उल्हासनगर दि १६ : महाबोधी महाविहार, बोधगया येथिल मानुवादी व्यवस्थेच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी महाबोधी विहार मुक्ती आंदोलन जगभर सुरू आहे. उल्हासनगरात आयोजित बौद्ध संघर्ष सभेच्या आयोजनातुनही या आंदोलनाचा हुंकार अनुभवायला मिळाला. उल्हासनगर कॅम्प नंबर ४ येथील सुभाष टेकडी, तक्षशिला महाविद्यालयाच्या प्रांगणात या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. महासंघनायक भंते डॉक्टर एन आनंद महाथेरो यांच्या नेतृत्वाखाली उल्हासनगर आणि आसपासच्या उपनगरातील तमाम बौद्ध जन या सभेला मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.
याप्रसंगी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे प्रणेते भंते विनाचार्य यांनीह उपस्थितांना आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. याप्रसंगी द बोधगया टेम्पल ॲक्ट १९४९ रद्द करा, संपूर्ण महाबोधी विहार त्याचे व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात द्या आणि महाविहार मुक्त करा या मागण्यांचा सामुदायिक पुनरुच्चार करण्यात आला
या सभेच्या आयोजनाकरिता भंते डॉक्टर सुगतानंद थेरो, भंते धम्मदर्शी थेरो, भंते शीलवंश थेरो, भंते दीपंकर भंते वीपसी, समस्त बौद्ध समाज आणि समस्त भिकू संघ यांच्या नियोजनातून हा कार्यक्रम संपन्न झाला.





























