उल्हासनगर दि.२८ : उल्हासनगर महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त श्रीम. मनिषा आव्हाळे (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे उल्हासनगर शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी पर्यावरणपुरक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
उल्हासनगरातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी जास्तीत जास्त या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महापालिकेचेवतीने ही स्पर्धा दि.२७ ऑगस्ट २०२५ ते दि.६ सप्टेंबर २०२५ पर्यंत ठेवण्यात आली आहे. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक ३,००,००० व प्रमाणपत्र,द्वितीय पारितोषिक १,५०,००० व प्रमाणपत्र, तृतीय पारितोषिक ५०,००० व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे .नोंदणीसाठी उल्हासनगर महानगरपालिकेच्या अधिकृत सोशल मिडीया पेजेंसना भेट द्या.. क्यूआर कोड स्कॅन करून आपली नोंदणी करा असे आवाहन करण्यात आले आहे.
याकरिता ऑडिओ क्लिप द्वारे सर्व प्रभाग समितीमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे, चला आपण सर्व मिळून हा उत्सव हरित आणि यशस्वी करूया.चला या गणेशोत्सवात आपण सर्वांनी मिळून उल्हासनगरला द्यायचं आहे एक हरित आणि स्वच्छ संदेश व राज्य महोत्सव म्हणून घोषित करण्यात आलेल्या गणेश उत्सवाला पर्यावरणपुरक पद्धतीने साजरा करून ही स्पर्धा यशस्वी करूया असे आवाहन पालिकेने केले आहे.





























