Homeशहरअखेर उल्हासनगर महापालिकेची सुसज्ज अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी खुली : मात्र ७ दिवसात अभ्यासिका...

अखेर उल्हासनगर महापालिकेची सुसज्ज अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी खुली : मात्र ७ दिवसात अभ्यासिका पूर्ण क्षमतेने विद्यार्थ्यांसाठी कार्यान्वित होणार

उल्हासनगर, दि. ९ ( प्रमोद दळवी )   : उल्हासनगर महानगरपालिका शाळा क्रमांक १७ परिसरातील विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात आलेली सुसज्ज शैक्षणिक अभ्यासिका अनेक महिन्यांपासून सुरू न झाल्याने भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका सुरेखा हनुमंत आव्हाड आणि शोभाताई दिनकर जाधव यांनी गुरुवारी धरणे आंदोलन व उपोषण सुरू केले. आंदोलनाचा तात्काळ परिणाम दिसून आला असून महानगरपालिका प्रशासनाने अखेर अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी खुली केली आहे. मात्र ७ दिवसात अभ्यासिका पूर्ण क्षमतेने विद्यार्थ्यांसाठी कार्यान्वित होणार आहे असे पत्र नगरसेविका श्रीमती शोभाताई जाधव यांना उल्हासनगर महापालिका शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आले आहे.

उल्हासनगरातील कॅम्प क्रमांक ३, .सी. ब्लॉक, पॅनल क्रमांक ४ येथील महापालिका शाळा क्रमांक १७ जवळ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयीसाठी आधुनिक सुविधांनी सुसज्ज अभ्यासिका उभारण्यात आली होती. मात्र इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊनही विद्यार्थ्यांना तिचा लाभ मिळत नसल्याने परिसरातील नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये नाराजी होती. या पार्श्वभूमीवर नगरसेविका सुरेखा आव्हाड आणि शोभाताई जाधव यांनी पालिका प्रशासनाला अभ्यासिका तातडीने सुरू करण्याची मागणी केली होती. मागणी मान्य न झाल्यास उपोषण आणि धरणे आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार गुरुवारी आंदोलन सुरू होताच पालिका प्रशासनाने तातडीने अभ्यासिकेचे संचालन सुरू केले.

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी सांगितले की, आजपासून विद्यार्थी अभ्यासिकेत बसून अभ्यास करू शकतात. तसेच इंटरनेटसह इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम सुरू करण्यात आले असून येत्या मंगळवारपर्यंत सर्व मूलभूत सुविधा पूर्ण करून अभ्यासिका पूर्ण क्षमतेने विद्यार्थ्यांसाठी कार्यान्वित करण्यात येणार आहे.

आंदोलनादरम्यान नगरसेविकांनी अभ्यासिकेत इंटरनेट, पुस्तके, आवश्यक शैक्षणिक साहित्य आणि इतर मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा मुद्दा उपस्थित केला. तसेच इमारतीमध्ये ओलावा (सीलन) असल्याने त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या हितासाठी या सर्व समस्या तात्काळ सोडवाव्यात, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. दरम्यान, आंदोलनाच्या वेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी आणि महापालिका कर्मचारी राजेश घनघाव यांच्यात काही मुद्द्यांवर शाब्दिक वादही झाला. मात्र आंदोलन अधिक तीव्र होण्यापूर्वीच प्रशासनाने अभ्यासिका सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने आंदोलनकर्त्यांनी याचे स्वागत केले.

“अभ्यासिका सुरू होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील,” असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला होता. प्रशासनाने तत्काळ सकारात्मक निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून परिसरातील विद्यार्थी आणि पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. त्यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश वधारीया हे देखील उपस्थित होते. या आंदोलनात प्रियांका गौतम जाधव, आशाताई कदम, शिवानी सिंह, नंदा सिंथल, हनुमंत कचरे, विजय जाधव, प्रमोद पानपाटील, मनोहर बहनवाल, हरिहर तिडके, मुकेश चौथमल, संतोष चौधरी, निलेश आमनानी, हर्ष बहनवाल, गौरव पठारे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला, पुरुष आणि विद्यार्थी सहभागी झाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महा सरकारने UCC मसुद्यासाठी निवृत्त SC न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय समिती स्थापन केली

मुंबई : एकसमान नागरी संहिता (यूसीसी) लागू करण्याच्या दिशेने महाराष्ट्र सरकारने पहिले पाऊल टाकले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहा महिन्यांत त्याच्या...

विषारी वायू, अस्थिर इमारत मोशी बचावात अडथळा

मोशी बचाव कार्य पुणे : मोशीतील टन कचऱ्याच्या दरम्यान कोसळलेल्या इमारतीत अडकलेल्या सात लोकांसाठी आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करणारे अनेक बचाव...

हजारो वर्षे जुने आणि अजूनही मजबूत उभे आहेत: जगातील सर्वात शक्तिशाली किल्ल्यांच्या आत

अलेप्पोचा किल्ला, सीरिया (इमेज क्रेडिट: कॅनव्हा) युगानुयुगे, किल्ले सामर्थ्य, सहनशक्ती आणि अपवादात्मक अभियांत्रिकी पराक्रमांचे स्मारक मानले गेले आहेत. राज्यांचे रक्षण करण्यासाठी, व्यापार मार्गांचे...

८५ कोटींच्या विकासकामांना स्थगिती देण्याची विरोधी पक्ष नेत्या अंजली साळवे यांची मागणी

उल्हासनगर दि. ९ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर महानगरपालिकेअंतर्गत विविध योजनांमधून मंजूर करण्यात आलेल्या सुमारे ८५ कोटी रुपयांच्या विकासकामांच्या निविदा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित...

पुण्यातील सर्वाधिक पूरप्रवण परिसर, एकतानगरी येथे पुन्हा पूर आला, यावेळी धरणातून २७,००० क्युसेसने विसर्ग

बुधवारी (8 जुलै) एकतानगरीत बचावकार्य सुरू होते. छायाचित्र श्याम सोनार पुणे : शेवटच्या वेळी एकतानगरीतील रहिवाशांना 2024 मध्ये गंभीर पुराचा इशारा देण्यात आला...

error: Content is protected !!