Homeशहरबदलापूर मध्ये गोठ्यातील गाय चोरी करून कत्तलीचा धक्कादायक प्रकार उघडकीस : दोन...

बदलापूर मध्ये गोठ्यातील गाय चोरी करून कत्तलीचा धक्कादायक प्रकार उघडकीस : दोन तासातच दोन आरोपींवर झडप

बदलापूर दि २७ ( प्रमोद दळवी ) : बदलापूर येथील बॅरेज डॅम जवळ एका फार्म हाऊस जवळील गोठ्यातून गाय चोरी करून तिची हत्या केल्यावर तिच्या शरीराचे तुकडे केल्याचा धक्कादायक प्रकार फार्महाउस मधील केअरटेकरच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला आहे .बदलापूर पूर्व पोलिसांनी घटनास्थळी मिळालेल्या रिक्षावरून दोन आरोपींना अटक करण्यात यश आले आहे. या घटनेमुळे बदलापूर मध्ये संतापाचे वातावरण पसरले असून या आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्वत्र केली जात आहे.

ही घटना २३ डिसेंबर रोजी रात्री  आठ वाजण्याच्या सुमारास घडली. फार्म हाऊस मध्ये केअरटेकर म्हणून काम करणारे दत्ता आणि त्यांची पत्नी यांनी गोठ्यातील एक गाय गयाब झाल्याचे निदर्शनास आले .त्याचवेळी फार्म हाऊस परिसरातून एक रिक्षा संशयास्पद रित्या जाताना दिसल्याने त्यांना संशय आला. दत्ता यांनी आजूबाजूच्या परिसरात गायीची शोधाशोध सुरू केली असता फार्महाउस पासून काही अंतरावर तीन ते चार जण गाईची  हत्या करून तिचे तुकडे करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मात्र दत्ता यांना पाहताच  ते आरोपी रिक्षा घटनास्थळीस सोडून फरार झाले. या घटनेची माहिती तात्काळ बदलापूर पूर्व पोलिसांना देण्यात आली.

बदलापूर पूर्व पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करत तपासाला सुरुवात करीत त्या ठिकाणाहून एक रिक्षा ताब्यात घेतली. त्या रिक्षावरून पोलिसांनी तपास करीत इमाम अब्दुल रफिक शेख, व नदीम मुल्ला या दोन आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांनी अशा प्रकारचे काही गुन्हे पूर्वी केले आहेत का याचाही तपास पोलिसांनी सुरू केला आहे. दोघांनाही न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना एक दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे. या आरोपींसोबत आणखीन कोणाचा सहभाग आहे का याचाही तपास पोलिसांनी सुरू केला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली. या अगोदर देखील दोन वेळा या गोठ्यातून  गाय चोरी झाल्या होत्या. याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. त्याचाही तपास पोलीस करीत होते. आणि पुन्हा असाच प्रकार घडल्याने सर्वत्र संतापाचे वातावरण पसरले आहे

या बाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी सांगितले २३ डिसेंबर रोजी यातील फिर्यादी सौ स्नेहलता दत्तात्रय मदने या पवार फार्म हाऊस बदलापूर गाव परिसरात त्या ठिकाणी काम करतात त्यांनी बदलापूर पोलीस ठाण्यात येऊन संध्याकाळी सात ते रात्री दहा वाजे सुमारास त्यांच्या गोठ्यातील एक गाय चोरीला गेले असल्याची माहिती पोलिसांना दिली. डीबी पाकातील पोलिसांनी त्वरित त्या ठिकाणी धाव घेतली व त्वरित याप्रकरणी गुन्हा दाखल करीत तपासाचे सूत्र तात्काळ सुरू केले . पोलीस हवालदार जाधव, दळवे, पाटील, हाडके व मस्कर यांनी तपास करून दोन तासातच गाय चोरी करणारा इमाम अब्दुल रफिक शेख याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता जी गाय त्याने चोरी केली होती ती गाय बदलापूर शाळेच्या पाठीमागील नदीकडील भागात त्या ठिकाणी त्याचा सहकारी  नदीम मुल्ला याच्या मदतीने त्या गाईला कापली होती. घटनास्थळी मिळालेल्या रिक्षावरून दोन आरोपींना शोधण्यात पोलिसांना यश आले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्याच्या आयटी कॉरिडॉरमध्ये हिंजवडी, वाकड ड्राईव्ह होम डिमांड | पुणे बातम्या

पुणे : हिंजवडी, वाकड, रावेत, किवळे आणि महाळुंगे या शहराच्या आयटी कॉरिडॉरचा एक मोठा भाग एकूणच निवासी बाजारपेठेत वाढ करत आहे.गेरा रेसिडेन्शिअल...

वर्ल्ड कप फायनलमध्ये अर्जेंटिनावर नेहमीपेक्षा जास्त दबाव होता का? लिओनेल मेस्सीचा टनेल पेप इंधन...

विश्वचषक अंतिम फेरीदरम्यान लिओनेल मेस्सीच्या पेप टॉक्स स्पार्क सिद्धांत. (व्हिडिओ ग्रॅब्स) लिओनेल मेस्सीच्या प्री-मॅच आणि अर्धवेळ सांघिक चर्चेच्या ताज्या फुटेजने अर्जेंटिनाने 2026 FIFA...

टांझानियामधून फ्लायर्स बॅगमध्ये 2 लेमरची तस्करी, परत पाठवली

नवी मुंबई : टांझानियातून दोन फ्लायर्स बॅगेजमधून तस्करी केलेल्या दोन लेमरची सोमवारी मुंबई विमानतळावर सुटका करण्यात आली. कस्टम अधिकारी आणि वन्यजीव गुन्हे...

MSRTC ने अचानक भाडे वाढवल्याने प्रवाशांनी सबपार सेवांना कॉल केला | पुणे बातम्या

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर एमएसआरटीसीच्या बसेस पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) सामान्य बसेसच्या भाडेवाढीमुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.ते म्हणाले...

यूएस मधील 5 सर्वात लांब नद्या आणि अविश्वसनीय वन्यजीव तुम्ही तेथे पाहू शकता

अमेरिका त्याच्या गगनचुंबी इमारती आणि अद्वितीय वन्यजीव उद्यानांसाठी प्रसिद्ध आहे, तर सर्वात लांब नद्या आणखी एक कथा सांगतात. अमेरिकेतील सर्वात लांब नद्या निसर्गरम्य जलमार्गांपेक्षा...

error: Content is protected !!