Homeशहरडॉ. अनिल गणपत पावसे यांना ‘राष्ट्रीय शिक्षणरत्न पुरस्कार २०२६’ प्रदान उल्हासनगर वासियाकडून...

डॉ. अनिल गणपत पावसे यांना ‘राष्ट्रीय शिक्षणरत्न पुरस्कार २०२६’ प्रदान उल्हासनगर वासियाकडून अभिनंदनाचा वर्षाव.

उल्हासनगर दि १२ : शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक व संस्कारक्षम कार्याबद्दल उल्हासनगर येथील हनुमान व्यवस्थापक मंडळ संचलित छत्रपती शिवाजी महाराज प्राथमिक शाळेचे अध्यक्ष डॉ. अनिल गणपत पावसे यांना स्विफ्ट एन लिफ्ट मीडिया ग्रुप यांच्या वतीने आयोजित भव्य सोहळ्यात ‘राष्ट्रीय शिक्षणरत्न पुरस्कार २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले.

पिंपरी-चिंचवड येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे १२ जुलै रोजी पार पडलेल्या या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार वितरण सोहळ्यात शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट, मूल्याधिष्ठित आणि नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्या देशभरातील निवडक शिक्षणतज्ज्ञांचा सन्मान करण्यात आला.या प्रसंगी महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पिंपरी-चिंचवडच्या महापौर मंजुषा नागपुरे, आमदार शंकरराव जगताप, स्विफ्ट एन लिफ्ट मीडिया ग्रुपचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश साबे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते डॉ. पावसे यांना सन्मानचिन्ह (ट्रॉफी) व गौरवपत्र प्रदान करण्यात आले. डॉ. पावसे यांनी गेली अनेक दशके शिक्षण, समाजसेवा, साहित्य, संस्कृती, योग, पर्यावरण जनजागृती आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्य केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन त्यांना हा प्रतिष्ठेचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सन्मानाबद्दल विविध शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक व सांस्कृतिक संस्थांमधून तसेच मित्रपरिवार व हितचिंतकांकडून डॉ. अनिल पावसे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या यशामुळे उल्हासनगर शहरासह ठाणे जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वेस्ट इंडिज आणि इंग्लंड कसोटी दौऱ्यांपूर्वी पाकिस्तानच्या प्रशिक्षकाने राजीनामा दिला

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक 2023 सामन्यापूर्वी सराव सत्रादरम्यान पाकिस्तानचा बाबर आझम. (पीटीआय फोटो) पाकिस्तानचे क्षेत्ररक्षण...

मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कची मध्य रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे

वासिंद आणि आसनगाव स्थानकांदरम्यान मालवाहू गाडीच्या लोकोमोटिव्हमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेवर रविवारी दुपारी थोडा विस्कळीत झाला (प्रतिनिधी प्रतिमा) मुंबई : वासिंद आणि...

पुण्यातील वृद्धाची (७२) ऑनलाइन भामट्यांनी पोलिस असल्याची २१ लाखांची फसवणूक केली.

पुणे : ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांनी कोरेगाव पार्क येथील एका ७२ वर्षीय व्यक्तीला या वर्षी ६ ते ९ जुलै दरम्यान मुंबई गुन्हे शाखेचे...

IRCTC पूर्ण दर दर (Ftr): होय, तुम्ही खरोखरच संपूर्ण भारतीय रेल्वे ट्रेन बुक करू...

जर तुम्हाला वाटत असेल की फक्त खाजगी जेट आणि नौका बुक करणे शक्य आहे, तर तुम्हाला हे वाचावे लागेल. कारण तुम्ही तुमच्या...

जनता वसाहत येथे वटवृक्ष अंगावर पडल्याने दोन महिला जखमी | पुणे बातम्या

एका मोठ्या वटवृक्षावर पडलेल्या दोन जखमी महिलांना आपत्कालीन प्रतिसादकर्ते मदत करतात, अचानक झाड पडण्याची दुर्घटना आणि सार्वजनिक सुरक्षेच्या समस्यांवर प्रकाश टाकतात (प्रतिनिधी प्रतिमा)...

error: Content is protected !!