Homeशहरअंबरनाथ मध्ये मठात शिरला विषारी नाग : उपस्थित भाविकांनी केली नागोबाची पूजा

अंबरनाथ मध्ये मठात शिरला विषारी नाग : उपस्थित भाविकांनी केली नागोबाची पूजा

अंबरनाथ दि.४ ( प्रमोद दळवी ) : अचानक दुपारच्या सुमारास मठामध्ये एका सापाने एन्ट्री केल्याने भक्तगणांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पण काही वेळातच सर्व भक्तगणांनी मोठ्या मनोभावनेने आणि श्रद्धेने त्या सापाची पूजा केल्याची घटना अंबरनाथ मधील स्वामी समर्थ महाराज मठात घडली.

याबाबत सर्पमित्र प्रकाश गोहिल यांनी माहिती माहिती दिली. अंबरनाथ मधील स्वामी समर्थ चौकात स्वामी समर्थ महाराज मठ आहे. या मठात दुपारी दोनच्या सुमारास भक्तगण उपस्थित असताना अचानक एका सापाने मठात एन्ट्री केली. त्या सापाला पाहून सर्वप्रथम भक्तगण घाबरले. त्यांनी त्वरित सर्पमित्र प्रकाश गोहिल यांना या सापाची माहिती दिली. प्रकाश गोहिल यांनी त्वरित मठाकडे धाव घेत त्या सापाला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तो साप मठात सैरावैरा पळू लागला. काही वेळातच प्रकाश गोहिल यांनी त्या सापाला पकडून प्लास्टिकच्या बाटलीत ठेवले. त्या सापाची पाहणी केली असता तो दोन फुटी लांबीचा विषारी कोब्रा साप होता.

सध्या अति उष्णतेमुळे तो साप थंड जागेचे ठिकाण शोधण्यासाठी त्या मठात शिरला असावा असे गोहिल यांनी सांगितले. पकडण्यात आलेला साप हा विषारी कोब्रा जातीचा नाग आहे. हा नाग मठात शिरल्यामुळे उपस्थित भाविकांनी त्या नागाची पूजा करण्याची ठरवले. सर्पमित्र प्रकाश गोहिल यांनी त्या सापाला पकडून एका प्लास्टिकच्या मोठ्या बाटलीत ठेवले होते. ती बाटली त्यांनी भाविकांसमोर ठेवली. मठामध्ये साप  शिरल्याने सर्वप्रथम भाविकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते पण त्यानंतर सर्वांच्या मनातली भीती दूर होऊन त्यांनी भक्तीभावनेने हर हर महादेव म्हणत त्या नागराजाची पूजा केली. मठात सापाने एन्ट्री केल्यामुळे भक्तगणांमध्ये आनंदाचे वातावरण ही पाहायला मिळाले.त्यानंतर सर्पमित्र प्रकाश गोहिल यांनी त्या विषारी नागाला जंगलाच्या ठिकाणी जाऊन सोडले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

IPL संघांना 220+ स्कोअर रूढ झाल्यामुळे घरचा फायदा नाहीसा झाला आहे असे का वाटते

SRH सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा. (फोटो क्रेडिटः आयपीएल) नवी दिल्ली : या आयपीएलमध्ये 220 पेक्षा जास्त धावा होणे अपरिहार्य वाटते. त्याचा...

KL राहुलचे बंगळुरूतील घर हे क्रिकेटच्या यशावर आणि मजबूत कौटुंबिक मुळे बांधलेले करोडो किमतीचे...

केएल राहुल हा कदाचित भारतीय संघातील सर्वात विश्वासार्ह आणि स्टायलिश क्रिकेटपटूंपैकी एक आहे. आज तो जिथे आहे तिथे पोहोचण्यासाठी या खेळाडूने कठोर परिश्रम केले...

13 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पुण्यातील तरुणाला 20 वर्षांची शिक्षा

पुणे : हडपसर परिसरात आपल्या १३ वर्षीय मुलीवर १३ मे २०१८ रोजी घरात बलात्कार केल्याप्रकरणी शहरातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश डीपी रागीट यांच्या...

‘चमत्कार’ की 4L अजूनही धोकादायक bldgs मध्ये राहतात: HC पॅनेलने संकटाला ध्वज दिला

मुंबई: लाखो रहिवासी संरचनात्मकदृष्ट्या असुरक्षित इमारतींमध्ये राहतात याला "चमत्कार" म्हणत, मुंबई उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीने शहराच्या जुन्या उपकरप्राप्त इमारतींच्या दुरवस्थेबद्दल चिंता...

अनुराधा पतसंस्थेच्या प्रमुखाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याने ठेवीदार हतबल, सरकारकडून हस्तक्षेपाची मागणी

छत्रपती संभाजीनगर: हिंगोली येथील अनुराधा पतसंस्थेचे अध्यक्ष आणि ६.२७ कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी अशोक कांबळे यांचा रविवारी दुपारी परभणी कारागृहात हृदयविकाराच्या झटक्याने संशयास्पद...

error: Content is protected !!