Homeशहरप्रभाग क्रमांक १८ मध्ये नगरसेविका अंजली साळवे यांच्यातर्फे जागतिक महिला महोत्सव...

प्रभाग क्रमांक १८ मध्ये नगरसेविका अंजली साळवे यांच्यातर्फे जागतिक महिला महोत्सव २०२६ संपन्न.

  • महोत्सवाची थीम होती कॅन्सर अवेअरनेस

उल्हासनगर दि १७ ( प्रमोद दळवी ) : नुकताच उल्हासनगरातील कॅम्प नं- ४ येथील  प्रभाग क्रमांक १८  मध्ये नगरसेविका अंजली साळवे यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे महिला दिनानिमित्त दोन दिवसाचा महिला महोत्सव साजरा करण्यात आला.या महिला महोत्सवाची थीम होती कॅन्सर अवेअरनेस . ती थीम ठेवून सर्व कार्यक्रम राबवण्यात आले.

रांगोळी स्पर्धा (कॅन्सर अवेअरनेस) ही थीम घेऊन घेण्यात आली त्यामध्ये स्पर्धकांनी अतिशय उत्कृष्ट अशा रांगोळ्या काढल्यात. तसेच महिलांसाठी मैदानी खेळ घेण्यात आले त्यामध्ये डॉजबॉल खो-खो म्युझिकल चेअर संगीत खुर्ची घेण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात महिलांनी याचा आनंद घेतला. शनिवारी संध्याकाळीमहिलांसाठी विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये एड. उज्वला खाडे यांनी कौटुंबिक हिंसाचार व मा.प्रल्हाद जाधव सर यांनी क्राईम सायबर क्राईम व डॉअवंतिका फुंडे यांनी महिलांच्या आरोग्यावर व कॅन्सर व्हॅक्सिनेशन( HPV )जे आता सरकारतर्फे लॉन्च करण्यात आले. (१४ वर्षे पूर्ण झालेल्या मुलींना १५ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी द्यायचे आहे) त्याबद्दल महिलांना मार्गदर्शन केले. त्यानंतर आजची स्मार्ट वुमन महिला या विषयावर फॅशन शो घेण्यात आला. तसेच ७०  ते ९० च्या दशकातील अभिनेत्रीच्या गाण्यावर व डायलॉगवर रील स्पर्धा घेण्यात आली व त्यानंतर आई व मुलगी म्हणजेच नवीन पिढी व जुनी पिढी या दोघींची डान्स स्पर्धा घेण्यात आली.

रविवार दि.१५  मार्च रोजी सकाळच्या सत्रात कॅन्सर घेऊन पिंक मॅरेथॉन आयोजित केली होती त्यावर मोठ्या प्रमाणात महिलांनी भाग घेतला. सकाळी 11 वाजता पाककला स्पर्धा घेण्यात आली यामध्ये महिलांनी मांसाहारी , शाकाहारी व गोड पदार्थ अशा तीन कॅटेगरीत महिलांनी भाग घेतला व खूप सुंदर पदार्थ बनवलेत .रविवारी संध्याकाळी सहा वाजता आशा सेविकांनी (एचपी व्हॅक्सिनेशन) गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर प्रतिबंधित लसी बद्दल खूप सुंदर छोटी नाटिका सादर केली व संध्याकाळी साडेसात वाजता सर्व महिलांचा आवडता खेळ पैठणी घेण्यात आला यावेळी सतीश नायकोडी (क्राईम पेट्रोल अभिनेता) यांनी या खेळाचे  सूत्रसंचालन केले व अत्यंत सुंदर रीतीने या खेळात रंगत आणली, मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्या होत्या.

या कार्यक्रमाला महापौर अश्विनी कमलेश निकम यांनी भेट देऊन महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच नगरसेवक शिवसेना गटनेते अरुण इशान, राजेश वानखेडे ,नगरसेविका संघमित्रा हजारे ,कुलवंत सिंग , तसेच माजी नगरसेविका मा.वसुधा बोडारे, मा. शितल बोडारे, टिना ठाकुर ,शितल सपकाळे उपस्थित होत्या.सर्व स्पर्धांना ३ बक्षीसे देण्यात आली होम मिनिस्टर मध्ये:-  १) निशिगंधा पोतदार LED tv व पैठणी ,२) पूजा भामरे पैठणी ,३) सोनाली स्थूल सेमी पैठणी  देण्यात आली

