Homeशहरयावर्षीचा वसंत मून पुरस्कार २०२६ हा जेष्ठ विचारवंत व हिंदी मराठी साहित्यिक...

यावर्षीचा वसंत मून पुरस्कार २०२६ हा जेष्ठ विचारवंत व हिंदी मराठी साहित्यिक “प्रा.दामोदर मोरे “यांना प्रदान

उल्हासनगर दि ७ : साहित्य ,सामाजिक, सांस्कृतिक आणि चळवळीच्या क्षेत्रात आपले अमूल्य योगदान देणाऱ्या सन्माननीय व्यक्तींच्या प्रति कृतज्ञता  व्यक्त करण्यासाठी वसंत मून प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी पुरस्कार देण्याचे योजिले असून यावर्षीचा  पुरस्कार जेष्ठ विचारवंत व हिंदी मराठी साहित्यिक“प्रा.दामोदर मोरे “यांना प्रदान करण्यात आला,ज्या मध्ये सन्मान पत्र , सन्मान चिन्ह व २१००० रुपये देण्यात आले.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्रीपाल सबनीस (मा. अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन) ह्यांनी भूषविले तर प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री कल्पना सरोज संस्थापक व उद्योजक – कमानी टुब्झ ह्यांची उपस्थितही लाभली. सोबतच प्रमुख उपस्थितीत मा.डॉ .प्रकाश वाकोडे माजी सहसंचालक डीएमईआर, मा महेश भारती राष्ट्रीय कोषाध्यक्ष- वंचित बहुजन आघाडी सल्लागार- सम्यक विद्यार्थी आंदोलन,मा कमलेश सोनाळे माजी अप्पर जिल्हाधिकारी ,मा आय.एम .मोरे माजी सहसचिव महसूल ,मा किरण सोनवणे पत्रकार व विचारवंत हे सर्व उपस्थितीत होते.तसेच ह्या कार्यक्रम दरम्यान वसंत मून यांच्या वर  पीएच.डी केलेली व वसंत मून (मराठी साहित्य आणि विचार विश्व) लेखिका: डॉ.जलदा ढोके गाणार ह्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

आपल्या अध्यक्ष भाषणात माननीय श्रीपाद सबनीस  म्हणालेत की डॉ. बाबासाहेबांचे कार्य फक्त दलित समाजा पुरते मर्यादित नाही तेवढ्याच अँगल ठेवणे मला बरोबर वाटत नाही, ज्ञान हे अत्यंत विश्वात्मक संकल्पना आहे व ज्ञानाच्या व्यापक संदर्भामध्ये वसंत मून यांच्या कार्याचा परिप्रेषक वाढत जातो आणि विश्वापर्यंत तो जातो. त्यानंतर सत्कारमूर्ती प्रा. दामोदर मोरे सरांनी आपल्या भाषणात वसंत मून यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या सोबत असलेल्या आठवणींना उजाळा दिला व त्यांचे कार्य किती व्यापक आहे हे सांगितले.कार्यक्रमाचे संयोजन समिती मध्ये मा.डॉ.चंद्रकांत साळवे बालरोग तज्ञ ,प्रा.सिंधूताई रामटेके ,मा.दिगंबर हजारे समन्वयक बुद्ध विहार समन्वय समिती,मा अॕड. प्रफुल्ल कोळी सर्व होते तर सूत्रसंचालन मा.प्रफुल्ल केदारे ह्यांनी केले., तसेच सन्मान पत्राचे वाचन प्रा सिंधूताई रामटेके यांनी केले तर आभार प्रदर्शन उज्वला मिलिंद मून यांनी केले.

कार्यक्रमाचे निमंत्रक व आयोजक हे अंजली चंद्रकांत साळवे (अध्यक्ष वसंत मून सो .वे.फा.),मिलिंद वसंत मून.(उप महाप्रबंधक SBI) रोहित साळवे (संचालक वसंत मून सो.वे.फा.) हे होते.हा पुरस्कार समारंभ रविवार सायंकाळी ६  ते ९  दरम्यान, डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन , तक्षशिला विद्यालय , सुभाष टेकडी,उल्हासनगर ४ . येथे पार पडला. ह्या कार्यक्रमाला अनेक सामाजिक , साहित्यिक व राजकीय क्षेत्रातील मुंबई , पुणे , ठाणे , कल्याण ,उल्हासनगर व सलग च्या परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्या मध्ये प्रामुख्याने डॉ आशालता कांबळे , मा.शुक्राचार्य गायकवाड ,मा.दिलीप मालवणकर ,मा. संजय अभंग , डॉ मंगेश बनसोड ,मा.शिवा इंगोले, नगरसेवीका सुरेखा सोनवणे , नगरसेवक राजेश वानखेडे , भारिप नेते सारंग थोरात , शेषराव वाघमारे , मा.नगरसेवक प्रशांत धांडे, संदेश सपकाळ , मा.महेंद्र बारसाखडे, देवीदास नरवाडे ,तसेच उल्हासनगर येथील मोठ्या संख्येने नागरिक  उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उल्हासनगर महापालिकेच्या प्रभाग समिती सभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल : चौघांचीही बिनविरोध निवड , अधिकृत...

उल्हासनगर दि . २९ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर महानगरपालिकेच्या  चार प्रभाग समितीच्या सभापतीपदासाठी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. महायुतीच्या वाटपानुसार शिवसेना...

‘आमच्याद्वारे नियुक्त नाही’: भाऊ साहिलने केतन अग्रवाल हत्येच्या तपासात सिया गोयलच्या बचावात वकील आशुतोष...

आरोपी सियाच्या भावाचे म्हणणे आहे की, कुटुंबाने आशुतोष श्रीवास्तव यांना वकील म्हणून नियुक्त केले नाही पुणे: सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल याने वकील...

किदाम्बी श्रीकांत यूएस ओपन सुपर 300 मध्ये उपविजेता ठरला सु ली-यांगकडून पराभव पत्करावा लागला...

किदाम्बी श्रीकांत (एएफपी फोटो) नवी दिल्ली: भारताचा किदाम्बी श्रीकांत यूएस ओपन सुपर ३०० बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत चिनी तैपेईच्या सु ली-यांगकडून...

‘उल्लंघनावर कठोर कारवाई’: महाराष्ट्र सरकारने सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा सक्तीची...

दादा भुसे म्हणाले, "मराठी भाषेचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी महाराष्ट्र शासन पूर्णपणे कटिबद्ध आहे." मुंबई : महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सोमवारी...

लोहगड हत्येपूर्वी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या ‘सराव सत्रा’चा पुणे पोलिस तपास करत...

पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवाल यांच्या कथित हत्येपूर्वी लोहगड किल्ल्यावर "सराव सत्र" झाले होते. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालची कथितपणे हत्या करण्यापूर्वी, सिया आणि...

error: Content is protected !!