उल्हासनगर दि. २० : राजस्थानी महिला सेवा समितीच्या पुढाकाराने उल्हासनगरमध्ये हरियाली तीज २०२५ सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपरिक पोशाख, नृत्य, मेहंदी सजावट, आणि हास्यविनोदाने परिपूर्ण अशी सायंकाळ स्त्रीशक्तीचा सन्मान करणारी ठरली.

हा कार्यक्रम उल्हासनगर येथील विश्राम भवन, सेंच्युरी रेयान, पॅनल क्र.१,मध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सौ. परमिंदर कौर भुल्लर – प्रेरणादायी सामाजिक कार्यकर्ती,सौ. पूनम यादव (शिवसेना उपशहर संघटिका),सौ.सोनी खैरे – (शिवसेना उपशहर संघटिका),सौ. सविता कुंभार (शिवसेना विभाग संघटिका),सौ. गीता शुक्ला (शिवसेना उपविभाग संघटिका),यांच्यासह श्रीमती वंदना शर्मा (अध्यक्ष),श्रीमती सुनीता सैनी,श्रीमती संगीता शेखावत,श्रीमती सुनीता शर्मा,श्रीमती सपना धंड,श्रीमती हेमा शर्मा,श्रीमती लता सैनी,श्रीमती सुनीता वर्मा,श्रीमती रेखा शर्मा,श्रीमती अंशू शर्मा,श्रीमती रेखा सोनी,श्रीमती संगीता वर्मा,श्रीमती अमिता शर्मा अधि महिला उपस्थित होत्या. सौ. परमिंदर कौर भुल्लर यांनी मान्यवर महिला पाहुण्यांचा सत्कार केला . या कार्यक्रमासाठी स्थानिक पदाधिकारी ज्यांनी आयोजनात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. पारंपरिक खेळ आणि नृत्य स्पर्धांमधून महिलांनी आपल्या कलागुणांना वाव दिला.






























