Homeशहरशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षाचे उल्हासनगर शहर प्रमुख कैलास तेजी यांच्यासह...

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षाचे उल्हासनगर शहर प्रमुख कैलास तेजी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश

उल्हासनगर दि ८ ( प्रमोद दळवी )  : कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या संघटनात्मक मजबुतीसाठी आणि आगामी राजकीय रणनीतीच्या दृष्टीने डोंबिवली येथे महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांशी सविस्तर संवाद साधत स्थानिक पातळीवरील संघटन अधिक बळकट करण्याचे आवाहन केले. त्या वेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षाचे उल्हासनगर शहर प्रमुख कैलास तेजी, उपशहर प्रमुख राजू माने यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला

बैठकीदरम्यान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बूथस्तरापासून संघटन मजबूत करण्यावर भर देण्याची गरज अधोरेखित केली. कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधून त्यांनी त्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि सूचनाही जाणून घेतल्या. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.दरम्यान, उल्हासनगरमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षाचे शहर प्रमुख कैलास तेजी, उपशहर प्रमुख राजू माने, विभाग संघटक निरंजन दास, महिला शहर संघटक जया तेजी आणि उपशहर संघटक कुसुम माने यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना (एकनाथ शिंदे गट) मध्ये प्रवेश केला.

हा प्रवेश सोहळा उल्हासनगर महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पार पडला असून, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते सर्वांचा पक्षप्रवेश करण्यात आला. या प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात नवे वळण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.या कार्यक्रमाला खासदार नरेश म्हस्के, आमदार डॉ. बालाजी किणीकर, आमदार राजेश मोरे, युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, शिवसेना उपनेते रवींद्र फाटक, उल्हासनगर महापौर अश्विनी निकम, कल्याण-डोंबिवली महापौर हर्षाली चौधरी, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी आणि जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे उल्हासनगर महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, शिवसेना गटनेता व नगरसेवक अरुण आशान ,नगरसेवक भूल्लर महाराज, रवींद्र निकम,  यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

तसेच नगरसेवक, विभागप्रमुख, शाखाप्रमुख आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळाली. या सर्व घडामोडींमुळे कल्याण लोकसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही घटना निर्णायक ठरू शकते, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

एनबीएचा पुढील शोध सुपरस्टारसाठी नाही. हे पुढील मोठ्या कल्पनेसाठी आहे

डेव्हिड ली, एनबीए इन्व्हेस्टमेंटचे प्रमुख. (फोटो क्रेडिट: एनबीए रायझिंग स्टार्स इनव्हिटेशनल) सिंगापूरमधील TimesofIndia.com: सिंगापूरमधील OCBC एरिना येथे NBA Rising Stars Invitational 2026 च्या...

दोन दुर्मिळ तांबे प्लेट्स एलिफंटाचा सागरी भूतकाळ उघडतात

या वर्षी एलिफंटा येथे उत्खनन केलेल्या दोन मोठ्या स्टोरेज जारपैकी एका खोलवर, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) ने 17 एप्रिल रोजी दुहेरी खजिना अडखळला.पश्चिम भारतातील...

‘केतनने मला सांगितले की लग्न मोडण्यास उशीर झाला आहे’: पोलिस म्हणतात की सिया गोयलने...

चॅट्स सिया गोयलच्या विधानांच्या विरोधात आहेत, लोणावळा पोलिस म्हणतात लोणावळा: रियाल्टर केतन अग्रवालच्या कथित हत्येच्या तपासाला नवे वळण मिळाले आहे, पोलिसांनी दावा केला...

स्वीडिश मंत्री तिच्या 3 महिन्यांच्या बाळाला EU बैठकीत घेऊन आले; व्हायरल व्हिडिओ देशातील उदार...

या क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. गुरुवारी संपूर्ण युरोपमधील मंत्री हवामान धोरणांवर चर्चा करण्यासाठी लक्झेंबर्गमध्ये एकत्र आले तेव्हा एका क्षणाने पटकन स्पॉटलाइट...

लोहगड किल्ला खून प्रकरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केतन अग्रवालच्या वडिलांची भेट घेतली, जलदगती...

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलदगती न्यायालयाचे आदेश दिले असून धक्कादायक लोहगड किल्ला हत्याकांडप्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली...

error: Content is protected !!