Homeताज्या बातम्यायोगाभ्यास करून ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ महाराष्ट्र सदनात उत्साहात साजरा

योगाभ्यास करून ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ महाराष्ट्र सदनात उत्साहात साजरा

  • योग ही भारताची प्राचीन देणगी असून, ती शरीर, मन आणि आत्म्याला निरोगी ठेवते – केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव
  • नियमित योगाने शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य राखता येते निवासी आयुक्त आर. विमला

नवी दिल्ली दि. २१ : महाराष्ट्र सदनातील बँकेट सभागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’योगाभ्यास करून  उत्साहात साजरा करण्यात आला.आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय आयुष मंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांनी  महाराष्ट्र परिचय केंद्राला दिलेल्या संदेशामध्ये योग साधनेचे महत्व सांगितले, “योग ही भारताला मिळालेली प्राचीन देणगी असून, ती शरीर, मन आणि आत्म्याला निरोगी ठेवते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने योगाभ्यास जागतिक चळवळ बनली आहे. ‘एक पृथ्वी, एक स्वास्थ्यासाठी योग’ या संकल्पने अंतर्गत योगाचा प्रसार करून ‘फिट इंडिया’ आणि ‘निरोगी भारत’संकल्प साकार करूया.”

महाराष्ट्र सदनात झालेल्या योगाभ्यास सत्रात निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी सांगितले, “दररोज केवळ पाच मिनिटे योगासने केल्याने मन आणि शरीर निरोगी राहते, तसेच ताजेतवाने आणि प्रफुल्लित राहता येते. योग हा जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनवावा. नियमित योगाभ्यासाने शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य राखता येते, ज्यामुळे दैनंदिन जबाबदाऱ्या कार्यक्षमतेने पार पाडता येतात.”

मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेच्या प्रशिक्षक निशा चंद यांनी योगासनांचे महत्त्व समजावून सांगितले आणि प्रात्यक्षिके सादर केली.या कार्यक्रमात सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार, माहिती अधिकारी अंजु निमसरकर, व्यवस्थापक प्रमोद कोलपते, सहायक सुरक्षा अधिकारी अनिल चोरगे यांच्यासह महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राचे कर्मचारी तसेच सुरक्षा जवान मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कार्यक्रमाची सुरुवात ‘ॐ’ च्या सामूहिक उच्चारणासह प्रार्थनेने झाली. सूक्ष्म व्यायामांमध्ये ग्रीवा चालन, कटी चालन आणि घुटना संचलन यांचा समावेश होता. योगासन सत्रात ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, त्रिकोणासन, भद्रासन, वज्रासन, शशांकासन, मक्रासन, भुजंगासन, पवनमुक्तासन आणि शवासन यांचा समावेश होता. प्राणायाम सत्रात कपालभाती, नाडीशोधन, अनुलोम-विलोम, भ्रामरी प्राणायाम आणि ध्यान मुद्रा यांचा सराव झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बनावट आरटीओ चलन, पाईपद्वारे गॅस बिल फसवणुकीत पुण्यातील खासगी कंपनीच्या व्यवस्थापकाचे ११.६६ लाख रुपयांचे...

पुणे : बालेवाडीतील एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या 54 वर्षीय खरेदी व्यवस्थापकाने RTO ट्रॅफिक चलन आणि पाइप्ड गॅस बिलाच्या वेषात अज्ञातपणे दुर्भावनापूर्ण...

‘भारतावरील मालिका विजय खूपच खास असेल’: ऐतिहासिक बेलफास्ट विजयानंतर आयर्लंडचा कर्णधार लॉर्कन टकरने इशारा...

आयर्लंडचा कर्णधार लॉर्कन टकर सहकाऱ्यांसोबत ऐतिहासिक विजय साजरा करताना. (फोटो क्रेडिटः क्रिकेट आयर्लंड) नवी दिल्ली: आयर्लंडचा कर्णधार लॉर्कन टकरने पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतावर...

मुंबईतील अक्सा बीचवर १७ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची भीती मुंबई बातम्या

अक्सा बीचवर सुरक्षेचा फोटो फाइल करा मुंबई : अक्सा समुद्रकिनारी शुक्रवारी दुपारी माझिद खान नावाचा 17 वर्षीय सहकारी बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात आली.रात्री...

‘गोयल कुटुंबीयांना क्रिकेट सामन्यात चेतन चौधरीबद्दल कळले, मग ‘श्रीमंत’ केतन अग्रवालसोबत सियाचे लग्न ठरविले

केतन अग्रवाल (एल) आणि त्यांची मंगेतर, सिया गोयल (आर); सीसीटीव्ही फुटेजमध्ये केतनचे शेवटचे क्षण टिपले आहेत. पुणे: सहआरोपी चेतन चौधरीसोबतचे नातेसंबंध समजल्यानंतर आणि...

धणे वाढवण्याच्या टिप्स: टाकून दिलेल्या मुळांपासून ताजी कोथिंबीर वाढवण्यासाठी 5 सोप्या पायऱ्या: नवशिक्यांसाठी सोपे...

घरगुती बागकामाच्या टिप्ससह तुमच्या स्वयंपाकघरातील स्क्रॅप्सचे ताज्या कोथिंबीरमध्ये रूपांतर करा. लहान भांडीमध्ये टाकून दिलेल्या मुळे किंवा बियांमधून ही आवश्यक औषधी वनस्पती सहजपणे कशी...

error: Content is protected !!