अंबरनाथ दि.२८ : बुधवारी गणपती बाप्पाचे आगमन झाले. मोठ्या उत्साहात धुमधडाक्यात नाचत गाजत गणपती बाप्पाच्या आगमन झाले असून यावेळी अंबरनाथ मध्ये अनेक नागरिकांनी आपल्या निवासस्थानी गणपती बाप्पाच्या आकर्षक मुर्त्या बसवल्या आहेत. अंबरनाथ मधील मोरीवली गाव येथे राहणारे जेष्ठ पत्रकार दिलीप उबाळे यांच्या घरी गणपती बाप्पाची आकर्षक मूर्ती बसवण्यात आली आहे. याशिवाय त्यांनी उत्कृष्ट देखावा ही केला आहे. उबाळे यांच्या नातेवाईकांच्या घरी देखील गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे.






























