Homeशहरमुंब्रा परिसरातील निर्घृण हत्येचा उलगडा : ओळख पटू नये म्हणून मृतदेहाचे मुंडके...

मुंब्रा परिसरातील निर्घृण हत्येचा उलगडा : ओळख पटू नये म्हणून मृतदेहाचे मुंडके व हात वेगळे, दोघांना अटक: गुन्हे शाखा घटक-४, उल्हासनगर पोलिसांची कामगिरी

उल्हासनगर दि. १६ ( प्रमोद दळवी )  : मुंब्रा परिसरात एका तरुणाची अत्यंत क्रूरपणे हत्या करून त्याची ओळख पटू नये म्हणून मृतदेहाचे मुंडके धडापासून वेगळे करणे, दोन्ही हात कापून मृतदेहाचे अवयव वेगवेगळ्या निर्जन ठिकाणी फेकून दिल्याच्या धक्कादायक प्रकरणाचा गुन्हे शाखा घटक-४, उल्हासनगर  पोलिसांनी  पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांनी जुन्या वादातून मित्राची हत्या केल्याची कबुली दिली आहे.

गुन्हे शाखा, घटक-४ चे पोलीस निरीक्षक राजेश गज्जल यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खर्डी गाव परिसरात एका इसमाची हत्या करून त्याचे मुंडके व हात वेगळे करून मृतदेह निर्जनस्थळी टाकण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या माहितीची खातरजमा करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी फैज सुलतान मालीम (वय २४, व्यवसाय रिक्षाचालक) व अल्बान सुलतान मालीम (वय २३, व्यवसाय रिक्षाचालक), दोघेही रा. म्हाडा बिल्डिंग क्र. ३, भंडार्ली उत्तरशिव, शिळ-डायघर, ठाणे यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. सखोल चौकशीत आरोपींनी त्यांचा मित्र अमन मुस्तकीन शेख (वय अंदाजे २३, रा. रशिद कंपाऊंड, श्रीलंका परिसर, देवरीपाडा, मुंब्रा) याची १३ मार्च २०२६ रोजी जुन्या वादातून हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजता आरोपींनी अमन शेख याला श्रीलंका परिसरातून रिक्षामध्ये बसवून निर्जन ठिकाणी नेले. तेथे धारदार चाकूने त्याचा गळा चिरून हत्या करण्यात आली. त्यानंतर मृताची ओळख पटू नये म्हणून त्याचे मुंडके धडापासून वेगळे करण्यात आले तसेच दोन्ही हात कापून मृतदेहाचे विविध अवयव खर्डी गाव व इतर निर्जन ठिकाणी फेकून देण्यात आले.

या निर्घृण हत्येचा व्हिडीओ आरोपींनी स्वतःच्या मोबाईलमध्ये चित्रीत केल्याचे तपासात समोर आले असून, संबंधित मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. हा मोबाईल या गुन्ह्यात महत्त्वाचा पुरावा मानला जात आहे. या घटनेबाबत मुंब्रा पोलीस ठाण्यात सुरुवातीला अकस्मात मृत्यू क्रमांक ११४/२०२६ अन्वये नोंद करण्यात आली होती. मात्र वैद्यकीय अहवालानंतर हा मृत्यू संशयास्पद असल्याचे स्पष्ट झाल्याने मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ११९३/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) व २३८ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान अटक करण्यात आलेल्या फैज सुलतान मालीम याच्याविरुद्ध यापूर्वीही मुंब्रा पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मृताची ओळख ओळख पटू नये म्हणून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आलेल्या या क्रूर हत्येचा उलगडा गुन्हे शाखा, घटक-४, उल्हासनगरच्या पथकाने कोणताही ठोस प्रारंभिक पुरावा नसतानाही उत्कृष्ट तपासकौशल्याच्या बळावर केला. ही कारवाई पोलीस सहआयुक्त (गुन्हे) डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (शोध-१) शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश गज्जल, सपोनि श्रीरंग गोसावी, सपोउनि बबन बांडे, पोलीस हवालदार गणेश गावडे, पोलीस हवालदार राजेंद्र थोरवे, पोलीस हवालदार, मंगेश जाधव, पोहवा अमर कदम, पोलीस हवालदार योगेश वाघ, पोहवा अशोक थोरवे, पोहवा प्रकाश पाटील, पोहवा रितेश वंजारी, पोहवा सतिश सपकाळे, पोहवा शेखर भावेकर, पोहवा विक्रम जाधव, पोहवा सुरेश जाधव, पोना  संजय शेरमाळे, पो.शि नितीन बैसाणे, पो.शि रेवणनाथ शेकडे, पोशि प्रसाद तोंडलीकर, पोशि बाबुलाल जाधव, पो.शि रामदास उगले, चापोशि अविनाश पवार, मपोहवा  खेडेकर, मपोना कुसूम शिंदे, मपोशि मनोरमा सावळे या पोलीस पथकाने पार पाडली. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, हत्येमागील नेमके कारण, कटात आणखी कोणाचा सहभाग होता का, तसेच जप्त करण्यात आलेल्या मोबाईलमधील व्हिडीओ व अन्य डिजिटल पुराव्यांच्या आधारे अधिक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विराट कोहलीने मोडला रिकी पाँटिंगचा विक्रम, सर्वकालीन टॉप-फाइव्ह एलिट यादीत प्रवेश | क्रिकेट बातम्या

भारताचा विराट कोहली (ANI फोटो) विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याच्या चमकदार कारकिर्दीत आणखी एक मैलाचा दगड जोडला आणि ऑस्ट्रेलियन महान रिकी...

NITI आयोगाच्या अहवालात व्यापक पर्यटन सुधारणांची अपेक्षा आहे; हॉटेलची वाढ मंदावणारी नियामक अडथळे |...

नवीन NITI आयोग अहवाल हॉटेल प्रकल्प आणि पर्यटन वाढीला गती देण्यासाठी जलद मंजूरी आणि सोप्या नियमांची शिफारस करतो (प्रतिनिधित्वात्मक हेतूंसाठी AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा)...

‘निराधार कथा तरंगणे थांबवा’: FDA ने मसाल्यांचे दुकान सील केल्यानंतर सिया गोयलच्या वडिलांचा छळाचा...

प्रवीण गोयल (एल) यांचा दावा आहे की FDA ने त्यांचे दुकान निलंबित केल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला अनावश्यक छळाचा सामना करावा लागला. पुणे: महाराष्ट्राच्या अन्न...

लोक त्यांच्या खिडकीत धातूचा चमचा का ठेवत आहेत? व्हायरल युक्तीमागील विज्ञान |

खिडक्यांवर घनीभूत होणे ही बऱ्याच घरांमध्ये एक सामान्य समस्या आहे, विशेषत: थंडीच्या महिन्यांत जेव्हा उबदार घरातील हवा थंड काचेला भेटते. हे एक...

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने उल्हासनगरच्या आरोग्य व्यवस्थेला नवी दिशा : उपजिल्हा रुग्णालय...

उल्हासनगर दि. १६ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगरच्या आरोग्य व्यवस्थेला नवी दिशा देणारा ऐतिहासिक निर्णय घेत, मध्यवर्ती उपजिल्हा रुग्णालयातील खाटांची संख्या २०२ वरून...

error: Content is protected !!