- “कांग्रेस जनता निवारण कक्षाचे” केले उद्घाटन
उल्हासनगर दि.१० : अखिल भारतीय कांग्रेस सचिव व कोकण प्रभारी श्री यू बी व्यंकटेश ह्यांनी उल्हासनगरचा दौरा केले असून त्यांच्या सोबत महाराष्ट्र कांग्रेस महासचिव श्री गुरुबिंदरसिंग बच्चर व सचिव श्री ब्रिज दत्त हे देखील उपस्थित होते.
सदर दौऱ्या वेळी डॉलफिन होटल सी ब्लॉक येथे प्रथम त्यांनी सर्व उल्हासनगर कांग्रेस पदाधिकाऱ्यांची भेट घेतली व पक्ष संघटना , महानगरपालिका निवडणूक संदर्भाचा आढावा घेत मार्गदर्शन केले.ह्या वेळी बोलताना त्यांनी उल्हासनगर शहर हे नागरी सुविधा अभावी ग्रस्त असून येणाऱ्या महानगरपालिका साठी सज्ज होण्या संदर्भात व स्थानिक पातळीवरील शहरातील नगरीसमस्या संदर्भात विविध प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलन करण्याचे सूचना दिल्यात व सदर आंदोलना साठी पूर्ण समर्थन व पाठबळ हे महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीने देण्यात येईल अशे आश्वासन दिले.
ह्या वेळी जिल्हा अध्यक्ष रोहित साळवे ह्यांच्या पुढाकाराने “कांग्रेस जनता निवारण कक्ष “ ही उल्हासनगर शहरातील पाच कॅम्प मध्ये पाच कार्यालयात सुरू करण्यात येणार असून त्याचे उद्घाटन श्री यू बी व्यंकटेश ह्यांच्या हस्ते करण्यात आले.ह्या योजने अंतर्गत दर बुधवारी दुपारी ३ ते ६ ,ह्या निवारण कक्षात नागरिकांच्या विविध तक्रारी ज्या मध्ये महानगरपालिका ,प्रांत/ तहसील कार्यालय, पोलिस स्टेशन ,सेंट्रल हॉस्पिटल , महावितरण विभाग व इतर कोणतेही तक्रारी प्रलंबित असल्यास ह्या निवारण कक्ष मार्फत नागरिकांना मार्गदर्शन व त्याचे निवारण करण्यासाठी सर्व मदत करण्यात येणार असल्याचे सांगितले.सदर निवारण कक्षाचे पत्ता कॅम्प क्र १ – विठ्ठल संकुल ,शहाड गावठाण ,सेंचुरी स्टॉप गेट.संपर्क – श्याम मडवी 8308111787 कॅम्प क्र २ – ब्लॉक २९२ ,शॉप क्र ९, अण्णाभाऊ साठे चौक ,ओटी सेक्शन.संपर्क-डॉ हितेश सचवाणी 8329242165 कॅम्प क्र ३- नेहरू भवन , नेहरू चौक , फर्नीचर बाजार.संपर्क – श्री किशोर धडके,कॅम्प क्र ४- विनायक अपार्टमेंट ,बॅरेक क्र १५८१/१, सेक्शन २७ ,संपर्क – पवन मिरणी 7498900900,कॅम्प क्र ५- शॉप क्र ४, शिव कॉलोनी , ओटी सेक्शन ,संपर्क – महादेव शेलार 7841037774,असा आहे . कार्यक्रम नंतर सर्व मान्यवरांनी खेमानी येथील डॉ हितेश सचवणी ह्यांच्या जनता निवारण कक्ष कार्यालयास भेट दिली व त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.सदर कार्यक्रमा वेळी उल्हासनगर कांग्रेस कमिटीचे सर्व प्रमुख पदाधिकारी ,इच्छुक उमेदवार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





