या दोन दिवस चाललेल्या कार्यक्रमात  बचतगटांच्या आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले. त्यामध्ये खाद्यपदार्थ,पर्सेस, साड्या, ड्रेसेस, ज्वेलरी इत्यादी स्टॉल लावण्यात आले. त्यावेळी सर्व प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ काढण्यात आला व संजीवनी जगताप यांना फ्रिज ,व बचत गटांच्या ड्रा मध्ये प्रेमादेवी बचत गटाला गॅस शेगडी देण्यात आली. डान्स स्पर्धा :- १)पल्लवी व दृष्टी वाघीरकर,२)त्रिशा अँड श्रद्धा३)अस्मिता व श्रेया मेश्राम, फॅशन शो :- १)अनिता कारेकर २)स्मिता गंगावणे ३)सुजाता वानखेडे ,रील स्पर्धा :-   १)प्रांजल मस्के २)संस्कृती पवार ३)मोहिनी ढेरे ,मेरॅथान :-१) दामिनी यादव २)संस्कृती ताजनपुरे ३)जयश्री पाटील विजया खोड ,पाककला स्पर्धा :-१)मनीषा सातदिवे १)पूजा भामरे,१)श्रेया बेलगे, संगीत खुर्ची :- हिरा गाडे,सुकेशा मनवर, साक्षी भगत. तसेच प्रभागातील १० वी व १२ वी घ्या परिक्षेत ९० %पेक्षा जास्त मार्क असलेल्या मुलींचा सत्कार:- श्रावणी रवींद्र गायकवाड 97% हर्षाली दीपक ठाकरे 95% ऋतुजा राम जाधव यांचा सत्कार करण्यात आला . विशेष कार्य करणाऱ्या महिलांचा :-मनीषा महाकाळे,कोमल नितेश पाडेकर, मधुमती शिखरे ,विपश्यना सोनवणे, हर्षाली चव्हाण, पौर्णिमा कांबळे,डॉ अवंतिका फुंडे यांचा सत्कार करण्यात आला.तसेच पहिले HPV vaccination देण्यात आलेल्या कार्तिकी आव्हाड व तिच्या आईवडिलांचा सत्कार करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘पुस्तके, इंटरनेटच्या माध्यमातून आत्मकेंद्रित’: मुंबईजवळ सुरक्षा रक्षकांवर चाकूने वार करणाऱ्या व्यक्तीने जिहाद विचारधारेवर कृत्य...

मीरा-भाईंदर हल्लेखोर ऑनलाइन कंटेंटच्या माध्यमातून स्वत: कट्टरपंथी बनला होता आणि 'जिहाद' करण्याच्या कल्पनेने प्रेरित होता, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. कोल्हापूर: मुंबईजवळील...

वाहनावर प्रलंबित इ-चलन दंड तडजोडीने व त्वरित निकाली काढण्याची लोकअदालत मध्ये संधी

उल्हासनगर दि २८ ( प्रमोद दळवी ) : आपल्या वाहनावर प्रलंबित इ-चलन दंड तडजोडीने व त्वरित निकाली काढण्याची नागरिकांना लोकअदालत मध्ये संधी देण्यात आली...

बदलापूर (पूर्व) येथील वालिवली परिसरात उभारण्यात येणाऱ्या एकात्मिक घनकचरा प्रकल्पाचा उल्हासनगर महापौर, उपमहापौर आमदार...

उल्हासनगर दि २८ ( प्रमोद दळवी ) : सहा दिवसापूर्वी उल्हासनगर महापालिकेच्या महासभेत शहरातील कॅम्प नंबर -५ परिसरातील डम्पिंग ग्राउंड संदर्भात भाजपच्या नगरसेवकांनी ठिय्या...

आगीत सर्व काही भस्मसात झालेल्या ठाण्यातील गुजर कुटुंबाला डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशनचा मदतीचा हात

ठाणे दि.२८ : शास्त्रीनगर परिसरातील विजय गुजर यांच्या घराला लागलेल्या भीषण आगीत त्यांचा संपूर्ण संसार काही क्षणांत भस्मसात झाला. आयुष्यभर कष्ट करून उभारलेलं घर...

‘आयएसआयएसमध्ये सामील होण्याची पहिली पायरी’: अमेरिकेत परतलेल्या माणसाने सुरक्षा रक्षकांना कसे भोसकले मुंबईजवळ दहशतवादी

आरोपीच्या निवासस्थानी ISIS मध्ये सामील होण्याची इच्छा दर्शविणाऱ्या त्रासदायक नोट्स सापडल्यानंतर मीरा रोडमध्ये दोन सुरक्षा रक्षकांना चाकूने भोसकणे हे मोठ्या सुरक्षा तपासात वाढले...

error: Content is protected !!