Homeशहरशिव मंदिर परिसराच्या सुशोभीकरणाकरिता पालिकेचे एकता नगरच्या जवळपास ३० घरांना खाली करण्याचे...

शिव मंदिर परिसराच्या सुशोभीकरणाकरिता पालिकेचे एकता नगरच्या जवळपास ३० घरांना खाली करण्याचे आदेश

  • बेघर होण्याच्या भीतीने नागरिक संताप
  • पर्यायी व्यवस्था करण्याची नागरिकांची मागणी
  • उल्हासनगर महापालिकेच्या विरोधात नागरिक आक्रमक

उल्हासनगर दि . २६ ( प्रमोद दळवी ) :  प्राचीन शिव मंदिराच्या परिसराच्या विकासासाठी उल्हासनगरतील कॅम्प  नंबर -५  परिसरातील कैलास कॉलनी येथील एकता नगर मधील जवळपास ३० हून अधिक घरांना उल्हासनगर महानगरपालिकेने नोटीस बजावून त्यांना त्वरित आपले घर खाली करण्याचे आदेश दिले आहे. अन्यथा पालिकेच्या वतीने घरांवर तोडक कारवाई केली जाईल असा इशारा दिल्याने त्यातील रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. जवळपास ४०  ते ५०  वर्षापासून त्या ठिकाणी आपण वास्तव्यास आहोत. आम्हाला जोपर्यंत पर्याय जागा देत नाही तोपर्यंत आम्ही आमचे घर खाली करणार नाही असा इशारा संतप्त नागरिकांनी महानगरपालिकेला दिला आहे.  आता महानगरपालिका यावर कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

अंबरनाथच्या प्राचीन शिव मंदिराच्या परिसराचे शुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी उल्हासनगरतील कॅम्प  नंबर -५  परिसरातील कैलास कॉलनी येथील एकता नगर मध्ये राहणाऱ्या जवळपास ३० ते ३५  घरे बाधित होणार आहेत. एकंदरीत 30 ते 35 कुटुंब उघड्यावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या वर्षी देखील उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने ही घरे बेकायदेशीर असल्याचे सांगत त्यांना  नोटीसा बजावला होत्या. उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त यांनी गेल्या वर्षी  अंबरनाथच्या मुख्याधिकारी यांना पत्र देत त्यांनी या घरांचे जोपर्यंत पुनर्वसन व त्यांना पर्याय जागा देत नाही तोपर्यंत आम्ही यांची घरे खाली करणार नाही व कारवाई करणार नाही असे सांगितले होते. पण आता उल्हासनगर महानगरपालिकेने नोटीसी बजावून त्या परिसरातील नागरिकांना त्वरित आपले घर खाली करण्याचे आदेश दिल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहेत. जवळपास ४० ते ५०  वर्षापासून एकता नगर परिसरात ३०  ते ३५  घरांचे कुटुंब त्या ठिकाणी राहत असल्याचे ते सांगत आहेत.. पालिका आता या घरांवर कारवाई करणार असल्याच्या नोटीशी बजावल्याने  हे कुटुंब बेगर होणार आहेत. यासंदर्भात न्यायालयात खटला देखील सुरू असल्याचे व त्याची सुनावणी २  मार्च रोजी होणार असल्याचे त्या परिसरातील नागरिक सांगत आहेत.

त्या परिसरातील रहिवाशांचे असे म्हणणे आहे की प्रशासनाने प्रथम नुकसान भरपाई द्यावी व पर्यायी जागेची व्यवस्था करावी त्यानंतरच ते स्वतःहून घरे रिकामी करून प्रशासनाच्या ताब्यात देतील. पालिकेने अचानक सुरू केलेल्या कारवाईमुळे नागरिकांना बेघर होण्याची वेळ आली असल्याचे ते सांगत आहेत. त्यावेळी  एकता नगर परिसरातील नागरिक एकत्र मोठ्या संख्येने गोळा होऊन पालिकेच्या कारवाईच्या विरोधात उभे राहिले व प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. याप्रकरणी प्रशासनाने योग्य तो तोडगा काढावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आम्हाला न्याय द्यावा, गेल्या ४०  ते ५० वर्षापासून आम्ही ज्या ठिकाणी राहतो ते घर खाली करण्याआधी आम्हाला पर्याय जागा देण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे,

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

9 दिवसांच्या मुसळधार पावसाने महाराष्ट्रातील मान्सूनची तूट पुसली; पुणे, मुंबई सर्वाधिक नफा मिळवणाऱ्यांमध्ये |...

पुण्यातील जलाशयांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसानंतर अधिकाऱ्यांनी खडकवासला धरणातून पाणी सोडल्यानंतर पाण्याचा साचलेला परिसर दाखविणारे विहंगम दृश्य पुणे : जून महिना संपल्यानंतर अवघ्या...

पाच गोल, एक लाल कार्ड: एस्टाडिओ अझ्टेकामध्ये इंग्लंड विरुद्ध मेक्सिको फेरीच्या 16 ने टीव्ही...

रविवारी, 5 जुलै, 2026 रोजी मेक्सिको सिटी येथे मेक्सिको आणि इंग्लंड यांच्यातील विश्वचषक फेरीच्या 16 सॉकर सामन्यात दुसरा गोल केल्यानंतर इंग्लंडचा ज्युड बेलिंगहॅम...

महा सरकारने UCC मसुद्यासाठी निवृत्त SC न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय समिती स्थापन केली

मुंबई : एकसमान नागरी संहिता (यूसीसी) लागू करण्याच्या दिशेने महाराष्ट्र सरकारने पहिले पाऊल टाकले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहा महिन्यांत त्याच्या...

विषारी वायू, अस्थिर इमारत मोशी बचावात अडथळा

मोशी बचाव कार्य पुणे : मोशीतील टन कचऱ्याच्या दरम्यान कोसळलेल्या इमारतीत अडकलेल्या सात लोकांसाठी आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करणारे अनेक बचाव...

हजारो वर्षे जुने आणि अजूनही मजबूत उभे आहेत: जगातील सर्वात शक्तिशाली किल्ल्यांच्या आत

अलेप्पोचा किल्ला, सीरिया (इमेज क्रेडिट: कॅनव्हा) युगानुयुगे, किल्ले सामर्थ्य, सहनशक्ती आणि अपवादात्मक अभियांत्रिकी पराक्रमांचे स्मारक मानले गेले आहेत. राज्यांचे रक्षण करण्यासाठी, व्यापार मार्गांचे...

error: Content is protected !!