Homeताज्या बातम्याशिवसेना पक्षाच्या वतीने मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना तातडीने मदत रवाना

शिवसेना पक्षाच्या वतीने मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना तातडीने मदत रवाना

मुंबई दि.२४ : राज्यात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात झालेल्या अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे असून महायुती सरकारचे सर्व मंत्री पूरग्रस्त जिल्ह्यांचा दौरा करून तेथील पिकांच्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. धारशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे स्वतःदेखील धाराशिव जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. शिवसेना पक्षाच्या वतीने मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी आज तातडीने मदत पाठवण्यात आली आहे.

मराठवाड्यातील अतिवृष्टीबाबत कालच शिंदे यांनी विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून बोलून त्यांच्याकडून माहिती घेतली. ते स्वतः धाराशिवला जाणार असून भूम, परांडा, कळंब या तालुक्यांना भेट देणार आहेत. मराठवाड्यातील सर्व जिल्हे, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात काही भागात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसामुळे काही भागात संपूर्ण जमीन खरडून वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. आज पार पडलेल्या कॅबिनेट बैठकीत याबाबत गांभीर्याने चर्चा झाली असून शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार जलदगतीने जमिनींचे पंचनामे करणे तसेच जनावरांची हानी झाली आहे त्याला तातडीने मदत देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार महायुतीचे सर्वच मंत्री अतिवृष्टीग्रस्त भागांत स्थानिक अधिकाऱ्यांसोबत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची स्थिती जाणून घेतील. अतिवृष्टीनंतर साथींचे आजार पसरण्याचा धोका निर्माण झाल्याने आरोग्य मंत्री मा. प्रकाश आबिटकर हे स्वतः मराठवाड्याचा दौरा करणार आहेत.

यासंदर्भात आज पत्रकार परिषदेत सर्व उपाययोजनांची माहिती देण्यात आली. यावेळी परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक, खासदार मिलिंद देवरा, आमदार प्रा.मनिषा कायंदे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, कॅप्टन अभिजीत अडसूळ, मंगेश चिवटे उपस्थित होते.

शिवसेना पक्षाच्या वतीने मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी आज तातडीने मदत पाठवण्यात आली. मदत घेऊन जाणाऱ्या वाहनांना शिवसेनेचे मुंबईतील कार्यालय बाळासाहेब भवन येथे भगवा झेंडा दाखविल्यानंतर हे ट्रक मदत साहित्य घेऊन धाराशिव जिल्ह्याकडे रवाना झाले आहेत . यात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाकडून पाठवण्यात येणारं डॉक्टरांचे पथक, जीवनावश्यक वस्तूंची किट्स, घरात लागणाऱ्या वस्तू आणि औषधांचा समावेश असेल. असे ५० ते ६० ट्रक अतिवृष्टीग्रस्त भागात पाठवण्यात येणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

टायटन्स खूप उंच: सीएसकेने आयपीएल प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर फेकले कारण गुजरातचे टॉप-ऑर्डर मशीन चालू...

नवी दिल्ली: गुजरात टायटन्सने गुरुवारी अहमदाबादमध्ये चेन्नई सुपर किंग्जला 89 धावांनी पराभूत करून आयपीएल 2026 मध्ये टॉप-टूच्या जवळ पोहोचले.गिल, सुदर्शन आणि बटलर...

2029 च्या निवडणुकीवर लक्ष ठेवून पक्षाची पुनर्बांधणी करण्यासाठी काँग्रेसने महाराष्ट्रात 69 शहर आणि जिल्हाप्रमुखांची...

पुणे: अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने (AICC) 2029 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रात 69 नवीन शहर आणि जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली आहे. एआयसीसीचे सरचिटणीस...

भविष्यातील निवडणुकांवर लक्ष ठेवून AICC ने 69 शहर, जिल्हा अध्यक्षांची नियुक्ती केली आहे

एमपीसीसीचे उपाध्यक्ष मोहन जोशी पुणे : अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) ने 2029 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यात 69 नवीन शहर आणि जिल्हाध्यक्षांची...

डोनाल्ड ट्रम्प ज्युनियरशी घटस्फोटानंतर तिच्या आयुष्यात.

त्यांनी तपशील गोपनीय ठेवल्यामुळे, अफवा गिरणीने काय चूक झाली याचा अंदाज लावण्यात अनेक वर्षे घालवली. काही वेगळे वर्णने पुढे आली:राजकीय दबाव: एप्रिल 2025 मध्ये,...

जास्त मासेमारी, हवामानातील बदल भारतातील सार्डिनची संख्या झपाट्याने कमी करू शकतात: अभ्यास | पुणे...

पुणे : हवामान-संबंधित बदलांसह मासेमारीच्या दाबात तीव्र वाढ, देशाच्या नैऋत्य किनारपट्टीवरील सार्डिनच्या संख्येवर गंभीरपणे परिणाम करू शकते.भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM) आणि...

error: Content is protected !!