टोइनिस निडर झाला – पहा

मार्कस स्टॉइनिस (प्रतिमा: X) मार्कस स्टॉइनिसने 17 व्या षटकात पॉवर हिटिंगचे जबरदस्त प्रदर्शन केले, वॉशिंग्टन फ्रीडम सीमर इयान हॉलंडच्या चेंडूवर पाच षटकार खेचून...

ॲनालॉग फोटोग्राफीचा आनंद मुंबईने पुन्हा शोधला

तरुण छायाचित्रकार चित्रपट स्वीकारत आहेत, मुद्दाम ॲनालॉग कलेसाठी डिजिटल गतीचा व्यापार करत आहेत. मुंबईत आयोजित फोटोवॉक संयम आणि सजग शूटिंगला प्रोत्साहन देतात, सहभागी...

केतन अग्रवालच्या हत्येमागे विगचा कट? वडिलांचे म्हणणे आहे की सिया गोयलच्या कुटुंबाला त्याच्या केसांच्या...

पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या वडिलांनी शुक्रवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपल्या मुलाच्या हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. पुणे...

error: Content is protected !!