- अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांचे मोलाचे मार्गदर्शन
- महाराष्ट्रातील सर्व संस्थाचालकांना दिल्या २२ महत्त्वाच्या सूचना आणि माहिती
पुणे दि.२० : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे (भा.प्र.से), यांच्या अध्यक्षतेखाली व प्रकाशजी कराळे अध्यक्ष MSCEIA, संतोष दानी महासचिव यांच्या नेतृत्वाखाली विविध विषय संदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक अध्यक्ष यांच्या दालनात आयोजित करण्यात आली होती

आयोजित करण्यात आलेल्या मीटिंगमध्ये अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी महाराष्ट्रातील सर्व संस्था चालकांना महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. याशिवाय सर्व संस्था चालकांना जवळपास २२ विषय संदर्भात महत्त्वाचे मार्गदर्शन व सूचना दिले आहेत. या मीटिंगमध्ये प्रकाशजी सर, ढमढेरे मॅडम, थिटे मॅडम, दिनेश पडवळ सर, पुणे जिल्हाप्रतिनिधी लतिश बलकवडे, जालना प्रतिनिधी संतोष दानी, लातूर जिल्हाप्रतिनिधी प्रताप रोडगे, सांगली जिल्हा प्रतिनिधी शोएब मुजावर, R&R संचालक रवी जेरे सांगली आणि अहिल्यानगर, लातूर, सांगली, पुणे जिल्ह्यातील जिल्हा संघटना अध्यक्ष, संस्था-चालक व तज्ञ, त्यांचे सहकारी संस्था-चालक आणि मान्यवर सरदार मॅडम, नितीन किर्दकर सर यांची उपस्थिती होती.

या बैठकीत उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली त्यात (१) पुढील परिक्षेपासून मराठी, हिंदी करिता इतर फॉन्टची चाचपणी करण्यात येईल. (२) प्रत्येक पीसीचे हेल्थ चेकअप करण्याकरिता टूल परीक्षा केंद्रावर वापरण्यात येवून पीसीचा स्टेटस तपासण्यात येईल. (३) परीक्षा ही ऑफलाईन मोड मध्ये चालते; रीक्षा सुरु होताना विद्यार्थ्याचा डेटा Sinc करताना व शेवटी विद्यार्थी डेटा अपलोड करताना इंटनेट लागते.४) आवेदनपत्रे फीलअप करण्यापूर्वी लेटेस्ट नूतनीकरण प्रत अपलोड करावी. नूतनीकरण न झालेल्या संस्थांनी लेटेस्ट नूतनीकरण आदेश व तपासणी अहवाल यांची एकत्रित pdf अपलोड करावी. संस्थांनी नुतनीकरण संपण्यापूर्वी ३ महिने आधी ऑनलाईन अर्ज वेबपोर्टलवर सादर करणे अत्यावश्यक आहे. (५) नूतनीकरण नसेल तर जुनी नूतनीकरण अपलोड करावी. वाढीव सेटअप मंजूर नसेल तर तपासणी रिपोर्ट अपलोड करावा.(६) नवीन मान्यता घेतलेल्या संस्था जुन्या संस्थेच्या ५०० मीटरच्या आत येत असतील तर जिल्हा संघटनेच्या समन्वय समितीने आक्षेप घेवून DyD कार्यालयाकडून अशा मान्यता रद्द करण्याच्या ऑर्डर्स मिळवाव्यात. (७)लघुलेखन संदर्भात मॉक टेस्ट दरम्यान एक मिनिट डिक्टेशन व एक मिनिट कि-बोर्ड वापरून टायपिंग करता येईल. (८) रिझल्ट मध्ये २+२ ग्रेस मार्कची सोय आहे. म्हणजे स्पीड-पॅसेज मध्ये ३ मार्क कमी पडत असतील आणि ऑब्जेक्टीव्ह सेक्शनला १ मार्क कमी पडत असतील तर तसे ग्रेस-मार्क देता येत नाहीत. (उदाहरणार्थ पॅसेजला दोन व ऑब्जेक्टीव्हला दोन मार्क देवून विद्यार्थी पास होवू शकेल.) यावेळेपासून ऑनलाईन मार्कलिस्टवर ग्रेसमार्क करीता स्टार मार्क देण्यात येईल. सर्टिफिकेटवर स्टार मार्क येणार नाही.(९) कौशल्य विकास मंडळ किंवा MSBTE सारखी इतर बाह्य परीक्षा एजन्सी टायपिंग कोर्स चालवीत असल्यास राज्य संघटनेने हरकती घेतल्याची पत्रे संबंधित मंडळ / बोर्डला द्याव्यात. आणि त्या पत्रांच्या कॉपीज परिषदेला द्याव्यात. (१०) ३, ५, १० या वर्षाचा उल्लेख ऑनलाईन नुतनीकरण करताना MSCE पोर्टलवर होईल. ११) आवेदनपत्र फीलअप करताना पेमेंट करण्यापूर्वी फीलअप केलेले आवेदनपत्र डिलीट करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.(१२) रिपिटर परीक्षेपासून पुढे परीक्षा झाल्यावर स्पीड पॅसेजची फोटो-कॉपी संस्था-लॉगीन मध्ये देण्यात येईल. (१३) LMS सारखे सॉफ्टवेअर विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे वापरायला पाहीजे; कारण हे सारथी, बारटी इत्यादी प्रोजेक्टकरीता लागणार आहे. (१४) ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या रिपिटर परीक्षेचा रिझल्ट लागल्यावर 30 wpm उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना डिसेंबर / जानेवारी, २०२६ मध्ये होणाऱ्या परीक्षेस 40 wpm करीता अप्लाय करता येईल किंवा 30, 40 wpm दोहोंना अप्लाय करण्याकरिता दोन दिवस विंडो-लिंक देण्यात येईल.(१५) सुधारित नियमावली शासनास सादर करून मान्यता घेण्यात येईल. (१६) परीक्षा केंद्रावर मॉक टेस्टस सर्व संगणकावर घेतल्या जातील. (१७) परिषदेकडे डबल पेमेंट प्रलंबित आहे; त्यांना तातडीने परत करण्यात येईल. (१८) बायोमेट्रिक हजेरी महिन्याच्या १५ तारखेला अपलोड करावी लागेल. (१९) परीक्षा केंद्रावर लवकरच बायोमेट्रिक हजेरी देण्याचा प्रयत्न केला जाईल. (२०) रुपये ५० घेऊन प्रमाणपत्र डाउनलोड करून देणाऱ्या व्यक्तीवर संघटनांनी पोलिसात तक्रार द्यावी. (२१) सारथी, बार्टी, महाज्योती महामंडळ कडून विद्यार्थ्यांना शुल्क मिळणेबाबत प्रयत्न करू. (२२) सर्व विभागात कार्यशाळा घेणेबाबत संघटनेने विनंती केली ती अध्यक्षांनी मान्य केली.शेवटी संघटनेच्या वतीने डॉ. नंदकुमार बेडसे सर यांची परिषदेत पूर्णवेळ अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल संघटना आणि उपस्थित जिल्ह्यातील संस्था-चालक यांचे वतीने सत्कार करण्यात येऊन सभेचे कामकाज समाप्त करण्यात आले.





























