उल्हासनगर दि ३० ( प्रमोद दळवी ) : लखनऊ येथील एका कोचिंग सेंटर मध्ये घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतर देशभरात कोचिंग संस्था मधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर उल्हासनगर शहरातील सर्व कोचिंग क्लासेस व प्रशिक्षण केंद्राची सुरक्षा तपासणी करण्यात यावी अशी मागणी युवासेना उल्हासनगर विधानसभा संपर्कप्रमुख तुषार बांदल आणि युवासेना शहर पदाधिकारी यांच्या वतीने उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शहरात मोठ्या प्रमाणावर कोचिंग क्लासेस, ट्युशन सेंटर व विविध प्रशिक्षण संस्था कार्यरत असून अनेक ठिकाणी अग्नी सुरक्षा नियमांचे पालन आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग, इमर्जन्सी एक्झिट, फायर ऑडिट, स्ट्रक्चरल ऑडिट तसेच इतर आवश्यक सुरक्षा उपयोजनांची अंमलबजावणी होत आहे का याची सखोल तपासणी करण्याची गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. हे निवेदन शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आयुक्तांना सादर करण्यात आले.
उल्हासनगर महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या नेतृत्वांमध्ये आणि विधानसभा संपर्कप्रमुख तुषार बांदल सर्व युवासेनेची टीम यांनी आयुक्त मनीषा आव्हाळे यांना निवेदना दिले आहे .उल्हासनगरतील १२ ते १३ नावाजलेले कोचिंग क्लासेस आहेत त्यांची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. स्टुडन्टची सेफ्टी आवश्यक आहे. त्यासाठी युवासेनेने आज हे पाऊल उचललेला आहे. महापालिका आयुक्त यांनी सांगितले की आम्ही यावर त्वरित कारवाई करू असे आश्वासन दिले असल्याचे सांगण्यात आले आहे





























