Homeशहरपाणीपुरवठा विभागासाठी अधिकृत व्हॉट्सॲप प्रसारण प्रणालीची सुरुवात

पाणीपुरवठा विभागासाठी अधिकृत व्हॉट्सॲप प्रसारण प्रणालीची सुरुवात

उल्हासनगर दि.४ : उल्हासनगर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत सर्व नगरसेवकांपर्यंत पाणीपुरवठा संदर्भातील माहिती वेळेत, अचूक व अधिकृत पद्धतीने पोहोचविण्यासाठी एक विशेष डिजिटल प्रसारण प्रणाली विकसित करण्यात आली आहे.

आयुक्त श्रीमती मनीषा आव्हाळे यांच्या आदेशानुसार माहिती तंत्रज्ञान विभागाद्वारे सदर ॲप/प्रसारण प्रणाली विकसित करण्यात आली असून, प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यातील संवाद अधिक प्रभावी करण्याचा उद्देश आहे. या नव्या प्रणालीद्वारे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक, नियोजित दुरुस्ती कामे, आपत्कालीन सूचना, क्षेत्रनिहाय पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांक तसेच इतर महत्त्वपूर्ण सूचना सर्व नोंदणीकृत नगरसेवकांना व्हॉट्सअॅप ब्रॉडकास्टच्या माध्यमातून एकाच वेळी पाठविण्यात येणार आहेत.

यासाठी अधिकृत व्हॉट्सॲप क्रमांक ८४५४०७९७९३ निश्चित करण्यात आला असून, सदर क्रमांकावरूनच सर्व अधिकृत संदेश प्रसारित करण्यात येतील.यामुळे नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातील नागरिकांपर्यंत संबंधित माहिती तत्काळ पोहोचविणे सुलभहोणार आहे. नागरिकांना दररोजच्या पाणीपुरवठा संदर्भातील अद्ययावत माहिती त्यांच्या मोबाईलवर सहज उपलब्ध होणार असून प्रशासन व नागरिक यांच्यातील संवाद अधिक परिणामकारक होईल.ही प्रणाली अनौपचारिक मेसेजिंग पद्धतीऐवजी सुरक्षित, संरचित व दस्तऐवजीकरण केलेल्या अधिकृत प्रशासकीय माध्यमातून संवाद साधण्यासाठी तयार करण्यात आली आहे.

प्रणालीची प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत :-

१)सर्व नगरसेवकांना एकाच वेळी सूचना व नोटीस पाठविण्याची सुविधा.

२)पीडीएफ स्वरूपातील अधिकृत आदेश व परिपत्रके पाठविण्याची सोय.

३) प्रत्येक संदेशाचा स्वयंचलित डिजिटल नोंदवही (Digital Trail) भविष्यातील  संदर्भासाठी उपलब्ध.

४) एकमार्गी प्रसारण प्रणालीमुळे अनावश्यक गट चर्चा टाळून संदेशावर लक्ष केंद्रीत  राहणार.

उल्हासनगर महानगरपालिका प्रशासनाच्या डिजिटल उपक्रमांतर्गत राबविण्यात आलेली ही प्रणाली पारदर्शकता, कार्यक्षमता आणि माहिती वितरणाची गती वाढविण्यास उपयुक्त ठरणार आहे. महानगरपालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करून नागरिकांना वेळेत व अचूक सेवा देण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे असे उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त श्रीम. मनीषा आव्हाळे यांनी सांगितले .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

एर्लिंग हॅलँड स्कोअर करतो, नंतर त्याच्या आतल्या वायकिंगला बाहेर काढण्यापूर्वी काउबॉय गियर डॉन करतो

नॉर्वेचा एर्लिंग हॅलंड (९) विश्वचषक फेरीच्या ३२ नंतर पोझ देत आहे (एपी फोटो) नॉर्वेचा स्टार स्ट्रायकर एर्लिंग हॅलँडने फिफा विश्वचषक फेरीच्या 16 मध्ये...

पालकांच्या वारंवार होणाऱ्या भांडणाला कंटाळून तरुणाचा मुंबईतील इमारतीवरून आत्महत्येचा प्रयत्न; शेजाऱ्यांनी वाचवले | मुंबई...

ही घटना दहिसर पूर्व येथील जनकल्याण बिल्डिंगमध्ये घडली असून त्या युवकाची मावशी राहते. मुंबई : बुधवारी दहिसर पूर्वेतील एका १८ वर्षीय मुलाने इमारतीच्या...

‘बस आज की रात है जिंदगी’: केतन अग्रवालने कौटुंबिक कार्यक्रमात नाचलेले गाणे आता एक...

7 मे रोजी कार्यक्रमात सादर झालेल्या गायिका रीतू शर्माने कार्यक्रमातील आनंदी वातावरणावर प्रकाश टाकणारा एक मार्मिक व्हिडिओ शेअर केला आहे. पुणे: एकेकाळी कौटुंबिक...

निसर्गाच्या सौंदर्याने आणि त्यांच्या हृदयस्पर्शी अर्थाने प्रेरित 10 सुंदर लहान मुलींची नावे

निसर्ग-प्रेरित नावांना कालातीत अपील आहे कारण ते आपल्याला नैसर्गिक जगामध्ये आढळणारे सौंदर्य आणि संतुलन याची आठवण करून देतात. फुले, झाडे, नद्या किंवा आकाशातून प्रेरित...

केतन अग्रवाल हत्या: लोहगड खडक पडल्यानंतर सिया गोयलचा पीडितेचा फोन होता; पोलिसांना ‘पुरावा छेडछाड’चा...

घटनेनंतर गोयल यांच्या ताब्यात असलेला अग्रवाल यांचा मोबाईल फोन तपासणारे तपासत आहेत. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येचा तपास त्याच्या मोबाईल फोनकडे वळवला...

error: Content is protected !!