Homeशहरबॉलीवूडचे अभिनेते संजय दत्त आणि सुनील शेट्टी यांची उपस्थिती: ठाण्यात रंगणार 'प्रेसिडेंट...

बॉलीवूडचे अभिनेते संजय दत्त आणि सुनील शेट्टी यांची उपस्थिती: ठाण्यात रंगणार ‘प्रेसिडेंट कप’चा महाअंतिम सोहळा

ठाणे दि. ४ : गेल्या काही दिवसांपासून ठाणेकरांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘प्रेसिडेंट कप इंडिया २०२६’ या टेनिस क्रिकेट स्पर्धेचा उद्या, रविवार ५ एप्रिल २०२६ रोजी भव्य सांगता समारंभ पार पडणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याला बॉलीवूडचे सुपरस्टार आणि लेजेंडरी अभिनेते संजय दत्त तसेच एव्हरग्रीन ॲक्शन स्टार सुनील शेट्टी यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये हा ‘महाअंतिम सोहळा’ पार पडणार असून ठाणेकर या सोहळ्यासाठी सज्ज झाले आहेत.

टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि कार्याध्यक्ष व राज्याचे उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या माध्यमातून प्रेसिडेंड कप – २०२६ ही स्पर्धा सुरू आहे. ३१ मार्च रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अभिनेता सलमान खान यांच्या उपस्थितीत ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये या स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन झाले होते. या स्पर्धेत विविध राज्यातील तब्बल १६ संघ सहभागी झाले आहेत. या संघांमध्ये चुरशीचे सामने सुरू आहेत. शुक्रवारी यातील उपांत्यपूर्व आणि उपांत्य सामने रंगले. तर येत्या ५ एप्रिल रोजी स्पर्धेतील उर्वरित उपांत्य आणि अंतिम सामने रंगतील. टेनिस क्रिकेट चाहत्यांचाही या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

उद्घाटनाच्या सोहळ्याप्रमाणे या प्रेसिडेंट क्रीडा स्पर्धेची सांगताही दिमाखदार सोहळ्यात होणार आहे. या कार्यक्रमासाठी सिने सृष्टीतील ऍक्शन स्टार आणि स्वतः सेलेब्रिटी क्रिकेटमध्ये आवर्जून खेळणारा अभिनेता सुनील शेट्टी सहभागी होणार आहे. उद्या संध्याकाळी ५. ३० वाजता सुनील शेट्टी मैदानावर उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढणार आहे.

तर सायंकाळी ६.३० वाजता बॉलिवूडचा संजु बाबा अर्थात संजय दत्त मुख्य सांगता सोहळ्यात सहभागी होऊन या क्षणाची रंगत द्विगुणित करणार आहे. प्रेसिडेंट कपचा पहिला विजेता संघ यावेळी देशाला मिळणार आहे. यंदा विजेत्या संघाला तब्बल १ कोटींचे बक्षिस प्रदान केले जाणार आहे. तर मालिकावीर आणि सामनावीर खेळाडूलाही आकर्षक बक्षिसे दिली जातील. त्यामुळे या बक्षिसांची लयलूट कोणता संघ करतो याकडे सर्व टेनिस क्रिकेट रसिकांचे लक्ष लागले आहे.

खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे आणि मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या स्पर्धेचा समारोप अत्यंत दिमाखदार पद्धतीने करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. केवळ क्रिकेटच नव्हे, तर सिनेसृष्टीतील या दिग्गजांना जवळून पाहण्याची संधी ठाणेकरांना मिळणार आहे. या भव्य सांगता समारंभाला आणि महाअंतिम सामन्याला सर्व क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ग्लोबल चेस लीग मसुदा: मॅग्नस कार्लसन, अनिश गिरी, दिव्या देशमुख, कोनेरू हम्पी एकाच संघात...

मॅग्नस कार्लसन, अनिश गिरी, दिव्या देशमुख आणि कोनेरू हंपी ग्लोबल चेस लीग (GCL) च्या सीझन 4 साठी प्लेयर ड्राफ्टने सोमवारी भरपूर उत्साह निर्माण...

मुंबईतील चार रेल्वे एफओबी असुरक्षित म्हणून ध्वजांकित केल्याबद्दल बीएमसी आयआयटी-बीला ऑडिट करणार आहे

मुंबई: रेल्वेने असुरक्षित म्हणून ध्वजांकित केलेल्या दक्षिण आणि मध्य मुंबईतील रेल्वे ट्रॅकवरील चार पादचारी पुलांचे IIT बॉम्बे द्वारे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाईल,...

‘सियाला कॅबमध्ये बसायचे नव्हते’: बाली ट्रिपच्या अगोदर, कॅब ड्रायव्हरच्या दाव्याने साहिल गोयल केतन अग्रवाल...

(LR) कॅब चालक (इमेज -सोशल मीडिया), केतन अग्रवाल, सिया गोयल आणि भाऊ साहिल गोयल पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या कथित हत्येच्या काही दिवस...

थोटा वैकुंटम: एका किराणा दुकान मालकाचा गावातील मुलगा जो भारतातील सर्वात प्रसिद्ध कलाकारांपैकी एक...

तेलंगणाच्या एका गावातल्या किराणा दुकानातून थोटा वैकुंटमचा कलात्मक प्रवास बहरला. प्रारंभिक शंका असूनही, त्याच्या समर्पणामुळे त्याला आंतरराष्ट्रीय ख्याती मिळाली. त्याची आई आणि त्याच्या...

उल्हासनगर महापालिकेच्या प्रभाग समिती सभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल : चौघांचीही बिनविरोध निवड , अधिकृत...

उल्हासनगर दि . २९ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर महानगरपालिकेच्या  चार प्रभाग समितीच्या सभापतीपदासाठी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. महायुतीच्या वाटपानुसार शिवसेना...

error: Content is protected !!